Wednesday, September 21, 2016

जिल्ह्यात दिवसभरात
सरासरी 18.13 मि.मी. पाऊस   
           नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात  बुधवार 21 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 290.04 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 18.13 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 829.53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  86.81 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात बुधवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 14.25 (916.76), मुदखेड- 33.00 (660.02), अर्धापूर- 20.67 (891.66) , भोकर- 24.25 (1031.00), उमरी- 32.00 (719.60), कंधार- 9.50 (726.14), लोहा- 17.33 (954.67), किनवट- 12.86 (876.60), माहूर- 33.25 (1108.50), हदगाव- 32.86 (954.97), हिमायतनगर- 16.00 (827.98), देगलूर- 15.33 (596.51), बिलोली- 8.00 (820.00), धर्माबाद- 4.00 (695.05), नायगाव- 11.60 (741.20), मुखेड- 5.14 (751.84) आज  अखेर  पावसाची सरासरी 829.53  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 13272.50) मिलीमीटर आहे. 

00000
दुर्गादेवी मंडळांना वर्गणीसाठी
ऑनलाईन नोंदणीचे आवाहन
  नांदेड, दि. 21 :- दुर्गादेवी मंडळासाठी वर्गणी गोळा करण्याचा परवाना 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत धर्मादाय उपआयुक्त कार्यालय नांदेड यांच्यामार्फत कार्यालयीन वेळेत देण्यात येत आहे. ही परवानगी ऑनलाईन पद्धतीने असून ऑनलाईन नोंदणी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करुन परवानासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. दुर्गादेवी मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेवूनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनिवार यांनी केले आहे.

00000
महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 21 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी तर तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभुत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रभावी उपाय योजना म्हणून राज्य महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो.

00000
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या
जयंतीबाबत निर्देश    
        नांदेड, दि. 21 :-  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रत्येक वर्षी 15 ऑक्टोंबर रोजी साजरी करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 रोजी राज्यभर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.
            जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात शनिवारी 15 ऑक्टोंबर रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...