Saturday, September 26, 2020

 

जिल्ह्यात रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्यास मुभा                                   

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी (लॉकडाउन) मधून प्रत्येक रविवारी दुकाने-आस्थापना चालू ठेवण्याची मुभा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. 

आदेशातील नियमावलीसह 30 सप्टेंबर 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. परंतू जिल्ह्यात दुकाने आस्थापना रविवारी बंद असल्याने दर शनिवारी व सोमवारी गर्दी होत होती. त्यामुळे इतर अनुषंगिक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून ही गर्दी कमी होण्यासाठी प्रत्येक रविवारी दुकाने आस्थापना चालू ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये संपुर्ण नांदेड जिल्हयात यापुढे प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सर्व दुकाने / आस्थापना चालू ठेवण्याची ताळेबंदी (लॉकडाऊन)  मधुन मुभा दिली आहे. 

या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 23 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

00000

 

255 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

222 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- शनिवार 26 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 255 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 222 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 81 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 141 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 19 अहवालापैकी  752 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 14  हजार 890 एवढी झाली असून यातील 10  हजार 952 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 481 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.                                                                  

या अहवालात एकुण पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मंगळवार 22 सप्टेंबर रोजी तरोडा नाका नांदेड येथील 63 वर्षाच्या एका पुरुषाचा तर शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी उमरी येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, हडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, विष्णुपुरी नांदेड येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील रुग्णालयात, धनेगाव नांदेड येथील 54 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 386 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 18, बिलोली कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, मुखेड कोविड केअर सेंटर 13, भोकर कोविड केअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 17, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 12, किनवट कोविड केअर सेंटर 16, लोहा कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 20, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 119, हदगाव कोविड केअर सेंटर 4, मुदखेड कोविड केअर सेंटर 4, बारड कोविड केअर सेंटर 2 असे 255 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 57, देगलूर तालुक्यात  2, अर्धापूर तालुक्यात  2, बिलोली तालुक्यात 7, परभणी 4, मुखेड तालुक्यात  4, हदगाव तालुक्यात  2, हिंगोली 1, यवतमाळ 1, लातूर 1 असे एकुण 81 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 58,  हदगाव तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 5, देगलूर तालुक्यात  4, माहूर तालुक्यात  1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड तालुक्यात 7, लोहा तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 32, नायगाव तालुक्यात 3, कंधार तालुक्यात 3, उमरी तालुक्यात 2असे एकूण 141 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 481 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 267, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 815, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 89, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 40,  आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 28, नायगाव कोविड केअर सेंटर 97, बिलोली कोविड केअर सेंटर 31, मुखेड कोविड केअर सेंटर 143, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 77, लोहा कोविड केअर सेंटर 43, हदगाव कोविड केअर सेंटर 31, भोकर कोविड केअर सेंटर 41, कंधार कोविड केअर सेंटर 25, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 113, मुदखेड कोविड केअर सेटर 47,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 16, किनवट कोविड केअर सेंटर येथे 99, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, उमरी कोविड केअर सेंटर 61, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 25,  खाजगी रुग्णालयात 314 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 2, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, आदिलाबाद येथे संदर्भित 1 झाले आहे.   

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 79 हजार 487,

निगेटिव्ह स्वॅब- 60 हजार 687,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 890,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 12,

एकूण मृत्यू संख्या- 386,                         

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 10 हजार 952,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 481,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 561, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 44,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

 





 

नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

माझे कुटूंब माझी जबाबदारी आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनातर्फे सादरीकरण   

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून भागणार नाही. प्रत्येक कुटूंबाने आपली जबाबदारी ओळखत सुरक्षितता बाळगली तर जनजीवन सुरळीत होण्यासह रोजगार सुरक्षित होण्यास मोठा हातभार लागेल. यासाठी शासन पातळीवरुन जिल्हा प्रशासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम कल्पक व प्रभावीपणे राबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे या मोहिमेंतर्गत लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. एखाद्या कुटूंबात कुणाला आरोग्य विभागाने गृहविलगीकरणाचा सल्ला दिला तर त्याला ही प्रक्रिया सहज आणि सुलभ लक्षात यावी व याचबरोबर अत्यावश्यक असलेली औषधोपचार देता यावीत यासाठी एक कल्पक कीट तयार करण्यात आले. या कीटचेही त्यांनी कौतुक करुन इतर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नबाब मलिक, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विशेष पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधिक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक आदी अधिकारी उपस्थित होते.

 

नांदेड जिल्हा प्रशासनाची सर्व टिम परस्परांशी योग्य समन्वय राखत कोविड-19 च्या या काळात अतिशय चांगले काम करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्यादृष्टीने ऑक्सीजन वाहतुकीसाठी टँकरची उपलब्धी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेवा-सुविधा विस्तारासाठी करावे लागणारे नियोजन याकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहमती दर्शविली. याबाबत तातडीने हा प्रश्न मार्गी लावू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.   

 

नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा असून त्याप्रमाणात आव्हाने जास्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या आव्हानावर यशस्वी मात करता येणे जिल्हा प्रशासनाला सुकर झाले असून माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत गृहविलगीकरणासाठी आरोग्याच्यादृष्टिने एक परिपूर्ण अशी कीट तयार करण्यात आली असून ज्या व्यक्तींना वैद्यकीय टिमने विलगीकरणासाठी सूचविले आहे अशा व्यक्तींना ही किट दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. या कीटमध्ये मास्क, गृहविलगीकरण मार्गदर्शीका, अत्यावश्यक औषधे, डेटॉल साबण आदी साहित्य ठेवण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात या मोहिमेत अधिकाधिक सेवाभावी संस्थांचा सहभाग घेण्याचे नियोजन केले असून लोककला, पारंपारिक कला यांचा आरोग्य साक्षरतेसाठी प्रभावी उपयोग करु असे ते म्हणाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी,  पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, डॉ. शरद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...