Thursday, October 10, 2024

 वृत्त क्र. 929

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल

पात्र लाभार्थ्यांची रेल्वे 12 ऐवजी आता 23 ऑक्टोबरला नांदेडहून होणार रवाना

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :-  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून अयोध्या धामला जाण्यासाठी निघणार होती. परंतु या नियोजनात अंशत: बदल होवून ही रेल्वे  आता 23 ऑक्टोबर 2024 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे नियोजित होती. परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे यांचे निर्देश व इंडियन रेल्वे ॲन्ड केटरींग ॲन्ड टूरीझम कॉपोरेशन लि. यांचे सुधारित वेळापत्रकानुसार या यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल करुन आता ही यात्रा 23 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्या धाम येथे जाणार आहे.

राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घेवून  23 आक्टोंबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे निघणार असून 28 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्या धाम येथून परत येणार आहे.

00000

  वृत्त क्र. 928

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ 

नांदेड, दि. 10 ऑक्टोबर : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.  

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे (उदा :- चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-बेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.) खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केलेली असून पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

००००

 वृत्त क्र. 927

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 10 ऑक्टोबर : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शुक्रवार 11 ऑक्टोबर 2024 रोजी परळी जि. बीड येथून हेलिकॉप्टरने दुपारी १ वाजता माहूर हेलिपॅडवर आगमन. दुपारी 1.10 वाजता शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन. दुपारी 2 वा. माहूर जि. नांदेड येथून हेलिकॉप्टरने परळी जि. बीड कडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्र. 926  

 वृत्त क्र. 925

आज 10 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर

नांदेड दि. 10 ऑक्टोबर :  जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे  निधन बुधवार 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहिर केला आहे.  

                                 
दुखवटयाच्या दिवशी 10 ऑक्टोंबर 2024 रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर चढविण्यात यावा. या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.
00000

 वृत्त क्र. 924

नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

नांदेड दि १० ऑक्टोबर : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आज दिनांक 10 रोजी गुरुवारी होणाऱ्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे केला आहे. कार्यक्रमाबाबत नवीन तारीख, वेळ, स्थळ लवकरच जाहीर केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

श्री.रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील,असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे .या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे नांदेड येथील मोंढा मैदानावर आज दुपारी होणारा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रम नेमका कधी होईल हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन ठरविण्यात येईल व त्याबाबतचे अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील समस्त जनतेने विशेषता महिला भगिनींनी याची नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल.
000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...