Friday, August 19, 2016

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी
बुधवारी स्थानिक सुट्टी जाहीर 
नांदेड, दि. 19 जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक  व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यासाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक  आयोगाच्या आदेशान्वये ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होणार आहे. त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी त्या मर्यादीत क्षेत्रापुरती स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. 

000000 
ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी संबंधीत गावातील आठवडी बाजार बंद राहणार  
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यातील सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या  सार्वत्रिक  व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यासाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी संबंधीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
पणन संचालक पुणे यांनी ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीच्‍या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता  यावा  तसेच  मतदान शांततेत पार पडावे यादृष्टिकोनातून ज्‍या ग्रामपंचायतीच्‍या हद्दीत मतदान होणार आहे अशा ठिकाणचे आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आणि ते अन्‍य दिवशी भरवण्‍यास मान्‍यता दिली आहे. त्‍यानुसार  जिल्‍हा‍धिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये प्रदान अधिकाराचा वापर करुन जिल्‍ह्यातील किनवट, माहूर, उमरी, मुखेड, भोकर, हदगाव, कंधार, नांदेड या आठ तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक तसेच 49 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी ज्‍या गावी, ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्‍यात यावेत व अशा ठिकाणचे आठवडी बाजार दुस-या दिवशी गुरुवार 25 ऑगस्ट 2016 रोजी भरविण्‍यात यावेत असे आदेशात नमूद केले आहे.

000000
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांचा दौरा  
नांदेड दि. 19 :-  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे शनिवार 20 ऑगस्ट 2016 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 20 ऑगस्ट 2016 रोजी  जालना येथून मोटारीने सकाळी 11 वा. नांदेड येथे आगमन व स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी या कुटुंबस्तर संवाद अभियान कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- आनंद सागर मंगल कार्यालय आसना पुलाजवळ सांगवी. दुपारी 2 वा. भारतीय जनता पक्षाच्यावतीने  आयोजित  आजादी के 70 साल याद करो कुर्बानी  या कार्यक्रमांतर्गत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तिरंगा रॅलीस सुरुवात. मार्ग- महाराणा प्रताप पुतळा ते स्वामी रामानंदतीर्थ पुतळा विमानतळ रोड नांदेड. दुपारी 4.30 वा. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तिरंगा यात्रेचा समारोप व स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सहयोग एज्युकेशनल कॅम्पस विष्णुपुरी नांदेड. सायं. 6 वा. नांदेड येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...