Friday, October 27, 2023

 जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय,

खाजगी आस्थापनांची माहिती होणार अद्यावत

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना (सर्व शाळा, महाविद्यालय) यांची माहिती अद्यावत करण्यात येत आहे. यात आस्थापनाचे नाव, नोंदणी क्रमांक, अधिकाऱ्यांचे नाव / पदनाम, ईमेल आयडी, पॅन / टॅन क्रमांक, स्थापना वर्षे, दुरध्वनी / मोबाईल क्रमांक, संपर्क पत्ता, कामाचे स्वरूप/ प्रमुख कार्य, अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ही माहिती nandedrojgar@gmail.com या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.   

 

राज्य शासनाचा पूर्वीचा रोजगार व स्वयंरोजगार व सध्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे असलेल्या सर्व आस्थापनांची नोंद रोजगार पोर्टलचे एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात उद्योजक/ नियोक्ते यांचा डेटा एनसीएस पोर्टलवर अपेड करत असतांना उद्योजक / नियोक्ते यांच्या डेटामध्ये उद्योग क्षेत्र, नाव, कामाचे स्वरूप, संस्था पॅन/टॅन, सिटी आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती उपलब्ध नसल्याबाबत ई-मेल अन्वये तांत्रिक तज्ज्ञ www.mahaswayam.in.gov.in महास्वयम वेबपोर्टल यांनी कळविले आहे. सदर माहिती निरंक असल्याने या उद्योजक / नियोक्ते यांची माहिती एनसीएस पोर्टलवर अपडेट होण्यास अडचण येत आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी याबाबतची माहिती तात्काळ nandedrojgar@gmail.com या ईमेलवर पाठवावी. माहिती अद्यावत करतांना काही अडचन आल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 9975646466 वर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.   

0000

 मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

             मुंबईदि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस शाश्वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहितीसामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

            मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसुली पुरावेनिजामकाळात झालेले करारनिजामकालिन संस्थानिकांना दिलेल्या सनदाराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्‍याची जबाबदारी सोपविलेली आहे.

या समितीचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) असून विभागीय आयुक्‍तछत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्‍य सचिव आहेत आणि अपर मुख्‍य सचिव (महसूल) व प्रधान सचिवविधी व न्‍याय विभागमंत्रालयमुंबई यांच्यासह मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी हे या समितीचे सदस्‍य आहेत.

समितीची पहिली बैठक दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत झाली.

            या बैठकीमध्‍ये समितीच्‍या कार्यकक्षेबाबत सविस्‍तर चर्चा होऊन समितीच्‍या पुढील कामकाजाची दिशा ठरविण्‍यात आली. तसेच या पूर्वीच्‍या समितीने या विषयासंबंधाने निजामकालिन जुने महसुली अभिलेखे तपासण्‍यासाठी राज्‍य शासनाचे एक पथक हैदराबाद येथे अभिलेखांचा शोध व तपासाबाबत पाठविले होते. या पथकास निजामकालिन जुन्‍या अभिलेखातील सनदामूंतखबकरारजनगणनेचे अभिलेखे इत्‍यादी तपासण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या जमाबंदी आयुक्‍तांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या कार्यालयातील काही अधिकारी व विभागीय आयुक्‍त कार्यालयछत्रपती संभाजीनगर कार्यालयातील अधिकारी यांच्‍या पथकाने हैदराबाद येथे भेट दिली. त्‍यांच्‍या सोबत मोडी लिपी व ऊर्दू भाषा जाणकार व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍यात आला होता. या पथकाने दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी हैदराबाद येथे भेट देऊन जुने निजामकालिन महसुली अभिलेखेजनगणना अभिलेखेअबकारी विभागाचे अभिलेखे व पुरातत्‍व विभागाकडील अभिलेखेमूंतखब इत्‍यादींची पाहणी केली व पथकाने उपलब्‍ध मूंतखब अभिलेख्‍यांच्‍या प्रती स्‍कॅन करुन सोबत आणल्‍या. याबाबतची माहिती समितीच्‍या पहिल्‍या बैठकीत देण्‍यात आली.

