Monday, August 28, 2017

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत  
नांदेड, दि. 28 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत 30 जुन 2016 रोजी थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना निकषाच्या अधीन राहून सरसकट कर्जमाफी व प्रोत्साहनपर इतर लाभ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज शुक्रवार 15 सप्टेंबर 2017 पर्यंत सुविधा केंद्रावर भरण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार, महाऑनलाईन किंवा सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावीत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांने सुविधा केंद्रावर जातांना सोबत आधारकार्ड, आधार नोंदणी क्रमांक (EID) केल्याबाबतची पोच, कर्जखाते पुस्तिका / उतारा व बचत खाते पुस्तिका, पॅनकार्ड (असल्यास), आधारकार्ड, पॅनकार्ड, पेन्शन पीपीओ बुक, बँकेचे पासबुक याची छायांकीत प्रत, फोटो कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. ऑनलाईन अर्जाचे फार्म आपले सरकार, महाऑनलाईन किंवा सीएससी केंद्रावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये, तालुक्याचे उप / सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय केंद्र चालकांकडून रक्कम मागितली जाणार नाही. शेतकऱ्यांकडून या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या केंद्रावर सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर, 2017 पर्यंत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफी व कर्ज प्रोत्साहन अनुदान योजना 28 जु 2017 चे शासन निर्णयान्वये जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी 1 एप्रिल 2009  रोजी व त्यानंतर  पीक कर्ज  घेतलेल्या व अशा कर्जापैकी  30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना पुढील निकषाच्या अधीन राहून  सरसकट कर्जमाफी व प्रोत्साहनपर इतर लाभ देण्यात येणार आहेत.
दिनांक 30 जून 2016 रोजी थकीत असलेले मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपये र्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) म्हणून दि. 30 जून 2016 रोजी थकबाकीपैकी शासनातर्फे 1 लाख 50 हजार रक्कमेचा लाभ देण्यात यावा. या योजनेअंतर्गत  पात्र शेतकऱ्यांनी त्याच्या हिश्याची संपुर्ण रक्कम बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे 1 लाख 50 हजार रुपये लाभाची रक्कम शेतकऱ्यांना आदा करण्यात येणार आहे. सन 2015-16 या वर्षात पीक कर्जाची 30 जुन 2016 रोजी परतफेड केल्यास शेतकऱ्यांनी सन 2016-17 वर्षात घेतलेल्या कर्जाची रक्कम दि. 31 जुलै 2017 पर्यंत पुर्णतपरतफेड केलेल्या पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये पर्यंत जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र ही रक्कम किमान 15 हजार रुपये असेल. तथापी, शेतकऱ्यांनी परतफेड केलेली रक्कम 15 हजार रुपये पेक्षा कमी असल्यास अशी संपुर्ण रक्कम शेतकऱ्यांना शासनामार्फत आदा करण्यात येईल. सन 2009-10 ते 2015-16 या कालावधीत कर्जाचे पुर्नगठन केलेल्या शेतकऱ्यापैकी जे शेतकरी दि. 30 जुन 2016 रोजी थकबाकीदार असतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. तथापि  जे थकित नाहीत त्यांना 25 हजार रुपये रक्कम शासनामार्फत अदा करण्यात येईल.

000000
वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे वेतन पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची दि. 1 जानेवारी 2016 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे. 
वेतन पडताळणी  पथकाचा माहे सप्टेंबर 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे. हे पथक मंगळवार 5 सप्टेंबर 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 6 सप्टेंबर ते शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.

0000000
परिवहन संवर्गातील वाहन योग्यता
प्रमाणपत्रासाठी आरटीओचे आवाहन
            नांदेड, दि. 28 :- परिवहन संवर्गातील सर्व वाहनाचे 1 सप्टेंबर पासून योग्यता प्रमाणपत्र संगणकीकृत वाहन 4.0 वर करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे किमान सात दिवस अगोदर सादर करावीत. वाहन तपासणीसाठीची नियोजीत वेळ घेतल्यास वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतीनकरण करण्यात येईल, असे आहवान प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...