Thursday, September 21, 2023

वृत्त

माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबरला

साजरा करण्याच्या सूचना  

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन निर्णयान्वये माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीसाठी व प्रभावी अंमलबजावणीकरीता 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यासाठी निर्देशीत केले आहे. गुरूवार 28 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाकडून ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे 27 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा. त्या अनुषंगाने शासन निर्णयात निर्देशीत केल्याप्रमाणे अंमलबजावणी आपल्या कार्यालयस्तरावरून करण्यात यावी व प्रकरणात सदर तारखेस आपल्या कार्यालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.  

000000

 रस्ते की पाठशाला व्ही स्कुल ॲपचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी म्हणून रस्ते की पाठशाला हे व्हीस्कुल ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या रस्ते की पाठशालाचे विमोचन नुकतेच 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पर्वावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संकल्पनेतून व वोपा स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने करण्यात आलेले हे ॲप सर्व विद्यार्थ्यांना वापरासाठी सुरू करण्यात आले आहे.  

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख व वोपा स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख व्यक्ती, सदस्य आदी उपस्थित होते.  

या ॲपबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी माहिती दिली. ॲपमधील व्हिडिओ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वत: प्रत्यक्ष पाठ शिकवून सादर केला. या ॲपमधील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे रस्ता सुरक्षाविषयी नियमावलीची माहिती दिली आहे. रस्ता सुरक्षिततेची माहिती बाल वयात प्राप्त झाल्यास पुढची पिढी ही जागरूक होईल. यामुळे वाहन चालवितांना रस्ते सुरक्षिततेची माहिती होऊन संभाव्य अपघात टाळता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. रस्ते की पाठशाला या ॲप मधील व्हिडिओ हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले असून त्याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा. तसेच पालकांनी सुद्धा हे व्हिडिओ बघावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000

 विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / पत्नी  व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी सोमवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत विहित नमुन्यात प्रस्ताव / अर्ज आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मागविण्यात आले आहेत.  

सन 2022-23 या वर्षासाठी कल्याणकारी निधीतून विशेष गौरव पुरस्कार पुढील नमूद केलेल्या क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केली जाणार आहेत. इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडूसाहित्य, संगीतगायनवादननृत्य इत्यादी क्षेत्रातील तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य / जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती. यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे उद्योजक यांचा समावेश आहे. या क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव / अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह सोमवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करण्यात यावीत. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक मोबाईल नंबर 8380873985, 8707608283 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000 

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता 5 व वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ    

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अंतिम मुदतवाढ प्रवेश अर्ज 30 सप्टेंबर 2023 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शनिवार 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर सोमवार 18 सप्टेंबर ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. बुधवार 11 ऑक्टोंबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000 

 ई-पिक पाहणी नोंदविण्यासाठी

23 व 24 रोजी जिल्ह्यात विशेष मोहिम

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- राज्यात 2021 पासून ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला. यात पिक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे स्वत: शेतकऱ्यांच्या पुढाकारातून नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी आपआपल्या पातळीवर योग्य तो समन्वय साधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

या मोहिमेद्वारे कृषि विभागाच्या कृषि सेवकांपासून सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या ई-पिक पाहणी मोबाईल ॲप्लीकेशची माहिती व्हावी, त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी ही मोहिम असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. दिनांक 23 व 24 सप्टेंबर रोजी या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यातील गावांचे संबंधित तहसिलदार हे समप्रमाणात विभाजन करून 50 टक्के गावे तहसिल कार्यालयामार्फत व उर्वरित 50 टक्के गावांमध्ये तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत सदर उद्दीष्टाची पूर्तता करतील, असे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 556 गावे असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केल्यास सुमारे 3 लाख 11 हजार 200 पर्यंत या मोहिमेचे उद्दीष्ट साध्य होणार आहे. यात तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक / कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी / तरुण मंडळाचे पदाधिकारी या स्वयंसेवकाची निवड करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक पेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीही विश्वासाने सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

0000   

 रस्ते की पाठशाला व्ही स्कुल ॲपचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी म्हणून रस्ते की पाठशाला हे व्हीस्कुल ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या रस्ते की पाठशालाचे विमोचन नुकतेच 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पर्वावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संकल्पनेतून व वोपा स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने करण्यात आलेले हे ॲप सर्व विद्यार्थ्यांना वापरासाठी सुरू करण्यात आले आहे.  

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख व वोपा स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख व्यक्ती, सदस्य आदी उपस्थित होते.  

या ॲपबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी माहिती दिली. ॲपमधील व्हिडिओ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वत: प्रत्यक्ष पाठ शिकवून सादर केला. या ॲपमधील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे रस्ता सुरक्षाविषयी नियमावलीची माहिती दिली आहे. रस्ता सुरक्षिततेची माहिती बाल वयात प्राप्त झाल्यास पुढची पिढी ही जागरूक होईल. यामुळे वाहन चालवितांना रस्ते सुरक्षिततेची माहिती होऊन संभाव्य अपघात टाळता येतो, अशी माहिती त्यांनी दिली. रस्ते की पाठशाला या ॲप मधील व्हिडिओ हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले असून त्याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा. तसेच पालकांनी सुद्धा हे व्हिडिओ बघावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...