Thursday, June 29, 2017

रास्तभाव धान्य दुकानात
जुलैसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 29 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी जुलै 2017 करीता साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे
या नियतनानुसार प्रती  शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. जिल्ह्यासाठी 748.06 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड व लोहा- 6.5, हदगाव- 67.7, किनवट- 154, भोकर- 37, बिलोली- 56.48, देगलूर- 49, मुखेड- 67.31, कंधार- 43.07, लोहा- 35, अर्धापूर- 15, हिमायतनगर- 33, माहूर- 65, उमरी- 28, धर्माबाद- 25, नायगाव- 50, मुदखेड- 16. सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000



No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...