मासेमारीसाठी तलाव / जलाशय
ठेक्याने देण्याची प्रक्रिया सुरू
नांदेड (जिमाका) दि. 6 :- सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीसाठी नांदेड जिल्ह्यातील 38 तलाव / जलाशय शासन निर्णयातील तरतुदीनुसार विनामुल्य / बोली लिलाव / जाहिर लिलाव पद्धतीने ठेक्याने देण्यात येणार आहे. प्रसिद्धी केलेल्या ठेका दयावयाच्या 38 तलाव / जलाशयावरील नोंदणीकृत संस्थेबाबत कोणास आक्षेप असल्यास त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध नांदेड यांच्याकडे 15 दिवसाच्या आत आक्षेप नोंदवावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय (ता) सहाय्यक आयुक्त जे. एस. पटेल यांनी केले आहे.
प्राप्त आक्षेपाबाबत त्यांच्या स्तरावर सुनावनी आयोजित करुन संबंधित तलाव / जलाशय शासन निर्णेयातील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाची अंतिम यादी तयार करण्यात येईल. ही अंतिम यादी तलाव ठेका समितीसमोर सादर झाल्यानंतर विहित शासन नियमावलीनुसार तलाव / जलाशय ठेक्याने देण्याची प्रक्रिया आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई यांच्या निर्देशानुसार 30 एप्रिल 2022 पूर्वी करण्यात येणार आहे. मुदतीत न आलेल्या आक्षेप व तक्रारीबाबत कोणतीही दखल घेतली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
राज्यातील उपलब्ध भूजलाशीय क्षेत्रामध्ये मासेमारीसाठी मोठया प्रमाणावर असलेला वाव लक्षात घेवून रोजगार निर्मितीतून वाढीव मत्स्योत्पादन घेण्यासाठी कृषि व पदुम विभागाद्वारे मत्स्य व्यवसायासाठी जलाशय / तलाव ठेक्याने देण्यासाठी शासन निर्णय 3 जुलै 2019 नुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने निर्मित केलेल्या व मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारीसाठी हस्तांतरीत केलेले तलाव / जलाशय ठेक्याने देण्याची कार्यवाही विहित पध्दतीचा अवलंब करुन मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे करण्यात येते. या कार्यवाहीच्या अनुषंगाने उद्ववणाऱ्या वादाबाबतचा निपटारा करण्याचा शासन परिपत्रक 24 नोव्हेंबर 2021 अन्वये मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ठेक्याने देण्यात येणाऱ्या तलाव, जलाशय आणि त्यावर नोंदणीकृत कार्यक्षेत्र असलेल्या संस्थाचा तपशिल सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दुग्ध नांदेड यांना सादर केला आहे. तसेच येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) कार्यालया
00000