योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे #आधार_प्रमाणीकरण करणे आवश्यक.
Monday, July 27, 2026
वृत्त क्रमांक
‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) कार्यक्रमाच्या अनूषंगाने राजकीय पक्षाचे प्रतिनिधि यांना Enumeration Form Uncollectable असलेले मतदारांची यादी सुपूर्द
नांदेड दि. २७ जुलै:- 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत एकूण 312 मतदार यादी भागाच्या अनूषंगाने ‘विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) अनूषंगीक कामे चालू असून त्याअनूषंगाने आज दिनांक 27 जूलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड येथे राजकीय पक्षाचे प्रतिनिधि यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधि उपस्थित होते. सदर बैठकीत आज रोजीपर्यंत वाटप झालेले गणना पत्र, मतदारांकडून परत बि.एल.ओ. यांचेकडे प्राप्त झालेले गणना पत्र तसेच Digitization झालेले गणना पत्र ( Enumeration Form ) ची माहिती सर्व उपस्थित प्रतिनिधि यांना देण्यात आली. 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आजरोजी पर्यंत Enumeration Form चे वाटप 95%, व Digitization चे 74 टक्के याप्रमाणे एकंदरीत 85 टक्के इतके काम पूर्ण झालेले आहे. यापूर्वी दिनांक 22 जूलै रोजी झालेल्या बैठकीत राजकीय पक्षाचे बि.एल.ऐ. यांनी सदर कामात सहकार्य करणे बाबत या कार्यालयाकडून आवाहन करण्यात आल्यानंतर अवघ्या 5 दिवसात कामाची एकंदरीत 13 टक्के एवढी प्रगती झाली आहे.
तसेच मतदार यादीत नांव समाविष्ठ आहे परंतू आजरोजी पर्यंत ज्या मतदारांचे Enumeration Form अद्याप सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे प्राप्त झालेले नाही असे मतदारांची यादी व सबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी Enumeration Form Uncollectable ( मयत, गैरहजर, स्थलांतरित, दुबार व इतर कारणांमूळे ) असे मार्क केलेले मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधि यांना PDF स्वरूपात देण्यात आली.
बि.एल.ओ. यांचेकडून Enumeration Form वाटप करण्यात आले परंतू बरेच मतदारांनी अद्याप सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे सदर फॉर्म भरून स्वाक्षरीसह जमा केलेला नाही तसेच विशेषतः सिडको, हडको, ईतवारा, चौफाळा व किला रोड या भागातील मतदारांचे Enumeration Form सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे जमा झालेले नाहीत त्यामूळे उक्त भागातील कामाची टक्केवारी कमी आहे.
करिता Uncollectable असलेले सर्व Enumeration Form सबंधित बि.एल.ओ. यांचेकडे जमा करावेत. तसेच आपण स्वतः देखिल प्रयत्न करावेत व वर नमूद केल्याप्रमाणे ज्या मतदारांनी सदर फॉर्म विहित मूदतीत बि.एल.ओ. यांचेकडे जमा केले नाही अथवा बि.एल.ओ. यांनी Enumeration Form Uncollectable असे मार्क केलेले आहेत अश्या मतदारांचे नांव प्रारुप मतदार यादीत समाविष्ठ होणार नाही तसेच ज्या मतदारांचे फॉर्म बि.एल.ओ. यांचेकडे जमा होतील केवळ त्याच मतदारांचे नांव प्रारुप मतदार यादीत समाविष्ठ होतील तसेच ज्या मतदारांचे नांव प्रारूप मतदार यादीत येणार नाहीत अश्या मतदारांनी आवश्यक पूरावे सादर केल्याशिवाय अंतिम मतदार यादीत देखिल नांवे समाविष्ठ होणार नाही असे डॉ.सचिन खल्लाळ, मतदार नोंदणी अधिकारी 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी उपस्थित प्रतिनिधि यांना सांगीतले.
यावेळी संजय वारकड सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार नांदेड, श्री नितेशकुमार बोलोलु, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसिलदार निवडणुक, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार संजय नागमवाड, 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नियुक्त सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधि उपस्थित होते.
0000000
वृत्त क्रमांक
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 27 जुलै :- मातंग बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती शनिवार 1 ऑगस्ट 2026 रोजी मोठया उत्साहात नांदेड जिल्हयात दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात येते. त्यामुळे 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यानंतर 2 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुध्दा जिल्हयातील ग्रामिण भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत असते. त्याअनुषंगाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्हयात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
30 जुलै 2026 चे 00:00 वाजता पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 चे 24:00 वाजेपर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढीलप्रमाणे लेखी किंवा तोंडी आदेश आप-आपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.
रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे कोणत्यारितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्ल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे अर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजाअर्चनाच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्क्यावर व धक्कयामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्या पुष्टी देणारे दुय्यम अधिका-यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबधी.
कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत.
सदरचा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो
पोलीस कायदा, कलम 134 प्रमाणे अपराधास
पात्र ठरेल. सदरचा आदेश 30 जुलै 2026 चे 00:00 वाजेपासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजीचे 24:00
वाजेपर्यत लागु राहिल, असेही आदेशात पोलीस अधिक्षक डॉ. नीलाभ
रोहन यांनी नमूद केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
कृत्रिम बुद्धिमत्ता वैद्यकीय क्षेत्रासाठी ठरणार वरदान ; "Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine" शैक्षणिक प्रायमर कार्यक्रम संपन्न
नांदेड, दि. 27 जुलै : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच Association of Physicians of India (API), Nanded यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या पुढाकाराने "Al in Medical Practice & Interesting Clinical Cases in Medicine " या विषयावरील शैक्षणिक प्रायमर कार्यक्रमाचे आयोजन २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ यावेळेमध्ये महाविद्यालयातील पी.एस.एम. लेक्चर हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षक, तज्ज्ञ डॉक्टर, ज्येष्ठ चिकित्सक, एम.बी.बी.एस. (UG) विद्यार्थी, इंटर्न (Intern) विद्यार्थी, पदव्युत्तर (PG) विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी "Al in Medical Practice" या विषयावर मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वैद्यकीय शिक्षण, रुग्णनिदान, संशोधन, उपचार पद्धती, क्लिनिकल प्रॅक्टिस तसेच भविष्यातील आरोग्यसेवेतील वाढता वापर आणि त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आरोग्यसेवा अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक होणार असून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन व निर्णयप्रक्रियेला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यानंतर डॉ. भाईमंगेश नाईक मुंबई यांनी "Interesting Clinical Cases in Medicine" या विषयावर वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ वैद्यकीय रुग्णप्रकरणांचे सादरीकरण करून त्यांचे निदान, चिकित्सकीय विचारप्रक्रिया आणि उपचार पद्धती यांचे प्रभावी विश्लेषण केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, निवासी डॉक्टर तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभवातून महत्त्वपूर्ण ज्ञान प्राप्त झाले.
अधिष्ठाता डॉ. सुधीर बी. देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शैक्षणिक कार्यक्रमास डॉ. हेमंत गोडबोले (उपअधिष्ठाता), डॉ. अनिल देगावकर (प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र), डॉ. इस्माईल इनामदार (विभाग प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र), डॉ. संजीव झांगडे (सहयोगी प्राध्यापक, श्वसनविकारशास्त्र), डॉ. अरविंद चव्हाण (सहयोगी प्राध्यापक, बालरोगशास्त्र), डॉ. सीमा डाके (सहाय्यक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र) तसेच डॉ. संदीप उप्पोड (सहाय्यक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र) यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, निवासी डॉक्टर, एम.बी.बी.एस. (UG) विद्यार्थी, इंटर्न (Intern) विद्यार्थी व पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी डॉ. दिलीप म्हैसेकर (माजी कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तथा माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व माजी अधिष्ठाता), डॉ. अरुण मान्नीकर, डॉ. डी. बी. जोशी, डॉ. मापारे, डॉ. कर्मवीर, डॉ. आर. अग्रवाल, डॉ. पंतगे तसेच डॉ. अनंत सूर्यवंशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमातून आधुनिक वैद्यकीय शिक्षणात कृत्रिम
बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, संशोधनातील
नव्या संधी तसेच क्लिनिकल निर्णयक्षमतेत होणारी सुधारणा याबाबत उपस्थितांना
मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील
ज्ञानवृद्धी, संशोधनाला चालना तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा
प्रदान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास निश्चितच मदत होईल,
असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी समुदाय वैद्यकशास्त्र ( PSM) विभागाच्या
पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांनी नियोजन, समन्वय व व्यवस्थापनामध्ये मोलाचे योगदान दिले.
00000
वृत्त क्रमांक
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड दि. 27 जुलै :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 3 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे.
या दिवशी महसूल, गृह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.
