Tuesday, April 9, 2019


मी मतदान करणार - सेल्फी मोहीम अभिनव उपक्रम
नांदेड, दि. 8 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी स्वीप कक्ष, 87- नांदेड मतदार संघ व पीपल्स महाविद्यालय नांदेड  यांच्या संयुक्त विद्यमाने  मी मतदान करणार सेल्फी मोहीम अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकी मध्ये शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून मी मतदान करणार असा उपक्रम राबविला.  ELC क्लब कडून यातील तीन उत्कृष्ट सेल्फींना पारितोषिके देण्यात आली. यासाठी प्रा. वडवळे स्वीप कक्ष प्रमुख नयना पवार स्वीप कक्ष सदस्या सारिका आचमे, मुसने, बस्वदे, वानखेडे,  वाकोडे व झरीवाड यांनी पुढाकार घेतला.
000000



शांतता समितीची बुधवारी बैठक
नांदेड, दि. 8 :- श्रीराम नवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक बुधवार 10 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वा. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित केली आहे, असे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य सचिव अक्षय शिंदे यांनी कळविले आहे.
000000


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती   
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 8 :- बौद्ध बांधवांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती रविवार 14 एप्रिल 2019 रोजी मोठया उत्साहात नांदेड जिल्हयात साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर 15ते 30 एप्रिल 2019 या कालावधीत ग्रामी भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका, कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी केली जाते. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दरम्यान सर्व कार्यक्रम, मिरवणुका शांततेत पार पडावे, कसल्याही प्रकारची बाधा येवू नये जिल्हयात शांतता टिकुन राहावी यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 अन्वये आदेश निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार जिल्हयात सर्व पोलीस स्टेशनचे स्वाधी अधिकारी असलेले अंमलदार किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 12 एप्रिल 2019 ते 30 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्री पर्यत लागु राहील.
आदेशात म्हटले आहे, रस्त्यावरील रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रितीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी . अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या जमावाच्या प्रसंगी पुजे अर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या उतरण्याच्या जागेमध्ये इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियत्रंण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकुमापेक्षा कमी दर्जाचे त्यापुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजन करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबधी.
            कोणीही हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा मोर्चाचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत तसेच संबधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. जाही सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता सुव्यवस्थेला बांधा येशकतो अशा घोषणा देऊ नयेत.
            हा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशात नमूद केले आहे.
0000000


नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचा अभिनव उपक्रम
आदर्श मतदाकेंद्र ठरले प्रशिक्षणार्थ्यांचे आकर्षण केंद्र
नांदेड, दि. 8 :- प्रत्यक्ष मतदान केंद्र कसे असावे, मतदान केंद्रात प्रत्येक कर्मचा-यांचे स्थान कोठे असावे, मतदान प्रक्रियेचा क्रम काय असावा, प्रत्येक मतदान अधिका-यांचे कार्य काय व कसे चालते, परदानशीन स्त्रियांची ओळख कशी पटविल्या जाते, मतदान कक्ष कसे तयार करावे, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे मतदान केंद्रातील स्थान कोठे असावे, विविध फॉर्मस्‍ कसे भरले जातात, कोणकोणते लिफाफे कसे परिपूर्ण करतात, आक्षेपित मत कसे घेतले जाते, दिव्यांगासाठी कोणत्या सुविधा असाव्या आणि मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी यांचे कार्य काय असते तसेच डमी मतदानाच्या माध्यमातून प्रक्रीया कशी चालते अशा विविध समस्यांच्‍या निवारणासाठी प्रशिक्षित मतदान अधिका-यांमार्फत आदर्श मतदार केंद्र 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाने दुस-या प्रशिक्षण सत्रात तयार करुन प्रशिक्षणार्थ्यांना अनुभवण्‍यास दिल्यामुळे आदर्श मतदार केंद्र प्रशिक्षणार्थ्यांचे आकर्षण केंद्र ठरले.
सोमवार 08 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहात नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न झाले. याच प्रशिक्षण स्‍थळी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आदर्श मतदान केंद्राची उभारणी केली होती. हुबेहुब प्रत्‍यक्ष मतदान स्‍थळी जसे मतदान केंद्र उभारणी केल्‍या जाणार आहे, तंतोतंत तसेच मतदान केंद्र उभारले होते. मतदान केंद्राध्‍यक्ष व विविध मतदान अधिका-यांची नेमणूक करुन प्रशिक्षणार्थ्‍यांच्‍या सोयीसाठी डमी मतदान प्रक्रियाही घेण्‍यात आली.
या आदर्श मतदान केंद्रास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी भेट दिली असता मतदान केंद्राची अत्‍यंत योग्‍य सुविधा, रांगेतून होत असलेले मतदान, प्रशिक्षित मतदान अधिकारी, केंद्राची केलेली योग्‍य उभारणी व रचना पाहून जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
या आदर्श मतदान केंद्रामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष मतदान केंद्राचा अनुभव घेता आला व अनेक शंकांचे निरसन झाल्‍यामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. या आदर्श मतदान केंद्रास एकूण 1 हजार 226 प्रशिक्षणार्थ्‍यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन कार्यपध्‍दती समजून घेतली. प्रशिक्षण काळात प्रथमच असे आदर्श मतदान केंद्र उभारणीची अभिनव कल्‍पना नायब तहसीलदार स्‍नेहलता स्‍वामी यांची असून अनुराधा ढालकरी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभल्‍यामुळे अनेक प्रशिक्षणार्थ्‍यांनी त्‍यांचे अभिनंदन केले. हे आदर्श मतदान केंद्र उभारणीसाठी सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर, प्रसाद कुलकर्णी तहसिलदार सामान्‍य, नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी, विजयकुमार पाटे, संजय भालके, राजेश कुलकर्णी, दत्‍तात्रय झरीवाड, मो. मजहर खादर, रमेश स्‍वामी, एस. एन. गोस्‍केवार, लक्ष्‍मीकांत मोरे, श्रीमती शोभा माळवतकर, संजय कोठाळे, श्रीमती सारिका आचमे, संजय वाकोडे तथा सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 
00000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...