Tuesday, April 18, 2017

रास्तभाव धान्य दुकानात
मे महिन्यासाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 18 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील बीपीएल व अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने मे 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती 500 ग्रॅम प्रमाणे प्रौढ अथवा मूल / बालक असा भेदभाव न करता मंजूर केले आहे. मे 2017 या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 4 हजार 575 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले असून पुढील प्रमाणे तालुका निहाय नियतन देण्‍यात आले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.
नांदेड लोहा- 534 , हदगाव- 399, किनवट- 527, भोकर- 175, बिलोली- 287, देगलूर- 255, मुखेड- 487, कंधार- 374, लोहा- 323, अर्धापूर- 128, हिमायतनगर- 198, माहूर- 194, उमरी- 135, धर्माबाद-152, नायगाव- 263, मुदखेड- 144. याची सर्व बीपीएल, अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000
  "पीओएस" मशिनद्वारे 1 जूनपासू खताची विक्री ;  
  खत खरेदीसाठी लागणार आधार नंबर
नांदेड दि. 18 :- रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) गुरुवार 1 जून 2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजनाची बैठक जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी रासायनिक खत उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रकल्पाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व खत विक्रेत्याचे एमएफएमएस नोंदणी करुन एमएफएमएस आयडी असणे आवश्यक आहे. आधार क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगठयाचा ठसा पॉस मशिनवर घेतल्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याना लाभ  होणार आहे. मशिनचा खर्च कंपनीच करणार आहे. यामुळे खत विक्रीच्या नोंदीत पारदर्शकता येईल.
शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांकडून खत विक्रीत होणारी अनागोंदी थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना 1 जून पासून पॉस मशिनच्या माध्यमातूनच खताची विक्री होईल. शेतकऱ्यांच्या ताब्यात खताची गोणी गेल्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही. कंपन्याकडून जिल्हयात पहिल्या टप्यात 550 खत विक्रेत्यांना पॉस मशिन दिल्या जाणार आहे. त्यामुळे प्रत्य गोणीचा हिशोब मिळणार आहे, अशी माहिती  कृषि विकास अधिकारी मोरे  यांनी दिली.
खत उत्पादक कंपन्यांना यापूर्वी रेल्वे रेकने खत पोहचते केल्यानंतर 85 टक्के अनुदान लगेच मिळत होते. खताचा रेक पोचला पण या रेकमधले खत शेतकऱ्यांना मिळाले की नाही याची तपासणी करताच अनुदान केले जात होते. सरकारने ही पध्दत आता आधार संलग्न पॉस मशिनच्या सहाय्याने बंद केली आहे. खत दुकानदाराकडे  शेतकरी  गेल्यानंतर त्याने मागीतलेल्या  खताची नोंद पॉस मशिनमध्ये केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अंगठयाचा ठसा घेतला जाईल. मशिनमधून स्लीप बाहेर आल्यानंतर शेतकऱ्याला खताची विक्री होणार आहे. विकलेल्या खताची नोंद त्वरीत संबंधित कंपनी शासनाच्या सर्व्हरवर होईल. त्यामुळे शेतकऱ्याच्या आधार संलग्न क्रमांकावर विकल्या गेलेल्या खतापर्तेच अनुदान वाटप होईल.
खत विक्रीची अचूक नोंद ठेवण्यापूरता वापर पॉस मशिनचा होणार आहे. या मशिनचा संबंध आर्थिक व्यवहाराशी नसेल. शेतकऱ्याला खताची विक्री उधारीत किंवा रोखीने केलेली असो, फक्त वाटपाचीच नोंद पॉस मशिनवर होणार आहे. या मशिनवर नोंद शेतकऱ्यांचा अंगठा घेतल्यास कंपनीला अनुदान मिळणारच नाही.  
दिनांक 1 जून 2017 पासून शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना आधारकार्ड नंबर ePOS मशिनमध्ये नोंद करुन अंगठयाचा ठसा उमटविणे बंधकारक करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे, असेही अवाहन  कृषि विकास अधिकारी मोरे यांनी केले.
तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवार 21 एप्रिल 2017 पासून करण्यात येणार आहे. त्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची रासायनिक खत कंपनी प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच 15 मे 2017 पर्यंत जिल्हयात पॉस मशिनचे वाटप करण्यात येणार आहे.
बैठकीस मोहि अधिकारी अनंत हंडे , जिल्हा कृषि अधिकारी (सा.) ए. एल. शिरफुले, नांदेड जिल्हा कृषिनिविष्ठा विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे तसेच रासायनिक खत विक्री कंपनी प्रतिनिधी तालुका स्तरीय कृषि अधिकारी उपस्थित होते.

000000
जलनायक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 :-  जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती नांदेडतर्फे जलनायकाची निवड करण्यासाठी इच्छक व्यक्तींकडन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार व्यक्तींनी त्यांचा वैयक्तीक तपशिल (Biodata), पासपोर्ट साईज फोटो, जलविषयक केलेल्या कामाची माहिती (छायाचित्रासह) घेतलेले प्रशिक्षण इत्यादी माहितीचा अर्ज बुधवार 19 एप्रिल 2017 ते सोमवार 24 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) जंगमवाडी, नांदेड यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
सोमवार 24 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12  नंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) जंगमवाडी नांदेड यांनी केले आहे. 
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई  शासन निर्णय क्र. वाल्मी-2016/ पृ.क्र.69/ 16/ लाक्षेवि (आस्था) दि. 30 नोव्हेंबर 2016 अन्वये जिल्हास्तरीय जलनायक निवडण्याचे ठरविण्यात आले आहे. जलनायक निवडीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. जलविषयक अभियान स्वयंपर्णरितीने चालविण्याचा अनुभव. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय-राज्य स्तरावरील कामकाजाचा अनुभव. प्रभावीपणे विषय मांडणी व सामाजिक कार्यातील नेतृत्वाबाबत लोकमान्यता. प्राचीन जलसंस्कृती पासन आधुनिक जलसंस्कृतीची जाण. चांगले चारित्र्य. प्रशिक्षणाचा अनुभव आदी माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...