Tuesday, June 10, 2025

शिकाऊ-पक्के अनुज्ञप्ती शिबीराचे तालुकानिहाय आयोजन 

नांदेड दि. १० जून :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर 2025 या महिन्यात तालुका शिबीर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट महिना सुरु होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे. 

शिबिराचे ठिकाण  

कंधार तालुक्यात 3 जुलै, 4 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 3 डिसेंबर. 

धर्माबाद तालुक्यात 7 जुलै, 6 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर, 5 डिसेंबर. 

किनवट तालुक्यात 9 जुलै, 11 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 10 नोव्हेंबर, 10 डिसेंबर. 

मुदखेड तालुक्यात 14 जुलै, 14 ऑगस्ट, 15 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर, 15 डिसेंबर. 

माहूर तालुक्यात 17 जुलै, 18 ऑगस्ट, 18 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 17 डिसेंबर. 

हदगाव तालुक्यात 21 जुलै, 20 ऑगस्ट, 22 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर, 20 नोव्हेंबर, 19 डिसेंबर. 

धर्माबाद  तालुक्यात 23 जुलै, 22 ऑगस्ट, 24 सप्टेंबर, 27 ऑक्टोबर, 24 नोव्हेंबर, 23 डिसेंबर. 

हिमायतनगर तालुक्यात 28 जुलै, 26 ऑगस्ट, 26 सप्टेंबर, 29 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 डिसेंबर. 

किनवट तालुक्यात 30 जुलै, 29 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 31 ऑक्टोबर, 28 नोव्हेंबर, 31 डिसेंबर याप्रमाणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याची नोंद घ्यावी व शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे. दिलेल्या दिनांकामध्ये स्थानिक सुटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो. याची सर्व संबंधित नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 598

जूना मोंढा ते गोदावरी नदीवरील  पुलाच्या कामामुळे वाहनासाठी पर्यायी मार्ग

नांदेड दि. 10 जून :- पॅकेज 154 नांदेड शहरातील  जुना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा. मा. 256 (कि.मी 42/200 ते 75/700) व 2 नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा. 247 (०/०० ते 4/600) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजका सह संगम स्थळाची सुधारणे करणेसाठी जुना मोंढा ते गोदावरी नदी पुल या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार  जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार उपाययोजना करतील या अटीवर तसेच, संबधीत विभागाने  पुढील उपाययोजना  करुन 15 जून 2025 पर्यंत  नमुद  केलेल्‍या  पर्यायी मार्गाने  सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास  मान्‍यता  देण्‍यात आली आहे.

वाहनासाठी प्रतिबंधित करण्यात आलेला मार्ग जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय, कौठा हा आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाणे-येणे साठी जुना मोंढा -वजिराबाद –कौठा-रवीनगर-शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा याप्रमाणे राहील.

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व  सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. ही अधिसुचना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी. ही अधिसूचना दिनांक 9 जून रोजी निर्गमीत करण्‍यात आली आहे. 

00000

  वृत्त क्रमांक  640 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी    नांदेड, दि. 19 जून :- जिल्ह्यातील बेरोजगार ...