Wednesday, December 4, 2019


 पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीस
पात्र ठरलेल्यांसाठी अभिरुप मुलाखतीचे आयोजन

     नांदेड दि. 4 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या नांदेड जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी अभिरुप (मॉक) मुलाखतीचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
उज्वल नांदेड या नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून अभिरुप (मॉक) मुखलखतीचा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता यावे यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. या अभिरुप मुलाखतीमध्ये पॅनल सदस्य म्हणुन मनोहर भोळे, डॉ. अभिजीत फस्के  पोलीस उपअधिक्षक, रोहीत काटकर सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी, बालाजी चंदेल (पो.नि) मुख्य गुप्त वार्ता अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या बायोडाटासह नाव नोंदणी सेतु समिती संचलीत स्पर्धा परिक्षा अभ्यासिका, श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टेडीयम परिसर नांदेड येथे करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण
13 डिसेंबर रोजी बचत भवन येथे बैठक
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत पंचायत समिती निहाय वाटप करण्यासाठी बैठक शुक्रवार 13 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे दुपारी 4 वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नांदेड जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी त्यांना सद्यस्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसापासून पुढील उर्वरीत कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (विमुक्त जाती, भटक्या जमातीसह) आणि महिला (अशा जाती, जमाती, आणि प्रवर्ग यामधील महिलांसह) सर्व साधारण प्रवर्ग व या प्रवर्गातील महिलांसाठी पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत पंचायत समिती निहाय वाटप करण्यास्तव शुक्रवार 13 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 4 वा. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ही बैठक आयोजित केली आहे.
00000


मानवी हक्क दिनानिमित्त मंगळवारी
विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, निरीक्षकगृह आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.
00000


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
शिबिराचे आज आयोजन
नांदेड, दि. 4 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने  गुरुवार 5 डिंसेबर रोजी डॉ. करराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर हे 5 डिंसेबर 2019 रोजी सकाळी 10 ते 5या वेळात पुणे येथील प्रा. सचिन ढवळे हे  गणीत बुध्दीमत्ता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ  यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या मार्गदर्शनशिबिरास स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000


प्रधानमंत्री श्रम योगी मानधन  
असंघटीत कामगारांसाठी पेन्शन योजनेचे उद्घाटन संपन्न
नांदेड, दि. 4 :- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) व राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS-Traders) सप्ताह 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत सहाय्यक कामगार कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सौ. दिक्षाताई धबाले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जीएसटी सहाय्यक आयुक्त डॉ. अविनाश चव्हाण, सांख्यिकी अधिकारी एन. जी. बास्टवार, गांधी आंबेडकर मजूर संघटनेचे अध्यक्ष अॅड. विष्णु गोडबोले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलित करुन झाले.
यावेळी महापौर श्रीमती धबाले यांनी असंघटीत कामगारांसाठी समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवून या योजनेची माहिती देऊन याचा लाभ असंघटीत कामगारांना जास्तीत जास्त मिळवून दयावा, असे  प्रतिपादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री खल्लाळ यांनी या योजनेबाबत मत मांडताना भूतकाळातील उदाहरणे देऊन योजनेचे महत्व अधोरेखित केले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे मदत करेल असे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकात जास्तीत जास्त पोहचावे या योजनेच लाभ घ्यावा, असे अवाहन केले.
या पेन्शन योजनेत वय 18 ते 40 या वयोगटातील कामगारांना नोंदणी करता येते. वयानुसार कामगारांनी हप्ता भरणे आवश्यक आहे. जेवढी रक्कम कामगार भरणार तेवढीच रक्कम केंद्र शासन जमा करणार आहे. वय 18 पासून वयाच्या 60 वर्षापर्यंत लाभार्थी हप्ता जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित लाभार्थी 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेंतर्गत असंघटित कामगार जसे रिक्षाचालक, घरकाम करणारे, फेरीवाले, गृहउद्योग करणारे, वीटभट्टी, चर्मकार, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, मच्छीमार, मासे उत्पादक, मासे सफाई करणारे कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, हातमाग कामगार, चर्मउद्योग कामगार आणि अन्य व्यवसाय करणारे कामगारांचा समावेश करण्यात आला आहे.
जीएसटी विभागाचे प्रकाश गोणार, वैद्यकीय अधिकारी डॉ. चामालवार, डॉ. बोनगुलवार, श्रीमती जयसवाल, कार्यक्रमाचे गांधी आंबेडकर मजूर संघटना विष्णु गोडबोले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माथाडी निरीक्षक डी. पी. फुले यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन. अ. सय्यद, ए. डी. कांबळे सुविधाकर देगलूर, एस. ए. जुगदार सुविधाकर किनवट, श्रीकांत भंडारवार सुविधाकर, अनवर शेख सुविधाकर कंधार, सुखदेव राठोड, श्री.वाघाळकर, असगर हुसेन, मोहम्मद अल्ताफ, प्रकाश शिरसाठ, मनोज घोडगे, मंगेश इज्जपवार, श्री राचुटकर, अश्विनी शिरडकर यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन अॅड. विष्णु गोडबोले तर आभार श्री. फुले माथाडी निरिक्षक यांनी मानले.
याप्रसंगी या योजनेला यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध घटक, सेवा भावीसंस्था व सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेने उस्पृतपणे पुढे यावे जेणे करुन या योजनेची यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन आयोजक सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद यांनी सांगितले.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...