Tuesday, December 1, 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020


जिल्ह्यात 64.07 टक्के मतदान

वृध्दांसह नवीन पदवीधर मतदारांनी दाखविला उत्साह  

 
नांदेड (जिमाका) दि.1 :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

साठी नांदेड जिल्ह्यातील वृध्दांसह नवीन पदवीधर मतदारांनी उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला . जिल्ह्यात अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने कुठेही अनुचित प्रकार न होता मतदान 64.07 टक्के झाले. जिल्ह्यातील मतदार यादीनुसार एकूण 49 हजार 285 एवढे मतदार असून यात 10 हजार 853 स्त्री, 38 हजार 432 पुरुष मतदार आहेत. जिल्हाभर विखुरलेल्या मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने 123 मतदान केंद्र उभारली होती. सकाळी 8-00 ते सांयकाळी 5-00 पर्यंत हे मतदान कोविडअतंर्गत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन घेण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर व प्रत्येकाचे तापमानही तपासण्यात आले.


नांदेड जिल्ह्यातील एकूण 123 मतदान केंद्रावर सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत 64.07 टक्के मतदान झाले. यात नांदेड तालुक्यातील 30 मतदान केंद्रावर 56.72 , मुखेड तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 66.78 टक्के , अर्धापूर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 69.58 टक्के , भोकर तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 67.70 टक्के, उमरी तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 76.90 टक्के, कंधार तालुक्यातील नऊ मतदान केंद्रावर 62.71 टक्के, लोहा तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 63.48 टक्के, किनवट तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के, माहूर तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 74.92 टक्के, हदगाव तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 70.87 टक्के , हिमायतनगर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 70.76 टक्के, देगलूर तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 67.55 टक्के, बिलोली तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 70.92 टक्के, धर्माबाद तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 69.64 टक्के, नायगाव तालुक्यातील सात मतदान केंद्रावर 69.16 टक्के, मुखेड तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.28 टक्के एवढे मतदान झाले . यात संपूर्ण जिल्हाभर 26 हजार 331 पुरुषांनी तर 5 हजार 247 स्त्री मतदारांनी मतदान केले. एकूण 49 हजार 285  मतदारांपैकी 31 हजार 578 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदाराच्या टक्केवारीत हे प्रमाण 64.07 टक्के ऐवढे होते.  

 

0000

 


 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

 जिल्ह्यात 64.07 टक्के मतदान

वृध्दांसह नवीन पदवीधर मतदारांनी दाखविला उत्साह  

 

नांदेड (जिमाका) दि.1 :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी नांदेड जिल्ह्यातील वृध्दांसह नवीन पदवीधर मतदारांनी उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला . जिल्ह्यात अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने कुठेही अनुचित प्रकार न होता मतदान 64.07 टक्के झाले. जिल्ह्यातील मतदार यादीनुसार एकूण 49 हजार 285 एवढे मतदार असून यात 10 हजार 853 स्त्री, 38 हजार 432 पुरुष मतदार आहेत. जिल्हाभर विखुरलेल्या मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने 123 मतदान केंद्र उभारली होती. सकाळी 8-00 ते सांयकाळी 5-00 पर्यंत हे मतदान कोविडअतंर्गत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन घेण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर व प्रत्येकाचे तापमानही तपासण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील एकूण 123 मतदान केंद्रावर सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत 64.07 टक्के मतदान झाले. यात नांदेड तालुक्यातील 30 मतदान केंद्रावर 56.72 , मुखेड तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 66.78 टक्के , अर्धापूर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 69.58 टक्के , भोकर तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 67.70 टक्के, उमरी तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 76.90 टक्के, कंधार तालुक्यातील नऊ मतदान केंद्रावर 62.71 टक्के, लोहा तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 63.48 टक्के, किनवट तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के, माहूर तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 74.92 टक्के, हदगाव तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 70.87 टक्के , हिमायतनगर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 70.76 टक्के, देगलूर तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 67.55 टक्के, बिलोली तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 70.92 टक्के, धर्माबाद तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 69.64 टक्के, नायगाव तालुक्यातील सात मतदान केंद्रावर 69.16 टक्के, मुखेड तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.28 टक्के एवढे मतदान झाले . यात संपूर्ण जिल्हाभर 26 हजार 331 पुरुषांनी तर 5 हजार 247 स्त्री मतदारांनी मतदान केले. एकूण 49 हजार 285  मतदारांपैकी 31 हजार 578 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदाराच्या टक्केवारीत हे प्रमाण 64.07 टक्के ऐवढे होते.  

 

0000

 

 

वृत्त क्र. 900                                                                                                       

 23 कोरोना बाधितांची भर तर

47 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 

नांदेड (जिमाका) दि.1 :- मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 23 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 47 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या 807 अहवालापैकी 774 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 411 एवढी झाली असून यातील 19 हजार 304 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 364 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 549 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 19, भोकर कोविड रुग्णालय 2, माहूर तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 47 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.57 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 4, मुखेड तालुक्यात 2, राजस्थान 1, देगलूर 1, किनवट 1 असे एकुण 9 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, मुखेड तालुक्यात 1, यवतमाळ 2, किनवट 3, बीड 1  असे एकुण 14 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 364 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 30, मुखेड कोविड रुग्णालय 19, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 7, देगलूर कोविड रुग्णालय 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 76, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 122, खाजगी रुग्णालय 30 आहेत.

