Thursday, September 21, 2023

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता 5 व वी साठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस मुदतवाढ    

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी/फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी अंतिम मुदतवाढ प्रवेश अर्ज 30 सप्टेंबर 2023 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा  तपशील पुढील प्रमाणे आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शनिवार 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर सोमवार 18 सप्टेंबर ते बुधवार 4 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. बुधवार 11 ऑक्टोंबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...