00000
वृत्त क्रमांक
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची पारडी येथे फार्मर कप स्पर्धेतील शेतकरी गटांना भेट
नांदेड दि. 27 जुलै:- फार्मर कप स्पर्धेअंतर्गत आज लोहा तालुक्यातील पारडी येथे शेतकरी गटांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी थेट शेतावर भेट दिली. यावेळी त्यांनी विविध शेतकरी गटांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले तसेच गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
भेटीदरम्यान एका शेतकरी गटाच्या निमंत्रकांनी ड्रोन प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांनी अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
याचवेळी कापूस उत्पादक गटांसाठी श्रेडर मशीनचे महत्त्व, त्याचे फायदे आणि शेतीतील उपयुक्तता याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. आधुनिक आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
या भेटीप्रसंगी लोहा उप विभागीय अधिकारी विलास नरवडे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी श्री. कासराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गावचे सरपंच, BRLF प्रादेशिक समन्व्यक दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रवीण काथवटे, उमेदचे रवि मोरताटे, प्रगतशील शेतकरी आणि शेतकरी गट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे शेतकरी गटांचा आत्मविश्वास वाढला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवचैतन्य मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
00000
वृत्त क्रमांक
कर्ज व गुंतवणूक तसेच शेतकरी कुटुंब स्थिती सर्वेक्षणाला सहकार्याचे आवाहन
राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 81 व्या फेरीअंतर्गत जुलै 2026 ते जून 2027 दरम्यान सर्वेक्षण
नांदेड, दि. 27 जुलै : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राष्ट्रीय नमुना पाहणी (NSS) 81 वी फेरी अंतर्गत ‘कर्ज व गुंतवणूक’ तसेच ‘शेतकरी कुटुंबाची परिस्थिती दर्शक पाहणी’ ही सर्वेक्षणे जुलै 2026 ते जून 2027 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहेत.
या सर्वेक्षणासाठी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करून अचूक व परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे उपआयुक्त अर्जुन झाडे यांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेडच्या वतीने केले आहे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाचे अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात सहभागी होत असून, त्यामधून ग्रामीण व शेतकरी कुटुंबांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा व्यापक आढावा घेतला जाणार आहे.
या पाहणीत जमीन मालकी व प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्र, पशुधन मालकी, शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न, उत्पादन साधने, कर्जबाजारीपणा, शेती पद्धती तसेच कृषीबाह्य व्यवसायांमधील उत्पन्न व खर्च याबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे.
तसेच कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षणात कुटुंबाची मालमत्ता, गुंतवणूक, कर्जाची रक्कम, कर्ज देणारी संस्था (संस्थात्मक किंवा असंस्थात्मक), व्याजदर, व्याजाचा प्रकार, कर्जाचा उद्देश व कालावधी आदी बाबींची माहिती गोळा केली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे शासनाला शेतकरी कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न काढण्यास मदत होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक गरजा यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करता येणार असून, शेतकरी व ग्रामीण विकासासाठी प्रभावी धोरणे आखण्यास मदत होणार आहे.
या सर्वेक्षणासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाचे कर्मचारी निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन मुलाखतीद्वारे विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. सर्वेक्षणादरम्यान संकलित करण्यात येणारी वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नगारवाडीतील प्रगतिशील शेतकऱ्याच्या सेंद्रिय शेतीला भेट
बांबू लागवड, एकात्मिक शेती व शाश्वत कृषी उपक्रमांचे केले कौतुक
नांदेड, दि. 27 जुलै : अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ जायभाये यांच्या एकात्मिक सेंद्रिय शेती प्रकल्पाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन विविध सेंद्रिय व नैसर्गिक शेती उपक्रमांची सविस्तर पाहणी केली. यावेळी ‘एक लक्ष बांबू लागवड’ उपक्रमांतर्गत शेतालगतच्या नाल्याच्या काठावर बांबूची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उत्तम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी अनिल वडजे, हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाचे प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रविण काटेवाढ, सरपंच सुधाकर जायभाये, उपसरपंच देवराव चव्हाण तसेच कृषी, महसूल, ग्रामपंचायत आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) व अश्वमेध संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतातील विविध उपक्रमांची पाहणी करताना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेली आंबा बाग, मनरेगाअंतर्गत उभारलेली सिंचन विहीर तसेच हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या गांडूळखत (वर्मी कम्पोस्ट) युनिटची पाहणी केली.
श्री. जायभाये यांच्या एकात्मिक शेतीमध्ये शेवगा, आंबा, जांभूळ, पेरू, चिंच, बोर, चिकू, आवळा, लिंबू, पपई, नारळ या फळपिकांसह काकडी, वांगे, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. याशिवाय झेंडू फुलशेती आणि त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.
यावेळी विश्वनाथ जायभाये, त्यांची पत्नी जोती जायभाये आणि मुलगा रामन जायभाये यांनी शेणखत, गांडूळखत (वर्मी कम्पोस्ट), जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर करून पिकांचे पोषण व संरक्षण कसे केले जाते, याची सविस्तर माहिती दिली. तसेच पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती, सेंद्रिय आच्छादन (मल्चिंग), जैविक कीड व रोग व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, सूक्ष्मजीवांची संख्या वाढून मातीची सुपीकता टिकून राहते. उत्पादन खर्चात बचत होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच रासायनिक अवशेषमुक्त अन्न उत्पादनामुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षणही होते.”
