Tuesday, July 14, 2026

वृत्त क्रमांक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नांदेड, दि. 14 जुलै :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचे अर्ज मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील पात्र विद्यार्थ्यांनी शुक्रवार 24 जुलै 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे.

सन 2026 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैदकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यास, विद्यार्थींनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यामुळे 

 पुढीलप्रमाणे आवश्यक ती मुळ कागदपत्रे दोन प्रतीसहित आणावीत. मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, दोन छायाचित्र, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह व जिल्हा व्यवस्थाकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह संपर्क साधावा. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांच्‍या सक्षमीकरणासाठी मदत कक्ष 

नांदेड, दि. 14 जुलै :- राज्‍य विधीमंडळाने “महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक” नुकतेच मंजूर केले आहे. ज्‍याद्वारे महिला शेतक-यांचे विविध योजनांचे माध्‍यमातून सक्षमीकरण अभिप्रेत आहे. महिला  शेतक-यांचे अनुभव लक्षात घेता आढळून येणा-या विविध अडचणी, मालकी हक्‍काचे दस्‍ताऐवज, महसूली प्रकरणे, मालमत्‍ता विषयक वादांची तत्‍परतेने दखल घेवून सुलभतेने सोडवणूक करण्‍याची आवश्‍यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्‍हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदतकक्ष (Help desk) स्‍थापन केला आहे.

त्‍याअनुषंगाने राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली रविवार 12 जुलै रोजी बैठक घेण्‍यात आली. महिला सक्षमीकरण अनुषंगाने महिलांच्‍या विविध समस्‍या, सुविधांची उपलब्‍धता, उद्भवणाऱ्या अडचणी व करावयाच्‍या उपाययोजना अनुषंगाने चर्चा करण्‍यात आली. यावेळी प्राधान्‍याने महिला शेतकऱ्यांचे महसूली प्रकरणे, मालमत्‍ता विषयक वादांची तत्‍परतेने दखल घेवून सुलभतेने सोडवणूक करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर  मदत कक्ष (Help desk) कार्यान्वित करणेबाबत त्‍यांनी  निर्देश दिले.

त्‍याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी तत्‍परतेने आदेश निर्गमित करुन जिल्‍हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदतकक्ष (Help desk) स्‍थापन केला आहे. या मदत कक्षाच्‍या माध्‍यमातून महिला शेतकरी यांचे महसूली प्रकरणे, मालमत्‍ताविषयक वाद इत्‍यादी अनुषंगाने तक्रारींची दखल घेणे, त्‍यांची तत्‍परतेने व विहित पध्‍दतीने सोडवणूक करण्यासाठी संबंधीत विभाग, आस्‍थापना, कार्यालय यांच्याशी  समन्‍वय साधून अशी प्रकरणे विनाविलंब निकाली काढणे कामी आवश्‍यक पाठपुरावा करण्‍यात येणार आहे. महिला शेतकऱ्याच्‍या मदतीसाठी या मदत कक्षात एक महिला नायब तहसिलदार, विधी अधिकारी, सहायक महसूल अधिकारी व महसूल सहायकाची नियुक्‍ती केली आहे.

मदत कक्षात नियुक्‍त अधिकारी हे सदर कक्षात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून शेतकरी महिलांचे महसूली, मालमत्‍ताविषयक तक्रारींचे प्राधान्‍याने  निराकरण अनुषंगाने आवश्‍यक कार्यवाही करतील.

नांदेड जिल्‍हयातील नागरीकांनी महिला शेतक-यांचे महसूली प्रकरणे, मालमत्‍ताविषयक दावे, तक्रारी अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयातील महिला शेतकरी मदत कक्षात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.

000000

वृत्त क्रमांक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन   नांदेड, दि. 14 जुलै :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ ...