Saturday, January 8, 2022

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण 

·         समाज कल्याणच्या वेबसाईटचे लोकार्पण 

नांदेड (जिमाका) दि.8 :- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व त्यांना आवश्यक त्या भौतिक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वाटप पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. तृतियपंथ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी गौरी बक्ष व इतर सहा तृतियपंथ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच नांदेड येथे किन्नर भवन उभारण्यात येणार आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या सोई-सुविधेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यावेळी दिली. 

समाज कल्याण विभागाच्या samajkalyannaded.in या वेबसाईटचे लोकार्पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामुहिक योजना या ऑनलाईन पद्धतीने राबविण्यासाठी ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. 

समाजकल्याण विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यात पुढील पाच वर्षात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे नियोजन संक्षिप्त स्वरुपात नमूद करण्यात आले. यासाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, डी. आर. दवणे, रामदास पेंडकर, अमरदीप गोधणे यांनी परीश्रम घेतले.

00000




 किनवट-माहूर तालुक्यातील शिक्षण व पाटबंधारेच्या कामांना प्राधान्य

-    पालकमंत्री अशोक चव्हाण

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मंजूर असून या पैकी कोटी रुपयांचा  निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून किनवट व माहूर तालुक्यातील शाळा बांधकाम-दुरुस्तीची व पाटबंधारेची कामे प्राधान्याने करावीत असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.  डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आज डोंगरी विकास समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरपोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळेमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. 

 

डोंगरी भागातील गावात रस्तेनाली बांधकाम व इतर विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डोंगरी भागातील नदी-नाल्याच्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती व पुरात होणारी जीवीत हानी टाळण्यासाठी कोकणाच्या धर्तीवर पायी चालण्यासाठी राज्यात गरज असेल तिथे साकव उभे करण्याचा कार्यक्रम बविण्यासाठी प्रयत्न केले जातीलअसे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेखा काळमप्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगेसमाज कल्याण अधिकारी तेजस माळवदकरसमितीच्या अशासकीय सदस्य श्रीमती जनाबाई डुडुळेसदस्य आशिष कऱ्हाळेराहूल नाईक तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

00000




 जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता 

·         पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 8:- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 512 कोटी 4 लाख 72 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, समिती सदस्य हरिहरराव भोसीकर, एकनाथ मोरे,  प्रकाश वसमते, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने हे प्रत्यक्ष तर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, आमदार डॉ. तुषार राठोड व नियोजन समितीचे इतर सदस्य हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

सन 2022-23 च्या प्रारुप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी 303 कोटी 52 लाख 80 हजार, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 163 कोटी, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजनेसाठी 45 कोटी 51 लाख 92 हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय चालू वर्षातील पुनर्विनियोजन प्रस्तावात बचत 9 कोटी 11 लाख 55 हजार असून मागणी 86 कोटी 25 लाख 49 हजार रुपयांची आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या पुनर्विनियोजन प्रस्तावासही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील कार्यान्वित यंत्रणाना वितरीत केलेला निधी माहे डिसेंबर 2021 अखेर एकुण वितरीत तरतुद 86 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांपैकी झालेला खर्च 63 कोटी 56 लाख 20 हजार रुपये एवढा झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वितरीत निधी व खर्च झालेल्या निधीचा आढावा घेतला. ज्या विभागांनी अद्याप पर्यंत निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. निधी प्राप्त करुन मार्च 2022 अखेरपर्यत 100 टक्के प्राप्त निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सर्व विभाग प्रमुखांना यावेळी दिले.    

सन 2022-23 च्या प्रस्तावित प्रारुप मागणी आराखडा व सन 2021-22 या वित्तीय वर्षातील मंजूर निधीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला. जिल्ह्यात पशुच्या संख्येचे निकष ठरवून पशुवैद्यकीय दवाखाने उभारणी व अद्ययावतीकरण करण्यावर भर द्यावा. देगलूर नाका परिसरातील पशुवैद्यकीय दवाखाणा अद्ययावत करणे, जिल्ह्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळांचे बांधकाम प्राध्यान्याने करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाला दिले.  कोविड-19 उपाययोजनेसाठी आवश्यक तो निधी राखीव ठेवण्यात यावा. अनेक विभाग प्रमुखांनी प्रलंबित कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राप्त निधी मार्च अखेर खर्च करण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. मागील 14 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास यावेळी मान्यता देण्यात आली. 

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. काळम यांच्यासह समिती सदस्य, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व  दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन व सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

00000




 नांदेड जिल्ह्यात 82 व्यक्ती कोरोना बाधित

तर 9 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 110 अहवालापैकी 82 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन तपासणीद्वारे 14 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 834 एवढी झाली असून यातील 87 हजार 907 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 272 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 36, नांदेड ग्रामीण 10, अर्धापूर 2, बिलोली 1, देगलूर 3, धर्माबाद 1, कंधार 1, लोहा 3, मुदखेड 1, नायगाव 2, मुखेड 1, हिंगोली 1, पंजाब 2, परभणी 4 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 10, नांदेड ग्रामीण 3, किनवट 1 असे एकूण 82 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.   

आज 272 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 203,  खाजगी रुग्णालय 9 अशा एकुण 272 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 4 हजार 157

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 99 हजार 705

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 907

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 834

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-272

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...