या भेटीदरम्यान नगारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक
नशामुक्त युवा – विकसित भारत अभियानांतर्गत 1 ऑगस्टला नांदेडमध्ये जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा
माय भारत पोर्टलवर नोंदणी करून युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 27 जुलै : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत आणि जिल्हा युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत 1 ऑगस्ट 2026 रोजी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी अश्नी कानकटे यांच्यासह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अंतर्गत रील/लघुपट (Reel/Short Film), संगीत/रॅप, थीम आधारित नृत्य, नुक्कड नाटक (पथनाट्य), स्लॅम पोएट्री, चित्रकला, घोषवाक्य लेखन तसेच वक्तृत्व/वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी MY Bharat पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणी पोर्टलवरील संबंधित लिंकद्वारे करता येईल.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, माय भारत स्वयंसेवक तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ते यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, नांदेड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी :
मोबाईल : 9167732279
ई-मेल : mybharatnanded@gmail.com
ऑनलाइन नोंदणी : https://mybharat.gov.in/events/nasha_mukt_yuva
000000
वृत्त क्रमांक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १७ बालकांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाण्याला रवाना
१०९ बालकांची हृदय तपासणी; पात्र बालकांवर कीम्स हॉस्पिटलमध्ये होणार उपचार
नांदेड, दि. २७ जुलै : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. यापैकी जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त १७ बालकांची हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ठाणे येथील कीम्स हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रियेसाठी तपोवन एक्सप्रेसने आज रवाना करण्यात आले.
राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालकांमधील जन्मजात व्यंग, कुपोषण, विकासात्मक अडचणी तसेच विविध आजारांचे लवकर निदान व उपचार करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांमार्फत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील आणि एकदा शाळेतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते.
या कार्यक्रमांतर्गत जन्मजात व्यंग (Defects), पोषणमूल्यांची कमतरता (Deficiencies), विकासात्मक विलंब (Developmental Delays) आणि विविध आजार (Diseases) यांचे निदान व उपचार केले जातात. तसेच हृदयरोग, नेत्रविकार, आकडी (फेफरे) आदींसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करून आवश्यक औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात (NRC) दाखल करून उपचारासह पालकांना बुडीत मजुरीचा लाभही दिला जातो. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) मार्फत जन्मजात व्यंग किंवा विकासातील अडचणी असलेल्या बालकांवर वेळेत उपचार करून भविष्यातील गुंतागुंत टाळण्याचे कामही केले जाते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर डॉ. रेखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि डॉ. अविनाश दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर पार पडले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या १७ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरबीएसके समन्वयक अनिल कांबळे, डीईआयसी व्यवस्थापक विठ्ठल तावडे, अनिता चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
पत्रकार परिषद निमंत्रण
ई-मेल संदेश दि. २७ जुलै 2026
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने ‘नशा मुक्त युवा-विकसित भारत’ या अभियानाअंतर्गत दिनांक 31 जुलै 2026 रोजी यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आज सोमवार 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, बैठक कक्ष नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
तरी आपण पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 27 जुलै 2026 (सोमवार)
वेळ :- सकाळी 11 वा.
स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
प्रमोद धोंगडे
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
सुधारित
विशेष वृत्त क्रमांक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
आधार प्रमाणीकरण व अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करा; अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. २७ : राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत सोमवार दुपारी १२ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ८४७ शेतकऱ्यांची लाभार्थी यादी अपलोड करण्यात आली आहे. यापैकी ९९ हजार ५४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, केवळ १४ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी सोमवार दुपार १२ पर्यंत पूर्ण झाली आहे. तर ८५हजार ५४ पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही.
त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण व अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हयातील कर्जमुक्तीचा आढावा घेतला.
आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमाफीचा लाभ मिळेल, तसेच ते पुन्हा नव्याने पीककर्ज घेण्यासही पात्र ठरतील.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘सीएससी (CSC) केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यावेळी लाभार्थी यादीतील नावाची खात्री करून अंगठ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे.
जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात असून, आधार संलग्नीकरण, आधार प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची अत्यावश्यक अट आहे. सदर योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्र, सी एस सी केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क लागू नाही. कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्र चालक किंवा सी एस सी केंद्र चालकाने शुल्क आकारू नये अशीही सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.
०००००
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...




.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)


.jpeg)



.jpeg)
.jpeg)



