Wednesday, March 20, 2019


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
निवडणूक निरिक्षक (खर्च) म्हणून
विरेंद्र सिंघ यांची नियुक्ती
नांदेड, दि. 21 :- निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची घोषणा केली आहे. त्यानुसार 16 नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी विरेंदर सिंघ यांची निवडणूक निरिक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 16-नांदेड लोकसभा परिक्षेत्रातील नागरिकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूककरीता आपल्या काही तक्रारी असतील तर त्यांनी 9022069690 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा निवडणूक निरीक्षक कक्ष यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 16, नांदेड लोकसभा मतदारसंघ यांनी केले आहे.
00000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात 6 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 23 मार्च ते 4 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...