Saturday, March 30, 2019


शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा
31 मार्चला रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

नांदेड दि. 30 :- जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालये रविवार 31 मार्च 2019 रोजी शासकीय व्यवहारासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेशीत केले आहे.
महाराष्ट्र राज्य कोषागार अधिनियम 1968 अन्वये जिल्हाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदेड शहरातील व तालुका मुख्यालयातील सर्व शाखा कार्यालये रविवार 31 मार्च 2019 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत शासकीय व्यवहारासाठी सुरु राहतील.
000000

















दिव्‍यांग मतदार जनजागृतीसाठी कौठा व विषणुपूरीत पथनाट्य सादर
             नांदेड, दि. 30 :-   17 व्‍या लोकसभा सार्वञिक निवडणुक 2019 साठी सुलभ निवडणुक  हे घोषवाक्‍य भारत निवडणुक विभाग यांनी घेतले आहे. याकार्यक्रमांतर्गत मतदान प्रक्रीयेतील सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणुक 086 उत्‍तर मतदार संघ व 087  दक्षिण नांदेड मतदार संघात दिव्‍यांग मतदारांमध्‍ये जनजागृती करण्‍यासाठी स्‍वतंञ कक्ष स्‍थापन करुन त्‍या कक्षामार्फत पथनाट्याव्‍दारे मतदार जनजागृती करण्‍यात येत आहे.
      वरील प्रमाणे चालु असलेल्‍या कार्यक्रमांतर्गत पुनश्‍च दि.28/03/019 रोजी कौठा येथील जिल्‍हा परिषद शाळेत तसेच दि.29/03/2019 रोजी विष्‍णुपूरी येथे दिव्‍यांग मतदारांसाठी पथनाट्य सादर केले.माझ मत माझा स्‍वाभिमान  या पथनाट्याव्‍दारे लोकशाहीतील प्रत्‍येकाच्‍या मताचे महत्‍व तसेच दिव्‍यांगासाठी निवडणुक विभागाव्‍दारे केद्रावर पुरविण्‍यात येणा-या सोयी सुविधांवर प्रबांधन करण्‍यात आले.
    वरील प्रमाणे दोन्‍ही दिवशी कार्यक्रमात संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी उपस्थित होते. सदरील पथनाट्यास दिव्‍यांग मतदारांनी उत्‍सफुर्तपणे प्रतिसाद दिला. पथनाट्याव्‍दारे उपस्थित दिव्‍यांग मतदारांचे मने जिंकली. या कार्यक्रमाप्रसंगी कौठा येथील दिव्‍यांग मतदार म्‍हणुन रुपेश भोकरे ,‍देवानंद काकडे व पडलवार यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करुन निवडणुक विभागाचे केलेल्‍या जनजागृती बद्दल आभार व्‍यक्‍त केले. याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्‍तावना प्रा. डॉ. संदीपराव काळे यांनी केली.
     या कार्यक्रमासाठी नारायणराव चव्‍हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज मंञी, मारोती कदम,केदार जोशी,कर्णधार मगर,चैतन्‍य अर्जुने ,ऋषीकेश यादव यांनी पथनाट्य कलाकार म्‍हणुन आपला सहभाग नोंदवला.      
     सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी श्री.लतीफ पठाण व तहसिलदार नांदेड श्री.किरण अंबेकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.अशोक सिध्‍देवाड ,प्रा.डॉ.महेश पाटील कार्लेकर ,प्रा.डॉ.सुग्रीव फड, प्रा.डॉ.दत्‍ता म्‍हेञे हे दिव्‍यांग मतदारांचे मतदाणात 100  टक्‍के सहभागी दृष्‍टीकोनातून विशेष प्रयत्‍न करत आहेत.
00000




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात
दारु दुकाने बंद ठेवण्याचा आदेश    
नांदेड, दि. 30 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 संदर्भात नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या अदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान व 23 मे 2019 रोजी मतमोजणी होत आहे. या अनुषंगाने तेलंगणा राज्यातील 5 कि.मी अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
या निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी तेलंगणा राज्यातील 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल / बीआर-2 व ताडी दुकाने (टिडी-1) अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
तेलंगणा राज्यातील 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान होत असलेली गावे- मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सायंकाळी 6 वाजेपासून 9 एप्रिल रोजी. मतदानाचा अगोदरचा दिवस 10 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस. मतदानाचा दिवस 11 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण दिवशी तर मतमोजणीचा दिवस 23 मे 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण होईपर्यंत, हा आदेश लागू राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
जिल्ह्यात दारु दुकाने बंद ठेवण्याचा आदेश    
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान 18 एप्रिल 2019 रोजी तर मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे. यावेळी निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्हा हद्दीतील सर्व मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल / बीआर- 2 व ताडी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान होत असलेल्या ठिकाणी मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर म्हणजे 16 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 17 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस, मतदानाचा दिवशी 18 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी 23 मे 2019 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग  व जिल्हाधिकारी डोंगरे यांच्‍या हस्‍ते
नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भिकेचे प्रकाशन

नांदेड, दि. 29 :- १६- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या माहितीच्‍या संदर्भिकेचे प्रकाशन निवडणूक निरीक्षक (जनरल) हरदीप सिंग  व जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या हस्‍ते  जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या पत्रकार परिषदेत  जिल्‍हाधिकारी यांच्‍या बैठक कक्षात  करण्‍यात आले.  
प्रसार माध्‍यमांना विश्‍लेषणासाठी तसेच अभ्‍यासकांना उपयुक्‍त ठरेल अशी माहिती या संदर्भिकेतून देण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्‍यक्ष राम गगराणी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण, डॉ. दिपक शिंदे,  जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, विविध प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी, आदिंची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी या पुस्तिकेचे संपादन केले असून माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, मिलिंद व्यवहारे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार यांनी सहाय्य केले आहे.
जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने काढण्‍यात आलेल्‍या संदर्भिकेमध्‍ये नांदेड लोकसभा मतदार संघाचा नकाशा,  निवडणूक आचारसंहिता, पेडन्‍युजचे निकष,सोशल मिडिया, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, व्‍हीव्‍हीपॅट,निवडणूक आयोग तसेच प्रमुख अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, मतदान केंद्र संख्‍या, मतदारांची संख्‍या तसेच नांदेड लोकसभा निवडणूकीतील १९५१ ते २०१४ पर्यंतचे निकाल, निवडणूक कार्यक्रमासह आदि माहिती संदर्भिका पुस्तिकेत देण्‍यात आली आहे.

००००


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...