Tuesday, August 24, 2021

 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी एअर मार्शल व्ही ए पाटकर गौरव पुरस्कार 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक / विधवा यांचे पाल्य दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यामधून दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एका पाल्यास दिला जातो. या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

000000

 

 

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 370 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 722 एवढी झाली असून यातील 88 हजार 29 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 32 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे किनवट तालुक्यातर्गंत 1 तर अर्धापूर तालुक्यातर्गंत 1 असे एकूण 4 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 32 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 862

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 97 हजार 914

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 722

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 29

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-32

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एकलव्य निवासी शाळांची प्रवेशप्रक्रिया सुरू

अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेमध्ये (एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल) प्रवेश इयत्ता 6 वीच्या वर्गासाठी तसेच इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

ही परीक्षा कोविड-19 च्या प्रार्दुभाव मुळे रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार होती परंतू परिक्षा रद्द झाल्याने प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकिय व अनुदानीत आश्रम शाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याच्या मागील सत्राच्या (2020-21) गुणाच्या आधारे विद्यार्थ्याची निवड होणार आहे. 

इयत्ता 6 व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्याना प्रवेश परिक्षेचे अर्ज भरावयाचे आहे त्यानी पाचव्या वर्गातील गुण भरण्याचे निर्देश शासनाकडून दिले आहेत. हा निकष इयत्ता सातवी ते नववीच्या रिक्त जागेवरील प्रवेशाबाबत लागू करण्यात आला आहे. मागील सत्रातील एकंदर 900 गुणांपैकी विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले त्याआधारे निवड यादी जाहिर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या गुणाच्या ऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही. विद्यार्थ्याचा अर्ज भरताना आवेदनपत्रात दिलेला संपर्क / मोबाइल नंबर आवश्यक आहे. विद्यार्थ्याची जन्म तारीख, मागील वर्षाच्या इयतेच्या गुण पत्रीकेची प्रत आवश्यक आहे. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्याचे आवेदन पत्र भरलेले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रीका स्वतंत्र अपलोड करावे. 

इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या रिक्त जागा भरण्यासाठी अनुसुचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आली आहेत. यासाठी htt://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्याचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापकांनी या लिंकवर अर्ज ऑनलाइन भरुन त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील student id माहित असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतीम मुदत मंगळवार 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे. 

प्रवेश अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या बाबी 

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नोंदणी अर्ज htt://admission.emrsmaharashtra.com या लिंकवर क्लिक करुन भरावा. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्याचा सरल / स्टुडन्ट आयडी माहित असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थी अनुसूचित /आदिम जमातीचा असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न रुपये 6 लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थ्याची निवड मागील वर्षातील वार्षीक परिक्षेच्या गुणाच्या आधारे करण्यात येईल. विद्यार्थ्याच्या शाळेची निवड अर्जामध्ये नमुद केलेल्या पत्रानुसार करण्यात येइल. विद्यार्थ्यास एकुण 900 पैकी प्राप्त गुण नमुद करावे लागतील. त्याचप्रमाणे संबंधीत इयत्तेचे गुणपत्रक प्रवेश अर्जासोबत अंतर्भुत (अपलोड) करावे लागेल. अर्जदार विद्यार्थी आदिम जमातीचा असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावे. अर्जदार विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावी. अर्ज 31 ऑगस्टनंतर कुठल्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाही, असेही आवाहन केले आहे.

00000

 

विना निविदा बरोजगारांच्या सोसायट्यांना कामे द्यावी

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  सुशिक्षीत  बेरोजगारांनी स्थापन केलेल्या बेरोजगांराच्या सेवा सहकारी संस्थांची कामे गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहेत. सदर प्रश्न हा बेरोजगारांशी निगडीत असल्यामुळे आपल्या विभागार्फत करण्यात येणाऱ्या 3 लाख रुपये किंमतीची कामे विना निविदा देण्याची मागणी आहे. यामध्ये रंगरंगोटी, सजावट, स्वच्छता, साफसफाई, बांधकाम, संशोभिकरण, इमारत दुरस्ती, नवीन साहित्य खरेदी इत्यादी कामे उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार सोसायटयांच्यावतीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आली आहे.

00000

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 15 सप्टेंबरपर्यत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यास 15 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावीत, असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे.     

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी, बारावी, पदवी पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात आली आहेत. ज्येष्ठता व गुणक्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मार्कशीट,जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रक, उत्पनाचा दाखला, छायाचित्र, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर (दूरध्वनी क्रमांक 02462-220088) नांदेड येथे मुदतीत प्रत्यक्ष अर्ज करता येतील, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जी. जी. येरपवार यांनी केले आहे.

000000

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 25 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर व प्रत्येकी 100 डोस व तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा,माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, हदगाव, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, मांडवी, लोहा,माहूर, मुदखेड, बारड, कंधार, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 23 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 9 लाख 60 हजार 255 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 6 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 58 हजार 40 डोस याप्रमाणे एकुण 10 लाख 64 हजार 70 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने 25 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पक्षकारांनी 25 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ई. बांगर व सचिव आर.एस.रोटे यांनी केले आहे.  

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.  

या लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कळविले आहे.

0000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...