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची दुसरी बैठक 15 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये मराठवाड्यातील जुने महसुली अभिलेखेजन्‍म-मृत्‍यू नोंदीचे अभिलेखे1967 पूर्वीचे शैक्षणिक अभिलेखेपोलिसांकडील गुन्‍हा नोंद रजिस्‍टरअबकारी विभागाकडील अभिलेखेवक्‍फ बोर्डाकडील अभिलेखेसैनिक कल्‍याण विभागाचे अभिलेखेकारागृह विभागाकडील नोंदी इत्‍यादींची तपासणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. तसेच यापूर्वी कुणबी जातीची दिलेली प्रमाणपत्रेनाकारलेले अर्जजात वैधता पडताळणी समितीकडून वैध ठरविण्‍यात आलेली प्रकरणेअवैध ठरविलेली प्रकरणे व अवैध ठरविण्‍याचे कारण याबाबत जिल्‍हानिहाय तपासणी करुन जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करण्‍याचे बैठकीत निर्देश देण्‍यात आले.

            समितीच्‍या 15 सप्टेंबर 2023 रोजीच्‍या बैठकीतील निर्देश विचारात घेऊन सर्व विभागांचा समन्‍वयन होऊन अभिलेखांची तपासणी सुलभतेने होण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्‍ये निवासी उपजिल्‍हाधिकारी यांच्या नियंत्रणात विशेष कक्ष स्‍थापन करण्‍यात आला. या कक्षामध्‍ये विविध 12 विभागांचे जिल्‍हास्‍तरीय अधिकारी नेमण्‍यात आले. जुन्‍या  अभिलेखांपैकी काही अभिलेखे मोडी लिपीऊर्दू भाषेत असल्‍यामुळे तपासणीसाठी ऊर्दू शाळेतील शिक्षक व मोडी लिपी जाणकारांची मदत घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या. 

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची तिसरी बैठक 22 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये जिल्‍हानिहाय अभिलेख तपासणी कामाचा आढावा घेण्‍यात आला. तसेच तपासलेल्‍या नोंदी बाबत अहवाल सादर करण्‍यासाठी व त्‍यात सारखेपणा राहण्‍यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी एक नमुना तयार करण्‍याचे निर्देश समितीने दिले. त्‍यानुसार पुढीलप्रमाणे विभागनिहाय अभिलेख्‍यांची तपासणी करण्‍याचे निर्देश दिले.

1) महसुली अभिलेखेखसरा पत्रकपाहणी पत्रकक-पत्रककूळ नोंदवहीनागरिकांचे राष्‍ट्रीय रजिस्‍टर सन 1951नमुना नं.1 हक्‍क नोंदपत्रकनमुना नं.2 हक्‍क नोंदपत्रक व 7/12 उतारे,

2) जन्‍म-मृत्‍यू रजिस्‍टर (गाव नमुना नं.14)

3)  शैक्षणिक अभिलेखे-  प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्‍टर,

4) राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाकडील अभिलेखे- अनुज्ञप्‍ती नोंदवह्यामळी नोंदवहीताडी नोंदवहीआस्‍थापना अभिलेख,

5)  कारागृह विभागाचे अभिलेखे- रजिस्‍टर ऑफ अंडर ट्रायल प्रीझनरकच्‍चा कैद्यांची नोंदवही,

6)  पोलीस विभाग- गाववारीगोपनीय रजिस्‍टर सी-1सी-2क्राइम रजिस्‍टरअटक पंचनामे व एफआयआर रजिस्‍टर

7)सहजिल्‍हा निबंधक तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी- खरेदी खत नोंदणी रजिस्‍टरडे बुककरारखतसाठेखतइसार पावतीभाडे चिठ्ठीठोकेपत्रकबटाई पत्रकदत्‍तक विधानपत्रकमृत्‍यूपत्रकइच्‍छापत्रकतडजोडपत्रकइतर दस्‍त,

8)  भूमी अभिलेख विभाग- पक्‍काबुकशेतवारपत्रकवसुली बाकीऊल्‍ला प्रतीबुकरिव्हीजन प्रतीबुकक्‍लासर रजिस्‍टर व हक्‍क नोंदणीपत्रक,

9)   जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी- माजी सैनिकांच्‍या नोंदी,

10)   जिल्‍हा वफ्क अधिकारी- मूंतखब

11)  शासकीय कर्मचा-यांचा सेवा तपशील- सन 1967 पूर्वीचे कर्मचा-यांचा सेवा तपशील.

