Friday, August 9, 2024

 वृत्त क्र. 688 

विधानसभेसाठी आज व उद्या विशेष मतदार नोंदणी अभियान

 20 ऑगस्टपर्यत मतदार बनण्याची संधी  

नांदेड, दि. 9 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी ज्या अठरा वर्षावरील नागरिकांचे नाव मतदान यादीत नसतील किंवा ज्यांच्या घरी कोणी मृतक झाले असेल तर त्यांचे नाव वगळण्यासाठी उद्या शनिवार 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. नागरिकांसाठी दररोज ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र शनिवार व रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदान नोंदणी अभियान उद्या दिनांक 10 व परवा दिनांक 11 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 1718 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी तसेच आपल्या हरकती व दावे नोंदविण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत आपल्या नियमित मतदार केंद्रावर दररोज मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ) उपस्थित राहणार आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर अंतिम होणाऱ्या यादीतील मतदारांनाच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करता येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट,हदगाव,भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उद्या मतदार केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या बीएओकडून अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

 वृत्त क्र. 687

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नॉर्मल व सीबीसी योजनेत दंडव्याज माफीची संधी

नांदेड दि. 9 ऑगस्ट :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोटियम बँक फायनान्स या दोन्ही योजनासाठी दंडव्याज माफी जाहीर केली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 मधील वसुली तरतुदीअंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येऊ नये  यासाठी कर्जदार कारागिरांनी फक्त मुद्दल व सरळ व्याज एकरकमी भरणा 30 सप्टेंबर 2024 पर्यत करावा आणि दंडव्याज माफी संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत खादी आयोग निधी योजनेअंतर्गत सन 1962 ते सन 1995 पर्यत तसेच सन 1995 ते सन 2001 पर्यत कन्सोर्टीयम फायनान्स अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जात होते. या कर्जाची अंशत वसुली झाली आहे. काही कारागिरांचे कर्ज थकित राहील्यामुळे संबंधितावर महसुली वसुली प्रस्ताव (आर.आर.सी) बाबत कार्यवाही करुन महसूल दस्ताऐवजामध्ये शासकीय थकबाकीची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ , जिल्हा कार्यालय, उद्योग भवन एमआयडीसी एरिया, शिवाजीनगर नांदेड यांचा दूरध्वनी क्रमांक 02462-240674/9421841809 वर संपर्क साधावा असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 686

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा दौरा

नांदेडदि. ऑगस्ट :- राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


शनिवार 10 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथून विमानाने सकाळी 11 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुखेडकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता मुखेड येथे आगमन व मातंग समाजाच्या भव्य मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता मुखेड येथील शिवसेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन. दुपारी 2 वाजता मुखेडहून खतगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता श्री. बालाजी खतगावकर मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 3.15 वाजता खतगाव येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं 4 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.

00000

 वृत्त क्र. 685

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड दि. 9 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 684

आपत्तीच्या जनजागृतीसाठी रविवारी रॅली व मॅरेथॉनचे आयोजन

नांदेड दि. ऑगस्ट :- राज्यात उध्दभवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी रॅली/मॅरेथान कार्यक्रम रविवार 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मॅरेथॉनरॅलीमध्ये राष्ट्रीय कॅडेट कोअरराष्ट्रीय सेवा योजनाआपदा मित्रहोमगार्ड व स्काऊट गाईडमहसूल व इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.

ही रॅलीमॅरेथान रविवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते पोलीस अधिक्षक कार्यालय मार्गे स्टेडीयम नांदेड पर्यत आयोजित केली आहे. शासन निर्णयात नमूद विविध प्रसिध्दी संस्थाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. तरी सर्वांनी या रॅलीत सहभाग घ्यावाअसे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी महेश वडदकर यांनी  केले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...