छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी तत्काळ नोंदवता येणार असून पोलिस यंत्रणेशी थेट जोडणीमुळे तातडीने कारवाई शक्य होणार आहे.
Wednesday, April 15, 2026
एकत्रितपणे स्त्री-शक्तीला सक्षम करण्याची हीच वेळ आहे. ‘नारी शक्ती वंदन’सारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे महिलांना राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात समान संधी मिळत असून त्यांच्या सहभागातून लोकशाही अधिक मजबूत होत आहे.
वृत्त
फार्मर आयडी विना खत वितरण
होणार नाही
शेतकऱ्यांनी
तात्काळ नोंदणी करावी
नांदेड दि. 15 एप्रिल :- केंद्र
व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी
फार्मर आयडी (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना
कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास
सहकार्य करून फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व
पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दतकुमार कळसाईत यांनी केले आहे..
फार्मर आयडी अनिवार्य
शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. आयडी शिवाय
खत वितरण केले जाणार नाही.
अनुदानित खतांसाठी सक्ती
रासायनिक खतांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.
काळाबाजार व लिंकिंग थांबवणे
खतांचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी
ठरेल. पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल.
डिजिटल नोंदणी प्रणाली
शेतकऱ्यांची माहिती (जमीन, पीक, योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल.
खत खरेदी करताना आयडी स्कॅन/क्रमांक वापरला जाईल.
थेट लाभ हस्तांतरण (DBT)
खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. इतर शासकीय योजनांसाठीही
फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये
जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे
फार्मर आयडी कसा काढावा ?
ग्रामपंचायत कार्यालय. सीएससी CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर). सहाय्यक कृषी
अधिकारी / कृषी विभाग कार्यालय
महत्वाच्या सूचना
शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी. खत खरेदी करताना
आयडी सोबत ठेवावा. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी व बिल घ्यावे. खरीप हंगाम
2026 पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही
याच नियमांनुसार खत वितरण होईल, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार
कळसाईत यांनी केले आहे.
00000
वृत्त
जिल्ह्यात सन 2025 च्या
तुलनेत
सन 2026 मध्ये अपघातात घट
नांदेड दि. 15 एप्रिल :- परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जिल्ह्यात रस्ते अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे अतिवेगाने आणि मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयाच्या इंटरसेप्टर वाहनांवरील रडार कॅमेऱ्याद्वारे रस्त्यावरुन भरधाव जाणाऱ्या, सिटबेल्ट न लावलेल्या, ट्रीपल सीट व हेल्मेट नसलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्हयात एकूण झालेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे सायंकाळी 6 ते रात्री 9 च्या दरम्यान झाली आहेत. अपघात कमी करण्यासाठी सुक्ष्म पद्धतीने तालुकानिहाय विश्लेषण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या एकूण 32 अधिकाऱ्यांद्वारे फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या दोन महिन्याच्या कालावधीत नांदेड जिल्हातील सर्व 16 तालूक्यांचे तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणात Geo Tagging करून अपघात स्थळांची पाहणी करण्यात आली. अपघातांची कारणे जाणून अपघातांची संख्या कमी करण्याच्यादृष्टीने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी त्या-त्या तालुक्यांचा उपाययोजनेसह सादर केलेला अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांना सादर करण्यात आला. या अहवालाच्या अनुषंगाने रस्त्या सुरक्षा संबंधित सर्व यंत्रणांना, अहवालात सुचविल्याप्रमाणे उपययोजनाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत. याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.
त्यामुळे सन 2025 च्या तुलनेत 2026 फेब्रुवारी पर्यंत जिल्हयात प्राणांतिक अपघातांमध्ये 24.38 टक्क्यांची घट झाली आहे. ही कामगिरी अधिक उंचावण्यासाठी आणि 2026 मध्ये अपघात मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी जिल्हयातील अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी
जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 15.85
टक्क्यांनी कमी झाले आहे. सन 2026 मध्ये ही
कामगिरी अधिक सुधारण्यासाठी या कार्यालयाच्या वायुवेग पथक व इंटरसेप्टर पथकातील
वाहनांद्वारे अवजड वाहनांवर व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवली
जाईल आणि रस्ता सुरक्षा जनजागृतीवर आमचा भर राहणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी
पत्रकाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत केकरेज यांनी दिली.
00000
वृत्त
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा
विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार
प्रशस्तीपत्र
नांदेड दि. 15 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य केवळ एका निबंधात मांडणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य महिला सक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप
या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खाजगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तर विषयासाठी विद्यार्थ्यांना 500 ते 800 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष
सहभागी होऊ शकतात या गटाला 800 ते 1200 शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ
मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी 14 ते
20 एप्रिल 2026 हा निश्चित करण्यात आला
आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक 9152230193 या मोबाईल क्रमांकाशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या नोंदणीसाठी क्यूआरकोडही देण्यात आला आहे. नोंदणी केल्यावर स्पर्धकांना त्याची पोच ही मिळणार आहे.
या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच
उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी
प्रशस्तीपत्र ही दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी दिली आहे.
000000
वृत्त
सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती
नांदेड दि. 15 एप्रिल :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी नांदेड या वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित मधून माळीचे एक पद भरण्यात येणार आहे. माजी सैनिक व माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येईल.
यासाठी
वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असून वेतन 13 हजार 271 रुपये राहील. या पदाला कामाचा अनुभव
असल्यास प्राधान्य राहील. इच्छुक उमेदवारांनी सैनिकी मुलांचे वसतिगृह नांदेड येथे सोमवार
20 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक मो.
8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...
