Friday, February 16, 2024

 वृत्त क्र. 140

 

महासंस्कृती महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची थाटात सुरुवात

नवा मोंढा मैदानावर नृत्य, नाट्य, गीत, गायनाचा बहारदार कार्यक्रम

 

·    शनिवारी 'आदि माया आदि शक्ती'' कार्यक्रमाचा आविष्कार

·   प्रवेश नि:शुल्क कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- नांदेड महासंस्कृती महोत्सवातील कालच्या साहसी शिवकालीन क्रीडा प्रकारानंतर आज ढोलकी, सनई, हलगी, वाद्यवृंदांसह महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील नाट्य, वाद्य व लोकसंगीताची मैफल नवीन मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर रंगली. जिल्ह्यातील सर्व स्तरातील जनतेने मोठ्या संख्येने या सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेतला.

 

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती महोत्सव 15 फेबुवारीपासून सुरू झाला आहे. सुरुवातीला नांदेड जिल्ह्यातील प्रथितयश कलावंतांचे सादरीकरण झाले. यामध्ये पारंपारिक पाटा गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (मोहन मेश्राम आणि संच) आदिवासी भागामध्ये हे गायन अतिशय लोकप्रिय आहे. शिवराज शिंदे व चमूचे लोकवाद्यवृंद (फोक आर्केस्ट्रा), अंजली देशमुख यांच्या सुहासिनी क्रीएटीव्ह चमूमार्फत पारंपरिक मंगळागौर सादर करण्यात आली. बापुराव शेडमाथे ढेमसा मंडळामार्फत (शिवरामखेडा) किनवट यांचे दंडार नृत्य, शिवराज शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला. सनई, हलगी वादन (दिलीप खंडेराय) लोकसंगीत (अंध विद्यालय बोधडी) कोलाम समूह नृत्य (मनीषा मडावी व चमू) लेहंगी नृत्य (सेवालाल बंजारा मंडळ मांडवी) दिवली लोकनृत्य (एमजीएम महाविद्यालय, नांदेड), छत्रपती दर्शन (दिलीप खंडेराय) सादर करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचा लोकोत्सव हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सुशांत शेलार या सिने कलाकारांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनात संदीप पाठक यांच्या निवेदनात नृत्य गायनाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

   

बचत गटाचे भव्य दालन

या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विरुद्ध बाजूने मोठ्या संख्येने बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले आहे. रानमेवा, मसाले, पादत्राणे, कपडे, घर सजावटींच्या वस्तू, कौशल्य विकास विभागापासून तर आरोग्य विभागापर्यंत विविध विभागाचे स्टॉल, विविध कृषी उत्पादने, आयोजनाची भव्यता विषद करणारे हे स्टॉल. मैदानावर कुटुंबासोबत येणाऱ्या रसिक प्रेक्षकांची वाट बघत असून मोठ्या संख्येने नांदेडकरांनी खरेदीसाठी तसेच विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.

 

प्रवेश निःशुल्क, पासेसची गरज नाही

जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम सामान्यातील सामान्य माणसाने बघावा यासाठी आयोजित केलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवेशिका या ठिकाणी आवश्यक नाही. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

आजचे कार्यक्रम

17 फेब्रुवारी रोजी सायं. 6 ते रात्री 10 या कालावधीत 'आदि माया आदि शक्ती ' या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताच्या बहारदार कार्यक्रमाचे तसेच प्रथीतयश स्थानिक कलावंताचे लोकसंगीताचे कार्यक्रम होणार आहे. 

000000




























 वृत्त क्र. 139

महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन खेळांच्या स्पर्धेचा निकाल जाहिर

·         विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण

नांदेड (जिमाका) दि. 16 :- संपूर्ण महाराष्ट्रात वेगळा प्रयोग म्हणून नांदेडच्या महासंस्कृती महोत्सवातील शिवकालीन साहसी व चित्तथरारक खेळाच्या सत्राचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. पोलीस कवायत मैदानावर सायंकाळी चार वाजता हा बक्षीस समारंभ पार पडला.

