Thursday, June 29, 2017

पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड दि. 29 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 30 जुन 2017 रोजी हैद्राबाद येथुन मोटारीने रात्री 2 वा. माहुर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह माहुर येथे मुक्काम.
शनिवार 1 जुलै 2017 रोजी सकाळी 9.30 वा. रेणुकामाता मंदीर माहुर येथे देवीचे दर्शन. सकाळी 10 वा. चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या शुभारंभ समारंभास उपस्थिती. स्थळ- दत्तशिखर मंदिर परिसर माहुर. दुपारी 12.30 वा. माहुरगड विकास आराखडा आढावा बैठक. स्थळ- तहसिल कार्यालय माहुर. दुपारी 1.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. माहूर येथुन मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 5 वा. नांदेड येथे आगमन व महावीर बावरी नांदेड येथे भेट व नांदेड येथे झालेल्या कामाची पाहणी व बैठक. सायं. 6 वा. आषाढी महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.  

0000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...