Monday, September 11, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 11 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 सप्टेंबर 2017 रोजी पेन्‍शन अदालत आयोजीत करण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्‍त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्‍या अडचणी निवारण्‍यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

000000
राज्य निवडणूक आयुक्त
जे. एस. सहारिया यांचा दौरा
नांदेड दि. 11 :- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया हे नांदेड येथे येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 13 सप्टेंबर 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 11 वा. नांदेड येथे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व नोडल ऑफीसर, निवडणूक अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व आयकर अधिकारी यांच्या समवेत बैठक. ग्रामपंचायत निवडणुक आढावा बैठक. नांदेड येथे मुक्काम. गुरुवार 14 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.50 वा. नांदेड येथुन वाशिमकडे प्रयाण करतील.

00000
ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 11 :-  किनवट तालुक्यातील जरुरी, भिमपूरी / सिरमेटी, मारेगाव वरचे, पिंपरफोडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने मतदानाच्या दिवशी शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान केंद्र परिसरात व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 25 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.   
 या ग्रामपंचायतीच्या मतदान व मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. किनवट तालुक्यातील जरुरी, भिमपूरी/सिरमेटी, मारेगाव वरचे, पिंपरफोडी या ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत शनिवार 23 सप्टेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

00000
ग्रामपंचायत मतदानासाठी
स्थानिक सुट्टी जाहीर  
नांदेड दि. 11 :- किनवट तालुक्यातील भिमपूर / सिरमेटी, जरुर, मारेगाव (व), पिपरफोडी येथील ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक व रिक्त पदाच्या पोट निवडणुकीसाठी शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. या क्षेत्रात मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी या मर्यादीत क्षेत्रापुरती शनिवार 23 सप्टेंबर 2017 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

0000
शिल्पनिदेशक पदासाठी
18 सप्टेंबर रोजी मुलाखत
नांदेड दि. 11 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शिल्प कारागीर योजनेंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर तत्वाभ्यास (थेअरी) व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी भरावयाची आहे. इच्छुक पात्र उमेदवारानी मुलाखतीसाठी मुळ व छायांकीत कागदपत्रासह सोमवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.  
जोडारी, कातारी, घर्षक, मशिनिष्ट, साचेकार, वेल्डर, एम्प्लायबिलिटी स्किल्स, कटींग ॲन्ड सुईग, मेसन, टीडीएम, वायरमन, गणित निदेशक, ड्राफ्टसमन (सिव्हील / मेकॅनिक), यांत्रिक मोटार गाडी (एमएमव्ही), ट्रॅक्टर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅ., आर्किटेक्चरल असिस्टंट या व्यवसायासाठी उमेदवार हा मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीकल, सिव्हील अभियांत्रिकी मधील किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी किंवा पदविका उत्तीर्ण आसावा. त्यानंतरचा एक, दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतरचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच शिल्पनिदेशक एम्प्लायबिलिटी स्किल्स या पदासाठी एमबीए, बीबीए ही पदवी असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...