Friday, April 13, 2018

विशेष लेख


स्वदेशउपक्रमातून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : जी. श्रीकांत
लातूर जिल्हा प्रशासनाचा नाविण्यपूर्ण उपक्रम

               
जी. श्रीकांत जिल्हाधिकारी, लातूर यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यातील विकासाचा नवा पॅटर्न तयार होत आहे.  जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले. जिल्हा प्रशासनाने स्पर्धा परीक्षेतून तरुणांना करिअरचा मार्ग निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात घेण्यात आलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर हेही एक नाविण्यपूर्ण उपक्रमातून प्रशासन लोकाभिमूख करण्याचा जी. श्रीकांत यांचा प्रयत्न असतो. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन काम करीत आहे. हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात त्यांना यशही  प्राप्त झाले आहे. आपण त्यामधील महत्वाचा घटक असल्याने प्रत्येकाचे योगदान लोककल्याणासाठी व्हावा, असा त्यांच्या भूमिकेचा अग्रह असतो. लोकसहभातून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने स्वदेशया प्रकल्पाची सुरुवात लातूरमध्ये मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल वेबसाईटच्या माध्यमातून नुकतीच 31 मार्च रोजी करण्यात आली. या उपक्रमाविषयी  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद .  
            प्रश्न 1 : स्वदेश हा प्रकल्प नेमका काय आहे. हा प्रकल्प सुरु करण्यामागची आपली भूमिका काय आहे ?
            उत्तर : लातूर जिल्ह्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी उपक्रमशील इच्छुक व्यक्तीकडून त्यांच्या विविध क्षेत्रातील अनुभवातून स्थानिक लोकांच्या विकासासाठी नवीन संकल्पना , मार्गदर्शन प्राप्त होईल. यासाठी शासनामार्फत लोकहिताच्या राबविण्यात येणाऱ्या योजनामध्ये देखील त्यांची मदत घेता येवू शकते. तसेच मूळ लातूर जिल्ह्यातील जन्मगाव असणारे परंतु विविध व्यवसाय , नोकरी किंवा इतर कारणासाठी परजिल्हा, परराज्य किंवा विदेशात विविध क्षेत्रात आपली कारकीर्द यशस्वी करणाऱ्या व्यक्तीच्या स्वच्छेप्रमाणे  आपल्या गावाचा, जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देता यावे. यातून आपले गाव स्वयंपूर्ण विकसित बघायला मिळू शकते. लातूर जिल्हा प्रशासनाने स्वदेशकक्ष तयार केला आहे. हिंदी चित्रपट स्वदेशयावरुन हा प्रकल्प राबविण्याची प्रेरणा मिळाली. यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या नायकास आपले मूळगावी आल्यावर उणिवा जाणवतात आणि त्यांच्या प्रयत्नातून तो गावाचा विकास करतो. ही संकल्पना लातूरसाठी राबवावी अशा विचारातून स्वदेश चे काम सुरु केले.
           
 प्रश्न 2 : स्वदेश या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यत किती लोकांचा संपर्क झाला आहे  ?
            उत्तर : लातूर जिल्ह्यातील परदेश , परराज्यात  राहणाऱ्या 240 लोकांशी संपर्क झाला असून यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, सौदी, दुबई, जर्मनी , ओमान, श्रीलंका, बेल्जीयम, येमेन, आफ्रिका, सॅन फ्रॅन्सको कॅलीफोर्निया, युरोप, मसकट, . आफ्रिका, दोहा , इजिप्त, मलेशिया, इंग्लंड, कत्तार, यूएई नायजेरिया, अटलांटा, न्यूयार्क, ग्रेट ब्रिटन या देशाचा समावेश होतो. वैद्यकीय क्षेत्र, इंजिनिअर, शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट शास्त्रज्ञ, संगणक सर्वेअर, कार्यालयीन कामकाज, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय संशोधन, आरोग्य, कामगार, वाहनचालक, कंपनीमधील नोकरदार यासारख्या क्षेत्रात काम करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअर क्षेत्रातील लोक काम करीत आहेत. ते लातूरच्या विकासासाठी तत्परतेने  मदतही करायला तयार आहे .  या सर्व व्यक्तीसोबत स्वदेश कक्ष संपर्कात आहे आणि काही दिवसातच या कामास सुरुवात होत आहे.
प्रश्न 3 : स्वदेश मार्फत जमा झालेल्या निधीचा कसा उपयोग केला जाणार आहे ?
            उत्तर : या निधीचा उपयोग लातूरच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला असून डेटाबेस प्रणाली आम्ही विकसित केली. मदत करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्या-त्या घटकाचा विकास केला जात आहे. यामध्ये पाणीपुरवठा , शिक्षण , आरोग्य, रोजगार निर्मिती, जलसंवर्धन, स्वच्छता यामध्ये त्या त्या घटकातील गरजेप्रमाणे रोजगार उपलब्धी, स्वच्छता, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण आणि पालिका शाळांचा दर्जावाढ, जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर आम्ही लातूर भूमिपुत्राशी जोडलो गेलो आहोत. आता कामासाठी सुरुवात होत आहे.
प्रश्न 4 : स्वदेश प्रकल्पासाठी कोणाकोणाची समन्वयक म्हणून नियुक्ती  केली आहे ?
            उत्तर : स्वदेश प्रकल्पासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून यात जिल्हाधिकारी मी स्वत: अध्यक्ष असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे उपाध्यक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव, जिल्हा नियोजन अधिकारी , जिल्हा माहिती अधिकारी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी, कार्यकारी अभियंता, लातूर क्र. 1 2, निलंगा, अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, विभागीय वन अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक या व्यक्तीचा समावेश आहे.
प्रश्न 5 :स्वदेशया उपक्रमासोबत जोडण्यासाठी आपण काय सांगू इच्छिता ?
            उत्तर : स्वदेश प्रकल्पाच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून याबाबतीत संपर्क करण्यासाठी www.swadeshlatur.in या वेबपोर्टलवर, Twitter@swadesh Latur, Facebook page- swadesh latur , व्हॉटस्अप आणि मोबाईल नंबर 8007449944 वर संपर्क करु शकता. आपल्या एक मदतीमुळे आपल्या मूळ गावचा विकास होऊ शकतो आणि तो आनंद आपण सर्वांनी साजरा करु याची अपेक्षा आहे .  आपल्या स्वत:च्या विकासाबरोबरच आपल्या गावातील आपल्या मित्र, भावंडं, नातेवाईक यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प उभा राहत असून आपणा सर्वांकडून सहकार्यांची अपेक्षा व्यक्त करतो . लातूरच्या प्रगतीचा उन्नतीचा ध्यास घेऊन आपण सर्वांनी पुढे जाऊयात .  मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित देश आणि विकसित लातूर घडवू.
            Reconecting to roots of latur  म्हणजेच लोकांशी संपर्क, योगदान आणि नव्या विकसित लातूरची निर्मिती हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. अशी भावना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.  
-- मीरा ढास
   सहायक संचालक (माहिती),
   विभागीय माहिती कार्यालय, लातूर

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...