Friday, June 12, 2020

वृत्त क्र. 543


शेतकऱ्यांनी गटांमार्फत खते, बियाणे
खरेदी केल्यास खर्चात बचत
नांदेड (जिमाका) दि. 12 :-  शेतकऱ्यांनी गटांमार्फत खते, बियाणे व निविष्ठा खरेदी केल्यास खरेदी खर्चात बचत होण्यासमवेत बाजारातील गर्दी कमी होऊन कोरोनाचा प्रार्दुभाव टाळता येईल, असे आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे.
खरीप पेरणीपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड तालुक्यातील वाहेगाव येथे नुकताच शारीरिक आंतर राखून संपन्न झाला. कृषी विभागामार्फत शेतकरीभिमुख विविध उपक्रम हाती घेतले असून गट शेतीला चालना दिली जात आहे.  
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवड, व्हर्मी कंपोस्टिंग, न्याडेप कंपोस्टिंग करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले.  शेतकऱ्यांना बांधावरील निंबोळी गोळा करण्याविषयी माहिती देवून निंबोळी अर्काचे महत्व त्यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सोयाबीन उगवण क्षमता चाचणीबाबत माहिती दिली. बियाणे उगवण क्षमता चाचणी घेऊन, बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणीस वापरावे असे मंडळ कृषी अधिकारी सतीश सावंत  यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेविषयी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले. या प्रशिक्षणास गावातील जयराम सोनटक्के, शंकर सोनटक्के, मारोती घोरपडे, बाबुराव सोनटक्के, गंगाधर सोनटक्के, कैलास सोनटक्के, प्रभाकर सोनटक्के, नागोराव ठाकूर, दत्ता सोनटक्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी कृषी मित्र ज्ञानोबा सोनटक्के यांनी आभार मानले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर सोनटक्के, ज्ञानोबा सोनटक्के, मारोती घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.
0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...