प्रेरणा प्रकल्पच्यावतीने
“जागतिक आत्महत्या प्रतिबंध
दिन” साजरा
नांदेड,
दि. 11 :- जागतिक आत्महत्या
प्रतिबंध दिनानिमित्त प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा
कार्यक्रमाच्यावतीने येथील गुरुगोबिंद सिंघजी शासकीय
रुग्णालय येथे 10 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम
होते.
यावेळी डॉ. एच. आर. गुंटूरकर, मानसोपचार तज्ज्ञ
डॉ. दि. भा. जोशी, आतिरिक्त जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, नोडल आधिकारी डॉ.वाघमारे, वैद्यकीय आधिकारी
डॉ. हजारी, डॉ. पाटील, नर्सिंग
कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती गायकवाड यांची
प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी विविध आजाराबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ. गुंटूरकर यांनी सध्या आत्महत्या वाढण्यामागचे कारण
नैराश्य आसल्याचे सांगितले. डॉ.जोशी यांनी आत्महत्येमागची विविध कारणांची
माहिती दिली. प्रेरणा प्रकल्प कार्यक्रमाचे कार्यक्रम आधिकारी डॉ. प्रणद
जोशी यांनी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजनाबद्दल तसेच ताण-तणाव नियोजन यावर
सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी
सन्मित्र
फाेेउंडेशन पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. नर्सिंग कॉलेजच्या
विद्यार्थ्यांनी आत्महत्येवर पथनाट्य सादर करुन जनजागृती केली. कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्त्या शीतल उदगीरकर यांनी
केले तर आभार मानसशास्त्रज्ञ डॉ. कैलास चव्हाण
यांनी मानले. या कार्यक्रमाचे
संयोजन
प्रेरणा प्रकल्पचे राहुल कराळे, वंदना कसपटे व रुपाली मस्के यांनी केले.
000000