12)  जात प्रमाणपत्र पडताळणी समिती- वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे. 

            याशिवाय हैदराबाद येथून प्राप्त करुन आणलेल्‍या ऊर्दू भाषेतील मूंतखब अभिलेखांच्‍या मराठी भाषेत भाषांतरीत नमुना दाखल प्रती पाठविण्‍याच्‍या समितीने सूचना दिल्‍या. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्‍या जात प्रमाणपत्रांबाबत व जात पडताळणी समितीने घेतलेल्‍या निर्णयांच्‍या अनुषंगाने चर्चा होऊन जात पडताळणी समितीकडील वैध व अवैध प्रकरणांच्‍या नमुना दाखल आदेशाच्‍या प्रती सादर करण्‍याच्‍या समितीने सूचना दिल्‍या.

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची चौथी बैठक 30 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये जिल्ह्यांनी त्‍यांना विहित करुन दिलेल्‍या विवरणपत्रातील माहितीच्‍या अनुषंगाने माहिती सादर केली. प्रत्‍येक जिल्ह्याने त्‍यांच्‍या जिल्ह्यातील बारा विभागांच्‍या 46 अभिलेख प्रकारांची तपासणी बाबतची प्रगती समिती मांडली. हा अभिलेख प्रकार कोणत्‍या कायद्याच्‍या / नियमांच्‍या तरतुदीनुसार ठेवले जात होतेयाबाबत त्‍यांचे नमुना दाखल प्रतीसह समितीस माहिती दिली. या बैठकीत अध्‍यक्षांनी तपासलेल्‍या अभिलेखांचे 1948 पूर्वीचे (निजामकालिन) व 1948 ते 1967 (इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र देण्‍यासाठीचा अधिसूचित दि. 13 ऑक्टोबर 1967 असल्‍याने) अशा दोन कालावधीमध्‍ये माहिती देण्‍याचे निर्देश दिले व त्‍याची नोंद सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेऊन त्‍याप्रमाणे त्‍या कालावधीची सर्व विभागांची अभिलेख तपासण्‍याची कार्यवाही सुरू करण्‍यात आली व त्‍यामध्‍ये आढळलेल्‍या कुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी नोंदीची माहिती शासनास व समितीस देण्‍यात आली.

            यानंतर समितीने छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आठ जिल्‍ह्यांमध्‍ये जिल्‍हानिहाय बैठका घेण्‍याचे व सर्वसामान्य नागरिकांकडून कुणबी नोंदीसंबंधी पुरावे स्वीकारण्‍याचे ठरवून तसा समितीचा जिल्‍हानिहाय दौरा कार्यक्रम सर्व जिल्‍ह्यांना कळविण्‍यात आला. नागरिकांनाही याबाबत माहिती होण्‍यासाठी या कार्यक्रमास वर्तमानपत्रातून व्‍यापक प्रसिध्‍दी देण्‍यात आली. 

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची पाचवी बैठक 11 ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय आयुक्‍त कार्यालयछत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्‍तालय व छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्याच्‍या कामकाजाबाबत झाली. या बैठकीमध्‍ये जिल्‍ह्याच्‍या अहवालाबाबत अभिलेख प्रकार व विभागनिहाय सविस्‍तर आढावा घेण्‍यात आला. या आढाव्‍यात निदर्शनास आल्‍याप्रमाणे या बैठकीत भूमी अभिलेख विभागाकडील नमुना 33 व 34छत्रपती संभाजीनगर येथील सैन्‍य भरती कार्यालयाकडील सैन्‍य भरतीचे वेळी घेतलेल्‍या नोंदीनगरपालिकेकडील जुने शेतवार तक्‍ता वसुली व आमदनी (अॅसेसमेंट रजिस्‍टर) हे अभिलेख प्रकार नव्‍याने समाविष्ट करण्‍याचे निर्देश दिले. समितीने ठरवून दिलेल्‍या दुपारी 2 ते 4 या वेळेत 18 नागरिक / शिष्‍टमंडळांनी समितीस पुरावे / निवेदने सादर केली.