क्रीडा स्पर्धाना 15 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे सुरवात झाली होती . पारंपारिक वाद्यांच्या गजरात खो-खोकबड्डीलेझीमकुस्तीमल्लखांबआटया-पाटयालाठीकाठीरस्सीखेचगतकालगोरी या खेळांच्या चित्तथरारक व रोमहर्षक प्रात्यक्षिकांनी झाली होती. या खेळांच्या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना आज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते बक्षिस देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास मानेप्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगेतहसीलदार संजय वारकडक्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार आदीची उपस्थिती होती.

जिल्हास्तरीय महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन पारंपारिक खेळ स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे आहे. लेझीम स्पर्धा (महिला गट) प्रथम महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेडद्वितीय महात्मा फुले हायस्कूल विजय नगर नांदेडतृतीय श्रीनिकेतन हायस्कूल दिपनगर नांदेड.

आट्या पाट्या (महिला)- प्रथम शांतिनिकेतन हायस्कूल नांदेडद्वितीय जिल्हा परिषद हायस्कूल वाघीतृतीय विद्याभारती स्कूल उमरी.

आट्यापाट्या (पुरुष गट) प्रथम विद्याभारती स्कूल उमरीद्वितीय श्रीनिकेतन हायस्कूल नांदेडतृतीय जिल्हा परिषद हायस्कूल वाघी.

कबड्डी (पुरुष गट) प्रथम इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय मेंढला तालुका मुदखेड,  व्दितीय शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दुधड तालुका हिमायतनगरतृतीय बसवेश्वर हायस्कूल कामठा तालुका अर्धापूर.

कबड्डी (महिला गट) प्रथम इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय मेंढला तालुका मुदखेडद्वितीय शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दुधड तालुका हिमायतनगरतृतीय लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद.

लाठीकाठी स्पर्धा-  (मुले डबल)- प्रथम- गौतम संघपाल भंडारेद्वितीय प्रेम नारायण कांबळेतृतीय शिवकांत सुनील गुंडले,  लाठीकाठी (मुली डबल)-   प्रथम सावली सूर्यकांत थोरातश्रद्धा धम्मानंद जोंधळे द्वितीय तर तृतीय शुभांगी मारुती आरोळे.

लाठीकाठी (सिंगल मुले गट) प्रथम विजय शिवाजी तेलंगद्वितीय संस्कार सोपान शेळकेतृतीय भावेश संघरत्न सोनसळे. लाठीकाठी (मुली सिंगल) प्रथम सुप्रिया संजय शिंदेद्वितीय मयुशे भीमराव निखातेतृतीय अस्मिता जीवन जाधव.

लगोरी (मुले) प्रथम इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल नांदेड,  द्वितीय संजय गांधी हायस्कूल भोगाव तालुका जिल्हा नांदेडतृतीय एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मोंढा नांदेड,

लगोरी (मुली गट) प्रथम  इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल नांदेडद्वितीय एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मोंढा नांदेडतृतीय एकनाथ पाटील अकॅडमी नवीन मोंढा नांदेड.

गतका- प्रथम हरप्रीतसिंघद्वितीय हरजींदरसिंघतृतीय हरविंदरसिंघ. गतका एक अंगी-  प्रथम जसदीपसिंघद्वितीय निशानासिंघतृतीय रणजीतसिंघ.

खो खो मुले संघ-  प्रथम जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडाव्दितीय-  इंदिरा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सिडको नवीन नांदेडतृतीय शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर,

खो-खो (मुली संघ) प्रथम जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा पारडी तालुका लोहाव्दितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरटवाडी तालुका हदगावतृतीय शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर.

मल्लखांब पुरलेला (मुले गट) प्रथम शैलेश सुरेश मद्दलवारद्वितीय कृष्णा किशोर जाधव व तृतीय सुगत प्रल्हादराव सोनटक्के. रोप मल्लखांब (मुली) प्रथम पूजा गंगाधर शिरगिरेद्वितीय क्रिपा मनोज शितळेतृतीय श्रद्धा चंद्रकांत फुगारे.

