Friday, June 12, 2020

वृत्त क्र. 544



19 लाख 44 हजार किंमतीचा गुटखा जप्त
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्यास कारवाई  
नांदेड (जिमाका) दि. 12 :- देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये वजीर गुटखा 40 बोरी प्रत्येक बोरीमध्ये 6 छोटया बॅग, बॅगमध्ये 54 पॅकेट असे एकत्रीत 12 हजार 960 पॅकेट किंमत एकुण  19 लाख 44 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र. एमएच 18- अेअे 1666 या वाहनातील प्रतिबंधित अन्न पदार्थाची 12 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर यांनी ही तपासणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोमीनपुरा येथील आरोपी वाहन मालक गुलामखान गौसाखान व कंधार तालुक्यातील गउफळ आंबुलगा येथील वाहन चालक बालाजी नागोराव श्रीमंगले वय वर्षे 50 यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस स्टेशन देगलूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मा. न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधितास आजीवन तुरुंगवास आणि 10 लाख रुपये पर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर व संतोष कनकावाड तसेच नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक बी.एम. धबडगे, पोलिस उपनिरीक्षक एम.एस. ठाकूर तसेच पो. कॉ. श्री. लुंगारे,श्री. यमलवाड यांचे सहकार्याने केली आहे.
00000

वृत्त क्र. 543


शेतकऱ्यांनी गटांमार्फत खते, बियाणे
खरेदी केल्यास खर्चात बचत
नांदेड (जिमाका) दि. 12 :-  शेतकऱ्यांनी गटांमार्फत खते, बियाणे व निविष्ठा खरेदी केल्यास खरेदी खर्चात बचत होण्यासमवेत बाजारातील गर्दी कमी होऊन कोरोनाचा प्रार्दुभाव टाळता येईल, असे आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे.
खरीप पेरणीपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथे नुकताच शारीरिक आंतर राखून संपन्न झाला. कृषी विभागामार्फत शेतकरीभिमुख विविध उपक्रम हाती घेतले असून गट शेतीला चालना दिली जात आहे.  
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवड, व्हर्मी कंपोस्टिंग, न्याडेप कंपोस्टिंग करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले.  शेतकऱ्यांना बांधावरील निंबोळी गोळा करण्याविषयी माहिती देवून निंबोळी अर्काचे महत्व त्यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सोयाबीन उगवण क्षमता चाचणीबाबत माहिती दिली. बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन, बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणीस वापरावे असे मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत  यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेविषयी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले. या प्रशिक्षणास गावातील जयराम सोनटक्के, शंकर सोनटक्के, मारोती घोरपडे, बाबुराव सोनटक्के, गंगाधर सोनटक्के, कैलास सोनटक्के, प्रभाकर सोनटक्के, नागोराव ठाकूर, दत्ता सोनटक्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी कृषी मित्र ज्ञानोबा सोनटक्के यांनी आभार मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर सोनटक्के, ज्ञानोबा सोनटक्के, मारोती घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.
0000

वृत्त क्र. 542


दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह 
 बाधितांमध्ये 7 पुरुष तर 3 महिलांचा समावेश
एकवीस बाधितांना बरे झाल्याने सुट्टी   
नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 10 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 234 वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या आज वाढली जरी असली तरी दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 21 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.  
दहा बाधितांपैकी 7 पुरुष तर 3 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 22, 26, 30, 36, 49, 55 व 61 वर्षाचे 7 पुरुष  तर महिलांमध्ये 20, 55 व 5 वर्षांच्या मुलींचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 160 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील 74 वर्षाचा पुरुष आणि नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाची एक महिला असे दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हे दोन रुग्ण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार घेत होते. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास, मधुमेह आदी आजार होते. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
शुक्रवार 12 जून रोजी प्राप्त झालेल्या 47 अहवालापैकी 37 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 61 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 5 बाधितांपैकी  50, 65 वर्षाच्या दोन महिला आणि 38, 52 व 54  वर्षाचे तीन पुरुष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड जिल्ह्यात 61 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 36, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर  1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित आणि 1 बाधित हा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून औरंगाबाद येथे 4 बाधित व्यक्ती संदर्भित झाला आहे.  शुक्रवार 12 जून रोजी 113 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 361, 
घेतलेले स्वॅब
 4 हजार 809, 
निगेटिव्ह स्वॅब
 4 हजार 191, 
आज
 पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 10, 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती
 234, 
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या
 181, 
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,
 
मृत्यू संख्या-
 13, 
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 160, 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती
 61, 
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 113 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000


वृत्त क्र. 541


नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 23.53 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात शुक्रवार 12 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 23.53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 376.51 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 71.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8.02 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 12 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 16.38 (102.27), मुदखेड- 18.67 (61.01), अर्धापूर- 5.33 (50.33), भोकर- 31.50 (94.00), उमरी- 32.00 (57.00), कंधार- 20.67 (59.84), लोहा- 13.67 (62.83), किनवट- 8.86 (38.14), माहूर- 19.00 (58.00), हदगाव- 5.29 (69.57), हिमायतनगर- 30.00 (101.67), देगलूर- 29.00 (94.26), बिलोली- 33.80 (54.80), धर्माबाद- 38.00 (79.99), नायगाव- 39.20 (63.20), मुखेड- 35.14 (96.13). आज अखेर पावसाची सरासरी 71.44 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1143.04) मिलीमीटर आहे.
00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...