विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 21 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / पत्नी व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी सोमवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत विहित नमुन्यात प्रस्ताव / अर्ज आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे मागविण्यात आले आहेत.
सन 2022-23 या वर्षासाठी कल्याणकारी निधीतून विशेष गौरव पुरस्कार पुढील नमूद केलेल्या क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केली जाणार आहेत. इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू. साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्य / जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती. यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे उद्योजक यांचा समावेश आहे. या क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव / अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह सोमवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करण्यात यावीत. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक मोबाईल नंबर 8380873985, 8707608283 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment