Wednesday, July 16, 2025

वृत्त क्र. 734

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 16 जुलै 2025 रोजी दुपारी 12:03 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 17, 18 व 19 जुलै 2025 या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. ह्या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

000000

विकसित महाराष्ट्र २०४७ Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्यूआर कोडवर व https://wa.link/o93s9m यावर नागरिकांनी आपले मत नोंदवावे- जिल्हाधिकारी नांदेड


 

वृत्त क्र. 733 

मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

 

·         दिव्यांग व वयोश्री ज्‍येष्ठ नागरिकांना मिळणार साधनांचा लाभ

 

नांदेड, दि. 16 जुलै : सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीआयपी व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने मोजमाप नोंदणी शिबिराचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील तहसिलदार, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कानेकर, गटविकास अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

 

दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने व मोजमाप नोंदणी शिबिर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व बाबीचा पूर्व नियोजन आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, महापालिका यांनी या शिबिराच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचे नियोजनही यावेळी करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दिव्यांगाना युडीआयडी कार्ड, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शिबिराच्या ठिकाणी दिव्यांगाचे, जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, महसूल विभागाकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या. दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात सहभागासाठी त्यांचे आधारकार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (युडीआयडी), उत्पन्नाचा दाखला आदी आवश्यक कागदपत्र सोबत आणण्याचे आवाहनही त्यांनी  केले.

 

दिव्यांगाना या शिबिरात देण्यात येणाऱ्या साधनांचा तपशील

सर्व प्रकारचे कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत साधनांमध्ये अस्थिव्यंग प्रवर्गातील वयोगट 5 ते 100 यामधील दिव्यांगाना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या, रोलेटर, सीपीचेअर हे साहित्य देण्यात येणार.  अस्थिव्यंग प्रवर्ग वयोगट 18 ते 40 मोटराइज ट्रायसायकल यासाठी पात्रता 80 टक्के दिव्यंगत्व असलेले प्रमाणपत्र, 12 हजार रुपये स्थानिक सहभाग राहील. मतीमंद प्रवर्गासाठी व्हिलचेअर, एमआर किट (14 वर्षापर्यत), सीपीचेअर (12 वर्षापर्यत) हे साहित्य मिळेल. कर्णबधीर प्रवर्गासाठी वय 3 ते 100 या वयोगटासाठी  श्रावणयंत्र देण्यात येइल. अंध प्रवर्गातील वयोगट 5 ते 15 यामध्ये 75 टक्के वरील प्रमाणपत्रधारक यांना स्मार्ट केन, ब्रेल किट, डेसी प्लेअर तसेच अंध प्रवर्गातील वयोगट 15 ते 40 यामध्ये स्मार्ट फोन, स्मार्ट केन 75 टक्के वरील प्रमाणपत्रधारक यांना देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागासाठी दिव्यांगानी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.  दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, आधारकार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा रेशनकार्ड सत्यप्रत, पासपोर्ट साईज फोटो, शालेयअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक राहील.

 

या शिबिरात वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना सहाय्यभुत साधनांमध्ये चालण्याची काठी, वॉकर, क्रचेस, ट्रायपॉड, क्वाडपॉड, श्रावणयंत्र, व्हिलचेअर, कृत्रिम दाताची कवळी, चष्मे यांचा समावेश आहे. यासाठी बीपीएल कार्ड, आधारकार्ड, पिवळे राशनकार्ड आवश्यक आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली. यावेळी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे यांनी शिबिराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

00000








 वृत्त क्र. 732

 

तीन चाकी वाहनाच्या नोंदणीसाठी नविन मालिका

 

नांदेड दि. 16 जुलै :- परिवहन संवर्गातील तीन चाकी वाहनांसाठी एमएच 26 सीव्ही ही नविन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांचे (आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ई-मेलसह) अर्ज गुरुवार 17 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 17 जुलै रोजी दुपारी 4 वा. Text संदेश किंवा दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 731 

शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी

उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

 

नांदेड दि. 16 जुलै :-आपत्ती प्रसंगी शोध व बचाव कार्य करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले साह‍ित्‍याचे व‍ितरण ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय नांदेड येथे 16 तहस‍िल कार्यालय, 8 उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्‍युआरटी यांना नुकतेच वितरीत करण्‍यात आले.

