माहुर येथे वृक्षारोपण मोहिमेचा 1 जुलैला
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ
जिल्ह्यात 17 लाख 52 हजार वृक्ष लागवडीसाठी जिल्हा प्रशासन
सज्ज
नांदेड दि. 29
:- चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड
जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ 1 जुलै रोजी सकाळी 10 वा. माहुर येथील दत्तशिखर
मंदिर परिसरात होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन,
दुग्धविकास व मत्स्य विकास तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या
हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव
चव्हाण हे राहणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद
अध्यक्ष श्रीमती शांताबाई पवार, खासदार राजीव सातव, खासदार डॉ. सुनिल गायकवाड,
आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार डी. पी.
सावंत, आमदार प्रदीप नाईक, आमदार वसंत चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार
सुभाष साबणे, आमदार सौ. अमिता चव्हाण, आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील
आष्टीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, माहुर
नगरपंचायतीचे अध्यक्ष फेरोज खादर दोसानी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पर्यावरणाचे असंतुलन, असमतोल, वाढते प्रदुषण आणि त्यातून होत असलेले
पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी
शासनाचे विविध विभाग व लोकसहभागातून
येत्या 1 जुलै रोजी “वृक्ष लागवडीचा” महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यास
दिलेले वृक्षारोपणाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्यरित्या
नियोजन केले आहे. सर्वांनी वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत सहभागी होवून वृक्षारोपण
करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
वन व
सामाजिक वनीकरण विभाग नांदेड यांच्यावतीने 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवडीची
मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 17 लाख 52 हजार 876 वृक्ष
लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात वन विभागाकडून 9 लाख 48
हजार 925 , सामाजिक वनीकरण विभागाकडून 1 लाख 51 हजार 375, वनविकास महामंडळाकडून 1
लाख 17 हजार 600, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना 364 प्रमाणे 4 लाख 76 हजार 476
व इतर यंत्रणाकडून 59 हजार 100 असे एकुण 17 लाख 52 हजार 876 वृक्ष लागवडीचे
उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी रोपांची उपलब्धताही करण्यात आलेली आहे. या
रोपांचे वितरण सुलभरित्या होण्यासाठी नियोजनही करण्यात आले आहे. वन विभागाच्या
"रोपे आपल्या दारी" या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात भोकर, नांदेड, देगलूर,
मुखेड, हदगाव, हिमायतनगर, माहूर, बोधडी, इस्लापूर, अप्पारावपेठ, मांडवी, किनवट या
बारा वनपरिक्षेत्राच्या ठिकाणी प्रत्येकी तीन वनमहोत्सव रोप विक्री केंद्रे सुरु
केली आहेत. त्याठिकाणी सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होणार आहेत. वृक्षरोपणाच्या या
कार्यक्रमात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शासकीय, निमशासकीय विभाग,
ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, एनएसएस, एनसीसी, स्काउट अॅड
गाईड्स, हरित सेना, सहकारी संस्था आदींचा सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती
उपवनसंरक्षक आशिष
ठाकरे यांनी दिली.
0000000