            याप्रमाणे न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची सहावी बैठक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जालना येथे झाली. या बैठकीसाठी शासन पत्र 3 ऑक्टोबर 2023 व 6 ऑक्टोबर 2023 रोजी कळविल्‍यानुसार आंदोलनकर्त्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  त्‍यांनी बैठकीच्‍या कामकाजात सहभाग घेऊन आपल्‍या सूचना समिती समोर मांडल्‍या. समितीची सातवी बैठक 17 ऑक्टोबर 2023 रोजी हिंगोली येथेआठवी बैठक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड येथे व नववी बैठक 19 ऑक्टोबर 2023 रोजी परभणी येथे झाली. या वेळी  समितीने ठरवून दिलेल्‍या दुपारी 2 ते 4 या वेळेत अनुक्रमे 632964 व 83 नागरिक /शिष्‍टमंडळांनी समितीस पुरावे /निवेदने सादर केली. अशाप्रकारे समितीने केलेल्‍या आवाहनास नागरिकांकडून या कार्यक्रमादरम्‍यान मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व संबंधितांनी मा. अध्‍यक्ष व समिती सदस्‍यांच्‍या भेटी घेऊनपुरावे / कागदपत्रे देऊन म्‍हणणे मांडले. 

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची लातूर येथे 26 ऑक्टोबर 2023 रोजी व धाराशिव येथे दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक पार पडली. समितीची पुढील बैठक बीड येथे 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.  या दौऱ्यामध्‍ये समिती जिल्‍हा बैठका घेऊन नागरिकांकडून पुरावे स्वीकारण्‍याचे पूर्वीप्रमाणे कामकाज करणार आहे.

            आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्‍ये विविध विभागांच्‍या अभिलेखांतील सुमारे दीड कोटी नोंदीची तपासणी करण्‍यात आली असून हे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. जुने अभिलेखे अत्‍यंत जीर्ण अवस्‍थेत असून त्‍यांचे वाचन करुन नोंदी शोधणे जिकरीचे होत आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागत आहे. जुन्‍या अभिलेख्‍यातील बहुतांश नोंदी मोडी लिपी अथवा ऊर्दू भाषेतील आहेत व नोंदींचे प्रमाणिकरण फारशी भाषेतीलही आहे. त्‍याबाबतचे भाषा जाणकार सहजतेने उपलब्‍ध होत नसल्‍याचे निदर्शनास येते. त्‍याशिवाय मोडी लिपी जाणकार व्‍यक्‍तींची उपलब्‍धताही मर्यादित असून ऊर्दू व मोडीतील पुरावे / कागदपत्रे मोठ्या प्रमाणात भाषांतरीत करून घ्‍यावी लागत आहेत. त्‍यामुळे या अभिलेख्‍यांच्‍या तपासणीसाठी वेळ लागत आहे. याप्रमाणे कुणबी जातीच्‍या नोंदी शोधण्‍याची कार्यवाही पूर्ण करून अशा नोंदी असलेले अभिलेखे व्यवस्थित जतन करुन त्‍याच्‍या प्रती सार्वजनिक संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍याचे नियोजित आहे. यामुळे मराठा समाजातील संबंधितांना या अभिलेखांच्‍या प्रमाणित प्रती संबंधित कार्यालयातून सुलभतेने उपलब्‍ध होऊ शकतील. 