 

यावेळी निवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी किरण अंबेकर, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी किशोर कुऱ्हे, ज‍ि.आ.व्‍य. सहायक गौरव त‍िवारी, आ.व्‍य. व‍िभागाचे बारकुजी मोरे म.स. कोमल नागरगोजे, मनपाचे अग्‍नीशमन व‍िभागाचे केरोजी दासरी, कांबळे, ना. तह. जेठे यांच्‍यासह सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी उपस्‍थित होते.

 

राज्‍य आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण व राज्‍य शासन ज‍िल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण यांच्‍याकडुन प्राप्‍त झालेले शोध व बचाव कार्यासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनास उपयोगी असे सा‍हित्‍य व‍ितरणांमध्‍ये तहस‍िल कार्यालय- माहुर, नांदेड, मुखेड, धर्माबाद, बिलोली, नायगाव, हदगाव व मनपा यांना रबरीबोट, बोटचे इंज‍िन व‍ितरीत करण्‍यात आले. तर उपविभागीय अध‍िकारी कार्यालय देगलूर, किनवट, नांदेड यांना ड्रोन कॅमेरासह इतर साहित्‍य व‍ितरीत करण्‍यात आले आहे. तसेच उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्‍युआरटीसह सर्व तहस‍िल कार्यालयांना शोध व बचाव कार्याकरीता आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी फायर एक्‍स्टींगग्रेसर, फायरमन पीक अॅक्‍स, फर्स्‍टऐड किट, गम सेफ्टी बुट, हॅण्‍ड गोल्‍ज, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, सेफ्टी गॉगल्‍स, बासकेट स्‍ट्रेचर, फायर ग्‍लास स्‍ट्रेचर, टुल कि‍ट, सेफ्टी हेलमेट, थ्रो बॅग्स, नेव्‍हीगेशन लाईट, रेडीओ वॉकी, नायलॉन रोप, एलईडी टॉर्च, अॅकर फॉर इनफ्लांटेबल रेस्‍‍क्‍यु बोट, ग्लॅवानाईज मेटल बकेट ऑर बेलर ट्वीन प्रॉनग ग्राफेल/कॅट हुक्स,चेन सॉ मशीन, अॅक्‍स/हॅस्‍चेट इ. साहि‍त्‍य व‍ितरीत करण्‍यात आले आहे.

 

नांदेड ज‍िल्‍हयाचा आपत्तीबाबतचा दरवर्षीचा अंदाज पुर्व त‍िहास पाहता साधरणतः ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या अखेरीस व सप्‍टेंबर मह‍िन्‍या मान्‍सुनच्‍या पावसाचे प्रमाण वाढते, अति‍वृष्‍टी होत असते. ज‍िल्‍हयातुन वाहणाऱ्या गोदावरी, पैनगंगा, आसना, मन्‍याड, लेंडी, कयाधु, मांजरा इ. नद्यांच्‍या पात्रातील व ज‍िल्‍हयातील धरणाच्‍या पाणीसाठ्यात वाढ होत असते. त्‍यामुळे मागील दोन-तीन वर्षापासून या कालावधीत ज‍िल्‍हयात पुरसदृश्‍य पर‍िस्‍थ‍िती न‍िर्माण होत असते. अशावेळी नांदेड शहरासह सर्व ज‍िल्‍हाभरात व‍िशेषतः नांदेड शहर व ग्रामीणसह, किनवट, माहुर, हदगाव, ह‍िमायतनगर, मुदखेड, उमरी, मुखेड, देगलूर, बिलोली, कंधार इ. ठ‍िकाणी पुरात अडकलेल्‍या शेतकरी, नागरीकांचे व पाळीव पशुंचे शोध व बचाव कार्य करावे लागल्‍याचा अनुभव आहे. त्‍यामुळे पुर्व तयारीचा भाग, दक्षता व शोध व बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांना सज्‍ज करण्‍यासाठी या शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाकरीता उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण करण्‍यात आले आहे.

00000





























15.7.2025.




 

  #मुख्यमंत्रीरोजगारनिर्मितीयोजना #नांदेड