Saturday, March 30, 2019


निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग  व जिल्हाधिकारी डोंगरे यांच्‍या हस्‍ते
नांदेड लोकसभा निवडणूक संदर्भिकेचे प्रकाशन

नांदेड, दि. 29 :- १६- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्‍या माहितीच्‍या संदर्भिकेचे प्रकाशन निवडणूक निरीक्षक (जनरल) हरदीप सिंग  व जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या हस्‍ते  जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या पत्रकार परिषदेत  जिल्‍हाधिकारी यांच्‍या बैठक कक्षात  करण्‍यात आले.  
प्रसार माध्‍यमांना विश्‍लेषणासाठी तसेच अभ्‍यासकांना उपयुक्‍त ठरेल अशी माहिती या संदर्भिकेतून देण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्‍हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्‍यक्ष राम गगराणी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण, डॉ. दिपक शिंदे,  जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, विविध प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी, आदिंची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी या पुस्तिकेचे संपादन केले असून माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, मिलिंद व्यवहारे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार यांनी सहाय्य केले आहे.
जिल्‍हा माहिती कार्यालयाच्‍यावतीने काढण्‍यात आलेल्‍या संदर्भिकेमध्‍ये नांदेड लोकसभा मतदार संघाचा नकाशा,  निवडणूक आचारसंहिता, पेडन्‍युजचे निकष,सोशल मिडिया, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, व्‍हीव्‍हीपॅट,निवडणूक आयोग तसेच प्रमुख अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, मतदान केंद्र संख्‍या, मतदारांची संख्‍या तसेच नांदेड लोकसभा निवडणूकीतील १९५१ ते २०१४ पर्यंतचे निकाल, निवडणूक कार्यक्रमासह आदि माहिती संदर्भिका पुस्तिकेत देण्‍यात आली आहे.

००००


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...