Friday, November 17, 2023

रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून पहिली पाणी पाळी 25 नोव्हेंबर पासून सुरु

 रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून पहिली पाणी पाळी 25 नोव्हेंबर पासून सुरु 


नांदेड (जिमाका) 17 :- जिल्ह्यातील निम्न मानार प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवून रब्बी हंगाम 2023 साठी तीन पाणीपाळया देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पातून प्रथम रब्बी हंगामासाठी पाणी पाळी 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरुन सिंचनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

निम्न मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी  रब्बी हंगामी, दुहंगामी तसेच हंगामातील इतर उभी पिके या पिकासाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यातील उपसा, नदीनाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना नंबर 7,  7() 7() मध्ये पाणी अर्ज सादर करावेत. 

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेवूनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाळी 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. निम्न मानार प्रकल्प गोदावरी शाखा कालवा क्रं. 1, कालवा क्र. 2 व डावा कालवा, उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचनालयाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2023-24 मधील पाणीपाळीचा प्रस्तावित नियोजन पुढीलप्रमाणे आहे. आवर्तन क्र. 1 चा कालावधी 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 पर्यत आहे. आवर्तन क्र. 2 चा कालावधी 30 डिसेंबर ते 13 जानेवारी  2024 असून आवर्तन क्र. 3 चा कालावधी 29 जानेवारी 2024  ते 13 फेब्रुवारी 2024 असा प्रस्तावित आहे.

पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होवू शकतो. तरी प्रकल्प क्षेत्रातील सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावीअसे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता आ.शि. चौगुले यांनी केले आहे.

000000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 नोव्हेंबर  2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 डिसेंबर 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

आठ तालुक्यातील 25 महसूली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित

 आठ तालुक्यातील 25 महसूली मंडळात

 दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण 750 मि.मि.पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे, अशा 25 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती लागू केलेल्या 8 तालुक्यातील 25 महसूली मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेले तालुके व महसुल मंडळामध्ये हदगाव तालुक्यातील निवघा, पिंपरखेड या महसूल मंडळाचा समावेश आहे. नांदेड तालुक्यातील वजीराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा बु, या मंडळाचा तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम, जवळगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे. नायगांव तालुक्यातील कुंटूर, नायगाव खै., बरबडा या मंडळाचा तर कंधार तालुक्यातील कंधार, कुरूळा, फुलवळ, पेठवडज, उस्माननगर, बारुळ या महसूल मंडळाचा समावेश आहे. मुखेड तालुक्यातील मुखेड, जांब बु., मुक्रामाबाद तर लोहा तालुक्यातील कापसी (बु.) कलंबर, सोनखेड  यांचा तर देगलूर तालुक्यातील हणेगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे.

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 25 महसूल मंडळात शासनाने विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्रचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश असणार आहे.  

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या महसूल मंडळातील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी  गावातील खातेदारांना लागू करण्यात आलेल्या सवलती व उपाययोजना देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

0000

 

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

20 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 नोव्हेंबर 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 कुष्ठरोग व क्षयरोग तपासणीसाठी

आरोग्य पथक पोहोचणार घरोघरी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         जिल्ह्यात क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीमेस 20 नोव्हेंबरपासून सुरुवात

·         25 लाख 65 हजार 958 लोकांची होणार तपासणी 

·         आरोग्य पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  समाजात नजरेत न आलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग याचा प्रसार होवू नये यासाठी वेळीच उपचार महत्वाचा असतो. समाजात असलेल्या या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर करुन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बाधित रुग्णांवर उपचार करून या रोगांच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी ही मोहीम 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यात राबविली जाणार आहे. या मोहीमेत घरी येणाऱ्या आरोग्य पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येईल. तपासणीत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर नागरिकांनी या आजारावर मोफत उपचार करून घ्यावेतअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 2027 पर्यंत नांदेड जिल्हा कुष्ठमुक्त करण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार केला आहे. या पुस्तिकेचे विमोचन बैठकीत करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेउप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळमसमाजसेवी डॉ. अशोक बेलखोडे, हिंद कुष्ठ निवारण संघचे डॉ.पाटोदेकरजागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अमोल गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी प्रतिनिधी डॉ. मिरदोडे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिसेनसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. बालन शेख आदीची उपस्थिती होती.


यावेळी सहाय्यक संचालक डॉ. बालन शेख यांनी या मोहिमेबाबत सादरीकरण करून ही मोहीम 20 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र व शहरी भागात निवडक ठिकाणी होणार असल्याचे सांगितले.

या मोहीमेत दोन व्यक्तींचे पथक बनवून ज्यात एक स्त्री आणि एक पुरुष स्वयंसेवक असणार आहेत. हे पथक या काळात घरोघरी भेटी देऊन कुटुंबातील सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोगाच्या लक्षणाच्या आधारावर संशयित रुग्णांचा शोध घेऊन नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत निदान निश्चित करून उपचार सुरु करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

मोहीमेसाठी 2 हजार 669 पथके

क्षयरोगी व कुष्ठरोगी शोध मोहीमेचा कालावधी 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 असून एकूण 5 लाख 13 हजार 191 घराना आरोग्य पथक भेट देणार आहे. या मोहीमेत एकूण 25 लाख 65 हजार 958 लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 2 हजार 669 पथके तयार केली असून या पथकांचे पर्यवेक्षण करण्यासाठी 534 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.  

संशयित कुष्ठरोगाची ही आहेत लक्षणे

त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टात्याठिकाणी घाम न येणेजाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचात्वचेवर गाठी असणेकानाच्या पाळया जाड होणेभुवयाचे केस विरळ होणेडोळे पूर्ण बंद करता न येणेतळहातावरतळपायावर मुंग्या येणेबधिरता येणेजखमा असणेहातापायाची बोटे वाकडी होणेहात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे,त्वचेवर गरम आणि थंड याची संवेदना नसणेहातपायात अशक्तपणा जाणवणेहातातून वस्तू गळून पडणेचालताना पायातून चप्पल गळून पडणे.

क्षयरोगाची ही आहेत लक्षणे

दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकलादोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा तापवजनात लक्षणीय घटभूक मंदावणेथुंकीवाटे रक्त पडणेमानेवर गाठी येणे.

0000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...