रस्सीखेच (पुरुष) प्रथम जय शिवराय संघ ईजळी, द्वितीय मनकामेश्वर संघ देगाव, तृतीय आर.आर.संघ सिडको. रस्सीखेच (महिला) प्रथम राणीलक्ष्मीबाई  संघ, सिडको नवीन नांदेड, द्वितीय मुक्ता साळवे संघ साठेनगर नांदेड, तृतीय सावित्रीबाई फुले संघ देगाव नांदेड .

00000









 वृत्त क्र. 138 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश


नांदेड (जिमाका) दि. 16 :- दिनांक 19 फेबुवारीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जिल्हयात जोरदार तयारी सुरू आहे. शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावर यावर्षीची शिवजयंती उत्साहात साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 
 फेब्रुवारी 2024 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनांक 19 फेब्रुवारी 2024 निमित्त विविध उपक्रमासंदर्भात करावयाच्या आयोजनाबाबत निर्देश दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखकार्यालय प्रमुख यांनी शासकीय,निमशासकीय कार्यालयात जयंती निमित्त विविध उपक्रम आयोजित करावेत. ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरावर व विविध संस्थांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात यावा तसेच शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. छत्रपतींच्या प्रेरणादायी जीवन चरित्रावर आधारित विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करावेया संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावेअसे आवाहन त्यांनी केले आहे.

0000 

 वृत्त क्र. 137 

मधकेंद्र योजनेअंतर्गत भंडारवाडी येथे जनजागृती मेळावा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 16 :- मधकेंद्र योजने अंतर्गत किनवट तालुक्यातील मौजे. भंडारवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी एक दिवशीय जनजागृती मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास मधुमक्षिका पालन योजना, मधाचे गांव, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास सन्मान योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांची माहिती देण्यात आली.  

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिमान गादेवाड, महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक व प्रमुख मार्गदर्शक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. सारंगधर, मध निरीक्षक डि. व्हि. सुत्रावे व  ग्रामसेवक उमेश तुपकर तसेच उपसरपंच केंद्रे, सदस्य जेवलेवाड, भंडारवाडी येथील ग्रामस्थ महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
 
या कार्यक्रमास मान्यवरांनी मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहिती दिल्याबाबत भंडारवाडीचे सरपंच अभिमान गादेवाड यांनी आभार मानले. भंडारवाडी हे गांव मराठवाडयातील एकमेव ‘मधाचे गाव’ म्हणून  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मंडळाचे सभापती रविन्द्रजी साठे (राज्यमंत्री दर्जा),  मंडळाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विमला आर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना विकसीत करण्यात येत आहे.
0000

 वृत्त क्र. 136 

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी लातूर ला 24 ला

राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा

नांदेड (जिमाका) दि. 16 :- सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना मोठया प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लातूर येथे 24 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

या मेळाव्याचे उत्तम रितीने नियोजन करावे यादृष्टीने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालय, छ.संभाजीनगर येथे बैठक घेतली. या बैठकीस लातूरचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूरच्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व  कार्यकारी अभियंता छ. संभाजीनगर, छ.संभाजीनगर येथील प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, उपआयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, कामगार उपआयुक्त, छ.संभाजी नगर, सहायक आयुक्त लातूर, सहसंचालक तंत्रशिक्षण, सहसंचालक उच्चशिक्षण, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था, प्रादेशिक उपआयुक्त, सामाजिक न्याय विभाग, छ.संभाजीनगर/लातूर सहसंचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ छ.संभाजीनगर व विभागातील इतर सर्व जिल्हयाचे जिल्हाधिकारी व सहायक आयुक्त हे दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.  

या नमो महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त नियोक्ता, बँकींग लॉजीस्टीक, सेल्फ मार्केटिंग हॉस्पीटॅलीटी, आरोग्य सेवा, पुरवठा साखळी, उत्पादन, स्मार्ट प्रकल्प यासारख्या विभागाचा समावेश आहे. नमो महारोजगार मेळाव्यासाठी बंदिस्त दालन स्टॉल उभारणे, पिण्याचे पाणी, साहित्य सामग्री, स्वच्छता, पाणी, विज, शौचालय, वाहनतळ आणि वाहतूक व्यवस्था आदी सुविधाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

00000 

 राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी

प्रवेशिका पाठविण्याकरीता 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

            मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरीता दि.29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...