            नागरिकांनी आतापर्यंत समितीस सादर केलेल्‍या व आगामी दौरा कार्यक्रमात सादर होणाऱ्या पुराव्‍यांचे भाषांतर करुन अभ्‍यास करणेकायदेशीर आधाराशी पडताळणी करणे व त्‍यावर उचित निर्णय घेणे यासाठी देखील मोठा अवधी लागणार आहे. जिल्‍हानिहाय अभिलेखे तपासणी पूर्ण झाल्‍यानंतर प्राप्‍त होणाऱ्या अहवालाचे विश्‍लेषण करुन निष्‍कर्षापर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हानिहाय अंतिम अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर काही कालावधी लागणार आहे. तसेच समितीस हैदराबाद येथे भेट देऊन आणखी काही पुरातन अभिलेख्‍यांची तपासणी करावयाची आहे. सद्यःस्थितीत तेलगंणा राज्‍य विधानसभेच्‍या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. तेलगंणा राज्‍य शासनाचे अधिकारी निवडणूक विषयक कामकाजात व्‍यस्‍त असून त्‍यांच्‍या उपलब्‍धतेनुसार हा दौरा आयोजित करावा लागणार आहे. अपर मुख्य सचिव (महसूल)महाराष्ट्र शासन यांनी तेलंगणा राज्याचे प्रधान सचिव (महसूल) यांना पत्र पाठवून निजामकालिन अभिलेखे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केलेली आहे.

            मराठवाड्यातील आतापर्यंतच्या 7 जिल्ह्यात घेतलेल्या बैठका त्या अनुषंगाने नागरिकांकडून समितीस सादर करण्यात आलेल्या विविध अनुषंगिक पुराव्यांचा विचार करता समितीच्या कुणबी-मराठामराठा-कुणबी यांचे प्रमाणिकरण करण्याच्या अनुषंगाने नागरिकांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे. याबाबत शासनाच्या ज्या विविध यंत्रणा आपल्याकडील जुनी कागदपत्रे ज्यामध्ये कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा अशा प्रकारचे नोंदी तपासण्याचे काम करत आहेतत्यांचीही तपासणी प्रगतीपथावर आहे. बहुतांशी कागदपत्रे 1967 च्या पूर्वीचे आहेत. कागदपत्रांचे स्वरुप आणि तपासणीमधील विद्यमान अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा अनुभव यामध्ये तसेचकागदपत्रे ही मोडीऊर्दू आणि फारशी भाषेमध्ये आहेत. मोडी लिपी करिता पुराभिलेख विभागाने शासनाचे चार कर्मचारी आणि ज्यांनी मोडीचे प्रशिक्षण घेतलेली आहेत. असे काही पुणेछत्रपती संभाजीनगर परिसरातील जाणकार यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याबद्दल आदेश काढलेले आहेत. ज्या मोडी आणि उर्दू कागदपत्रांचा शोध घेणे गरजेचे आहेत्याबद्दल या जाणकारांकडून तपासून घेण्याचे काम सुरू आहे. या नोंदी ऊर्दू आणि मोडी मध्ये अधिक चांगल्या प्रमाणात मिळत आहेत आणि तशी कुणबी जातीच्या नोंदींची आकडेवारी वाढत आहे

            समितीस समाजातील विचारवंतांसोबत विचारविनिमय करावयाचा असून अभ्‍यासकविधिज्ञ व तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या सूचना व मते जाणून घेऊन त्‍याचा उपयोग समिती अहवाल तयार करताना करणार आहे.

समितीस निश्चित करुन दिलेल्‍या कार्यकक्षेनुसार परिपूर्ण व सविस्‍तर अहवाल तयार करण्‍यासाठी या सर्व बाबींचा विचार करता अधिकचा कालावधी कदाचित आणखी दोन महिन्‍यांचा लागणार आहे आणि याशिवाय आजू-बाजूंच्‍या राज्‍यात मराठा समाजाच्‍या आरक्षणाबाबत काय संविधानिक/कायदेशीर तरतुदींचे आधार घेण्‍यात आलेले आहेत त्‍याचे संदर्भ उपलब्‍ध करुन घेणे व या संबंधाने त्‍याची तपासणी करणे तसेच जुन्‍या हैदराबाद संस्‍थानातून स्टेट गॅझेटिअरचे उपलब्‍ध असलेले आधारभूत अभिलेखे व तेथे उपलब्‍ध असलेल्‍या तेव्‍हाच्‍या जातनिहाय जनगणनेचे आधारभूत अभिलेखे प्राप्‍त करणे व अभ्‍यासणे आवश्‍यक ठरत असल्‍याने समितीने पार पाडत असलेल्‍या कामकाजास भविष्‍यातील कोणत्‍याही आव्‍हांनाच्‍या संभाव्‍यतेचा विचार करुन शाश्‍वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी समितीस  दि.24 डिसेंबर2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेअशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव श्री. भांगे यांनी दिली आहे.

