Tuesday, February 23, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 76 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

1 हजार 349 अहवालापैकी 1 हजार 262 निगेटिव्ह 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- मंगळवार 23 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 76 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 50 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  32 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 349 अहवालापैकी 1 हजार 262 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 284 एवढी झाली असून यातील 22 हजार 61 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 418 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवार 22 फेब्रुवारीला किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 594 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, देगलूर कोविड रुग्णालय 1, गोकुंदा कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1 खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 32 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.74 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 16, भोकर तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 1, अर्धापूर 1, कंधार 1, लोहा तालुक्यात 3 असे एकुण 26 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, भोकर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 7, मुदखेड तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 1 असे एकूण 50 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 418 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 52, किनवट कोविड रुग्णालयात 19, हदगाव कोविड रुग्णालय 5, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 224, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 51, खाजगी रुग्णालय 32 आहेत.   

मंगळवार 23 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 153, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 52 एवढी आहे.   

·         जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 23 हजार 821

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 96 हजार 89

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 284

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 61

एकुण मृत्यू संख्या-594                            

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-418

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-10.                       

0000

 

 

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना

आता अधिनियमातील शक्तीचे पाठबळ

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- बालविवाहाला प्रतिबंध व्हावा व कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीला यात भरडावे लागू नये यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर पावले उचली आहेत. ग्रामीण भागातही याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता या अधिनियमातील कलम 16 च्या पोटकलम 1 अन्वये ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करता यावा व कर्तव्य पार पाडता यावीत यासाठी ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तसे आदेश त्यांनी आज निर्गमीत केले. 

याचबरोबरच सर्व नागरिक, आई-वडिल, पालक, प्रिंटींग प्रेस, पुरोहित (सर्व धर्मिय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटरर्स, व्यवस्थापक, मंगल कार्यालय तसेच लग्न कार्याशी जे कोणी संबंधित व्यावसायिक जर बालविवाहला चालना देतांना, त्यांच्यासाठी सहकार्य करतांना, लग्नाचे विधी करतांना आढळतील अथवा या कार्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करतील त्यांना दोन वर्षापर्यंत एवढ्या कालावधीचा सश्रम कारावास शिक्षा व एक लाख रुपयापर्यंत द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर अशा बालविवाहस उपस्थित राहणाऱ्या व्यक्ती किंवा यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश आहे. 

विवाह करणाऱ्या व्यक्ती यात कायदानुसार सज्ञान म्हणजेच मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 असल्याची खातरजमा करुनच विवाह संबंधित कामे करावीत. शिवाय या संबंधितची माहिती फलक दर्शनी भागावर डकविण्याबाबतही आदेशात सांगितले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या अधिनियमाच्या कारवाईबाबत तसे स्पष्ट आदेश मंडप डेकोरेशन व्यवस्थापक, सर्व आचारी-केटरर्स, सर्व प्रिंटींग प्रेस, सर्व पुरोहित सर्व छायाचित्रकार, सर्व मंगल कार्यालय व्यवस्थापक यांच्या नावे काढली आहेत.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...