Saturday, June 18, 2022

लेख

दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ! 

सध्या मान्सूनचा कालावधी सुरू असून दरवर्षी मान्सून व मान्सूमपूर्व काळात आकाशात वीजेचा गडगडाट होवून विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. विज पडून मोठया प्रमाणात जीवीतहानी होवून अनेक शेतकरी, सामान्य नागरिक याला बळी पडतात. वीज पडून जीवीत हानी होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्व सूचना देते. शेतकरी व नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी या ॲपचा अवश्य वापर करावा. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनीट अगोदर हे वीज पडण्याचे संकेत तसेच विजांच्या गडगडाटाबरोबरच त्याचा वेग किती आहे हे सुध्दा ॲपवर कळते. दामिनी ॲपच्या माध्यमातून याचा अंदाज वर्तविला जात असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजे सावध राहून जीवित व वित्तहानी वेळीच टाळता येते.

 

दामिनी ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवतालच्या वीज पडत असल्यास ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. ग्रामीण भागातील सर्व नागरिक, शेतकरी, गुराखी, मेंढपाळ यांनी दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. दामिनी ॲपमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्लटनुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देवून, होणारी जीवीत व वित्तहानी  टाळावी.

 

मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावे.  दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.

 

अलका पाटील, माहिती सहाय्यक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000

 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी

19 जून रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा  

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएससन 2021-22 ही घेतली जात आहे. ही परीक्षा रविवार 19 जून 2022 रोजी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पुढील परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

 

रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 3 यावेळेत दोन सत्रात जिल्ह्यातील 13  परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थी, मुख्याध्यापकशिक्षकपालकांनी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परीक्षेसंबधी काही अडचण आल्यास जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगरदिलीपकुमार बनसोडे आणि विज्ञान पर्यवेक्षक बाजगीरे माधव यांच्याशी 7745851643, 9011000970, 9421293747  या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

 

आयोजित करण्यात आलेली परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. नुतन जि.प.प्रा.शाळा भोकर, जनता हायस्‍कूल नायगाव, महात्‍मा ज्‍योतिबा फुले उमवि गोकुंदा किनवट, श्री शिवाजी हायस्‍कूल कंधार, केंब्रिज माध्‍यमिक विद्यालय शिवाजीनगर नांदेड, मानव्‍य विकास उमवि देगलूर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद नांदेड, पंचशील विद्यार्जन विद्यालय हदगाव, श्री संत गाडगेबाबा महाराज उमवि लोहा, नुतन हायस्‍कूल, उमरी, मिनाक्षी देशमुख हायस्‍कूल अर्धापुर, महात्‍मा गांधी उमवि मुदखेड, लिटल फॅ्लावर कॉव्‍हेन्‍ट स्‍कूल बिलोली ही परीक्षा केंद्र आहेत.

000000

 शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका), दि. 18 : शिष्‍यवृत्‍ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन 2021-22 ही रविवार 19 जून  2022 रोजी जिल्ह्यात 13 परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 19 जून रोजी सकाळी 8.30 ते सायं 5 वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी,आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

000000 

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून मंगळवार 19 जुलै 2022 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा सोमवार 20 जून 2022  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मंगळवार 19 जुलै 2022  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना, भाविकांना लागू राहणार नाही.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...