०००००

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्यात 9 नोव्हेंबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत

दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचे निर्देश


नांदेड (जिमाका) दि. 27 :- सोमवार 30 ऑक्टोंबर ते  रविवार 5 नोव्हेंबर 2023 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरिता भ्रष्टाचाराला नाही म्हणा राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा या संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.

या सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात 16 ऑक्टोबर 2023 रोजीच्या परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावाअसे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

00000

 किनवट तालुक्यातील दुन्ड्रा येथील 27 जणांची

जात वैधता प्रमाणपत्राबाबत 3 नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी


नांदेड (जिमाका) दि. 27 :- अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी किनवट तालुक्यातील दुन्ड्रा गावातील 27 जणांनी जात वैधतेसाठी अर्ज जात पडताळणी समितीकडे केले होते. संबंधित अर्जदाराना सन 2020 पासून ते आतापर्यत वारंवार नोटीस देवून समिती कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. परंतु अर्जदार संधी देवूनही सुनावणीस उपस्थित राहीले नाहीत. त्या 27 अर्जदारांसाठी समितीने 3 नोव्हेंबर 2023 रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीस अर्जदारांनी उपस्थित राहावे याबाबत त्यांना समितीच्या वतीने लेखी कळविलेले आहे. तसेच सदर अर्जदार सुनावणीस गैरहजऱ राहिल्यास उपलब्ध कागदपत्राआधारे समिती योग्य तो निर्णय घेईल, असेही आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट (मुख्यालय औरंगाबादचे) उपसंचालक तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

 

किनवट तालुक्यातील दुन्ड्रा गावातील मन्नेरवारलू अनुसूचित जमातीच्या त्या 27 जणांना नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीकोनातून श्री. पवन अशोक आईटवार व श्री. अशोक नारायण आईटवार यांच्या प्रकरणी या समिती कार्यालयाने पारीत केलेले निर्णय आदेश 1.2.2020 अन्वये व त्यानंतर 6 वेळेस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच दिनांक 10 नोव्हेंबर 2020, 9 डिसेंबर 2020, 26 मे 2022, 5 सप्टेंबर 2023, 21 सप्टेंबर 2023  तसेच 11 ऑक्टोबर 2023 बाबत समिती कार्यालयात सुनावनीस उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. संधी देवूनही अर्जदार समितीस सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती किनवट, मुख्यालय औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत

9 डिसेंबर पर्यंत नमुना 6,7,8 करता येईल दाखल

·         प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

नांदेड (जिमाका) दि. 27 :-  नांदेड जिल्‍ह्यातील एकुण 9 विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी मतदान केंद्र, तहसील, उपविभागीय अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे पाहणीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर सदर यादी  https://ceoelection.maharashtra.gov.in संकेतस्थळावर तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देण्यात आली आहे. 

सदर मतदार यादी तयार करण्याची अर्हता 1 जानेवारी 2024 निश्चित केली आहे. सद्स्थितीत मतदार यादीतील मतदारांना जर काही बदल करावयाचे असतील, मतदार यादीमध्ये एखादे नाव समाविष्ट करायचे असेल अथवा एखाद्या नोंदीच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास असे दावे वा आक्षेप प्रारूप मतदार यादी 9  डिसेंबर 2023 (शनिवार) पर्यंत यथास्थिती नमूना 6,7,8 मध्ये दाखल करता येतील असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  

सन 2024 मधील नंतरच्या अर्हता दिनांकाना म्हणजेच 1 एप्रिल 2024,  1 जुलै 2024 किंवा 1 ऑक्टोबर 2024 या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येईल. यासाठी नमुना 6 मध्ये त्यांचे दावे नोटीसच्या दिनांकापासून आगाऊ करता येईल व असे दावे त्या त्या तिमाहीच्या अर्हता दिनांकावर त्या त्या तिमाहीमध्ये विचारात घेऊन निकाली काढण्यात येतील. असे दावे किंवा आक्षेप उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा उ‍पविभागीय अधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालयात वर दिलेल्या दिनांकापूर्वी पोहोचेल अशा रीतीने सादर करावा किंवा पोस्टाने पाठवावे.

नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत दिनांक 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत प्रत्‍यक्ष घरोघरी भेट देऊन मतदाराची पडताळणी करण्‍यात आली.   जिल्हयात एकूण मतदार 26 लाख 68 हजार 279 असून पडताळणी केल्यानंतर ही संख्या 26 लाख 46 हजार 611 एवढी आली. घरोघरी जावून खातरजमा केल्याचे हे प्रमाण 99.19 टक्के आहे. जिल्ह्यात 30 हजार 56 मतदार आढळून आले नाहीत. 17 हजार 241 मतदार स्थलांतरीत झाले आहे तर सुमारे 34 हजार 216 मतदार मयत झाले. सुमारे 11 हजार 558 मतदारांचे छायाचित्र सुस्पष्ट करुन घेण्यात आले. दुबार नोंद झालेले 2 हजार 615 मतदारांची संख्या कमी करण्यात आली.

नांदेड जिल्‍ह्यात 18 ते 19 या वयोगटात नवीन 11 हजार 412 युवक मतदार आहेत. यात 3 हजार 887 मुली, 7523 मुले तर 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. एकूण मतदार संख्येत 18 ते 80 वयोगटातील मतदारामध्ये 13 लाख 82 हजार 214 पुरुषतर 12 लाख 85 हजार 912 स्त्री मतदार संख्या आहे. तर 153 तृतीयपंथीयाची संख्या आहे असे एकूण 26 लाख 68 हजार 279 मतदारांची संख्या आहे.   

मतदार यादीमध्ये एखादे नाव समाविष्ट करण्याबाबतचा दावा किंवा एखादे नाव समाविष्ट करण्यास अथवा एखाद्या नोंदीच्या तपशीलाबाबत आक्षेप असल्यास असे दावे वा आक्षेप 9 डिसेंबर 2023 (शनिवार) रोजी किंवा पर्यंत, यथास्थिती नुमना 6,7,8 मध्ये दाखल केल्‍यानंतर सदरील दावे व हरकती 26 डिसेंबर 2023 (रविवार) पर्यंत निकालात काढण्‍यात येतील. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई 1 जानेवारी 2024 (सोमवार) पर्यंत करून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2024 (शुक्रवार) रोजी करण्‍यात येईल.

00000

 केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सुधारित दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून ओखा एक्सप्रेसने सकाळी 6 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.20 वा. रेल्वे स्टेशनहून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह येथून नियोजन भवनकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 9.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन मुख्य सभागृह येथे आगमन व सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रोजगार मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. नियोजन भवन मुख्य सभागृह येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण.  दुपारी 3 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. दुपारी 3.30 वा. पुणे एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.

0000 

 हस्तशिल्प सेवा केंद्रातर्फे सौभद्र मंगल कार्यालयात

31 ऑक्टोबर पर्यंत विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- भारत सरकारच्या हस्तशिल्प, वस्त्र मंत्रालय विकास आयुक्त कार्यालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राच्या माध्यमातून चैतन्यनगर येथील सौभद्र मंगल कार्यालयात 31 ऑक्टोबर पर्यंत विविध खादी ड्रेस, साडी, बांगड्या व इतर वस्तुंचे प्रदर्शन व विक्री ठेवण्यात आली आहे.  संपूर्ण देशात 2 ते 31 ऑक्टोबर या कालावधी खादी महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. स्थानिक कारागीर, विणकर यांना चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम शासनाने घेतला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून कारागिरांना इथे निमंत्रीत करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनात बंजारा उत्पादने, ज्यूटशिल्प, सोलापूर कॉटनवॉल हँगिंग, लाकडाची खेळणी, लाखेच्या बांगड्या व इतर साहित्य याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी एमसीईडी नांदेडचे शंकर पवार, छत्रपती संभाजीनगर हस्तशिल्प सेवा केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक अमन कुमार जैन, हस्तशिल्प संवर्धन अधिकारी शैलेंद्र सिंह हे विशेष परिश्रम घेत आहेत.

000000









  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...