 

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 173, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 52 हजार 136

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 23 हजार 784

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 411

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 304

एकूण मृत्यू संख्या- 549

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.57 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-425

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-364

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.

 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

 

 

कोविडचे मोठया प्रमाणातील रुग्ण लक्षात घेता

महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा  

-जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

नांदेड (जिमाका) 1  :-नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आजवर जिल्ह्यातील बाधितांची संख्या व बरे होवून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या विचारात घेता स्थिती आटोक्यात जरी असली, तरी या संसर्गजन्य आजाराचा धोका टळलेला नाही. सदर वस्तुस्थिती लक्षात घेता भारतरत्न                      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे गत आठ महिन्यात सर्व धार्मिक सण व उत्सव जिल्हावासियांनी अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्र न येता साजरे करुन सार्वजनिक आरोग्याला अधिक महत्व दिले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही जिल्हाधिकारी यांनी केला .

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधित कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासून लागू केला आहे. यात खंड दोन, तीन, चार मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. याचबरोबर केंद्र शासनाने टप्प्या-टप्प्याने लागू केलेले लॉकडाऊन 31 डिसेंबर, 2020 पर्यंत लागू करण्यात आले आहे. सदर परिस्थितीचा विचार करता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सुचना जिल्हादंडाधिकारी यांच्या मान्यतेने विहीत केल्या आहेत. त्या सुचना पुढीलप्रमाणे आहेत.

 

1.      नांदेड शहरात व जिल्‍ह्यामध्‍ये अद्यापही कोरोनाचे रूग्‍ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्‍य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्‍यात आलेले सर्व धर्मीय सण/उत्‍सव अत्‍यंत साध्‍या पध्‍दतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केले आहेत. त्‍यामुळे या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर, 2020 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविडच्‍या पार्श्‍वभुमीवर पुर्ण खबरदारी घेऊन अत्‍यंत साध्‍या पदधतीने पार पाडण्‍यात यावा. 

2.      कोवीड विषाणूच्‍या पार्श्‍वभुमीवर चैत्‍यभुमी, दादर येथे जाण्‍यावर निर्बंध असल्‍याने व दादर तसेच महाराष्‍ट्रातील अन्‍य रेल्‍वे स्‍थानकांवरही गर्दी करण्‍यास निर्बंध असल्‍याने शासनातर्फे महापरिनिर्वाण दिना निमित्‍त चैत्‍यभुमी, दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रेक्षपण करण्‍यात येणार असल्‍याने सर्व अनुयायांनी चैत्‍यभुमी दादर येथे न जाता घरातुनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.  

3.      महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दुःखाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा दिवस आहे. त्‍यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपुर्वक व धैर्याने वागावे. तसेच घरी राहूनच परमपुज्‍य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. जेणे करून काविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यास मदत होईल.                                           

4.    महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त परमपुज्‍य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्‍याचा कार्यक्रम हा संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यात आयोजित करण्‍यात येत असल्‍याने गर्दीवर नियंत्रण राहण्‍याच्‍या अनुषंगाने या पुर्वी शासनाच्‍या निर्देशानुसार प्रतिबंधीत केल्‍या प्रमाणे जमावावर / गर्दीवर निर्बंध राहतील याची संबंधीतानी नोंद घ्‍यावी.     

5.     कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्‍थानिक प्रशासन यांनी वेळो‍वेळी विहित केलेल्‍या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत काही सूचना नव्‍याने प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

            या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही.

0000

 

 आजपासून नववी ते बारावीपर्यंतच्या

शाळा होणार सुरु

-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) 1  :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेवून २ डिसेंबरपासुन समविषम पध्दतीने एक दिवसआड शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा वाहतूक समिती, कोरोना प्रतिबंधक समिती, स्थानिक प्रशासन, आरोग्य केंद्र या यंत्रणांच्या समन्वयातून योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्यास मुभा दिली.

 

कोविडचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनासह खाजगी संस्थाचालकांनीही याबाबत अधिक दक्षता घेवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले आहे.  शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या आणि त्यांचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ याबाबी लक्षात घेवून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबरपासुन सुरु करण्याचे जिल्हा प्रशासनाने अगोदरच जाहिर केले होते. गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापनवर्गात इयत्ता दहावी, बारावीतील विदयार्थीं सम तारखेला व इयत्ता नववी व अकरावीचे विदयार्थीं विषम तारखेला एक दिवसआड शाळेत उपस्थित राहतील. शाळा सुरु करतांना शासन परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांची सर्व स्तरावरुन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

जिल्हयात इयत्ता नववी ते बारावीच्या एकुण ८५८ शाळांतील १० हजार ६८६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी पुर्ण झालेली आहे. त्यापैकी ९८ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. पॉजिटिव्ह कर्मचाऱ्यांनी इंडियन कॉन्सील फॉर मेडीकल रिसर्च आयसीएमआर प्रोटोकॉलच्या मार्गदर्शक निर्देशकांची अंमलबजावणी करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी कोविडची परिस्थिती पाहता सर्व शाळांनी मास्क, साबण, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन करावे. तसेच वर्ग खोल्या, शालेय परिसर, स्वच्छतागृह निर्जंतुकीकरण करुन व आवश्यक ती योग्य खबरदारी घेवूनच शाळा सुरु कराव्यात, अशा सुचना दिल्या.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...