Tuesday, October 2, 2018


नांदेड येथे कार्यशाळा संपन्न
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी
"युवा माहिती दूत" व्हावे - डॉ. जाधव

नांदेड, दि. 2 :- शासकीय योजना गावा-गावातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "युवा माहिती दूत" या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राष्ट्रीय सेवा योजनाच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात जिल्हास्तरीय "युवा माहिती दूत" कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. जाधव बोलत होते.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. डी. डी. पवार, नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे नांदेड जिल्हा समन्वयक प्रा. गोपाळ बडगीरे तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
"युवा माहिती दूत" या  महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाचे कौतूक करुन प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले की, शासनाच्या जनहिताच्या अनेक योजना आहेत. त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. या पार्श्वभुमीवर युवा माहिती दूत हे ॲप डाउनलोड करुन अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयात या ॲप्लीकेशन विषयी विद्यार्थ्यांना माहिती दयावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांनीही राष्ट्रीय सेवा योजनाने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत "युवा माहिती दूत" या उपक्रमाची अंमलबजावणी सुव्यवस्थीत करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगून सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने यामध्ये सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. जिल्हा समन्वयक प्रा. गोपाळ बडगीरे यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी सादरीकरणाद्वारे "युवा माहिती दूत" या उपक्रमाविषयी तपशीलवार विवेचन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या तीन चित्रफितीद्वारे उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशंवत महाविद्यालयाचे रासयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवराज बोकडे यांनी केले. यावेळी सहभागी कार्यक्रम अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...