Tuesday, March 20, 2018


दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा  मार्गदर्शन शिबिर

उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,सेतू समिती,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने शुक्रवार दि. 23 मार्च शनिवार 24 मार्च 18 रोजी डॉ.श्ंकरराव चव्हाण प्रेक्षागृह,स्टेडियम परिसर,नांदेड या ठिकाणी दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 शुक्रवार दि. 23 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात प्रा.अनिल कोलते,औरंगाबाद हे सामान्य विज्ञान या विषयावर  दु.2 ते 5 या वेळेत प्रा.विठठल पुंगळे,औरंगाबाद हे भूगोल या विषयावर मार्गदर्शन करतील. शनिवार दि.24 मार्च रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत अँड अनंत खेळकर,अकोला हे विद्यार्थ्यांसाठी ' डिप्रेशन टू डेस्टीनेशन ' हा प्रेरणादायी हास्य कार्यक्रम सादर करतील त्यानंतर .11.30 ते सांय 5 या वेळेत प्रा.सचिन ढवळे,पुणे हे गणित बुध्दिमत्ता कल चाचणी या विषयावर मार्गदर्शन करतील.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणा-या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

सदर मार्गदर्शनशिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.


बेपत्ता महिलेचा शोधा
        नांदेड, दि. 20 :- पटेल कॉलनी नांदेड येथील सौ. जयश्री गणेश मठपती (वय 30) ही रविवार 18 मार्च 2018 पासून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग-गोरा, बांधा सडपातळ, अंगात काळी क्रिम रंगाची पंजाबी, उंची 5 फुट, भाषा मराठी, हिंदी येते. या वर्णनाची महिला बेपत्ता असून कोणास आढळून आल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...