Monday, October 3, 2022

जमिनीतील येणाऱ्या गूढ आवाजाबाबत नागरिकांनी घाबरू नये

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

· भोकर तालुक्यातील पांडुर्णा, बोरगडवाडी, समुद्रवाडी परिसरात जमिनीतील गूढ आवाजाची भूकंप मापक यंत्रावर नोंद नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- भोकर तालुक्यातील पांडुर्णा, बोरगडवाडी, समुद्रवाडी या परिसरात जमिनीतून गूढ आवाज आल्याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने विचारणा केली जात आहे. याबाबत अथवा यामुळे काही कंपने जावली का याचा अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांशी चर्चा केली. भूकंप मापक यंत्रावर तशी कोणतीही नोंद नसल्याचे विद्यापिठातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 

जिल्हा प्रशासनामार्फत भूजल शास्त्रीय पाहणीच्या अनुषंगाने भूजल व कंपन निगडीत बाबीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांना वरील बाबीचा अभ्यास करण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते. त्यास अनुसरून प्राथमिक अहवालानुसार अशा पद्धतीची कंपन हे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टाटिक दबावामुळे होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे.

 

गुढ आवाजाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर, राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबाद व नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी कोलकत्ता या केंद्रीय संस्थेचे सहकार्य घेण्यासाठी संपर्क साधला असून या संस्थेमार्फत सूक्ष्म पद्धतीने सर्व घटनांचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.  

00000 

 गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत

नांदेड जिल्ह्यात 7.48 कोटी वितरीत 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या विविध अपघातामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू ओढावल्यास अथवा अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत विमाछत्र प्रदान करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना / त्यांच्या कुटुंबियांना प्रकरण परत्वे लाभ दिले जातात. अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात निकामी झाल्यास  2 लाख रुपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एकहात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. नांदेड जिल्ह्यामध्ये सन 2018-19 पासून आजपर्यंत 395 वारसदारांच्या खात्यावर 7 कोटी 48 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.   

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नांदेड जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षात 112 मंजुर प्रस्तावात 2 कोटी 23 लाख रुपये वाटप करण्यात आले. सन 2019-20 मध्ये 149 मंजुर प्रस्तावात 2 कोटी 95 लाख रुपये, सन 2020-21 खंडीत कालावधी 39 मंजूर प्रस्ताव 78 लाख रुपये, तर सन 2021-22 मध्ये 76 प्रस्ताव मंजूर होऊन त्यात 1 कोटी 52 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जर कोणी शेतकरी कुटुंबातील सदस्य आपघाग्रस्त झाला असल्यास विहित कागदपत्रांच्या पुर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव घटना घडल्यापासून 45 दिवसांच्या आत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

000000

 प्रगतिशील तांत्रिक शेतीसाठी

सुशिक्षित तरुणांचे योगदान मोलाचे

      -    डॉ. देविकांत देशमुख

नांदेड (जिमाका) दि. 3 :- कासारखेडा गावातील तरुण शेतकऱ्यांनी बीबीएफ व टोकण पद्धतीने व नवीन तंत्रज्ञान वापरून केलेल्या सोयाबीन लागवडीची पध्दत अत्यंत उत्कृष्ट असून यापुढेही सुशिक्षित तरुणांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी पाणी व जमिनीचा वापर करून स्मार्ट शेती करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी केले.

राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत मौजे कासारखेडा येथे शेतीशाळा शेती दिन शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेस तालुका कृषी अधिकारी सिध्देश्वर मोकळे यांनी खरीप हंगामामध्ये प्रकल्पांतर्गत राबविलेल्या बाबींचा ऊहापोह करुन प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविल्याचे सांगितले.  गावकऱ्यांनी प्रकल्प राबविताना केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन पुढील हंगामासाठी आतापासूनच नियोजित बियाणे बीजोत्पादन म्हणून साठवावे. भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे बियाणे खरेदीचा खर्च कमी होईल, असेही यावेळी सांगितले.

लिंबगावचे मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी ऊस बेणे निवडलागवड पद्धतीसोयाबीन व इतर शेतमालाचे मूल्यवर्धनासाठी शेतकऱ्यांनी आपली प्रक्रियायुक्त मूल्य साखळी तयार करावी, असे सांगितले. सूत्रसंचालन कासारखेडाचे कृषि सहायक वसंत जारीकोटे यांनी तर आभार प्रदर्शन दशरथ आढाव यांनी मानले. या शेती दिन कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी सतीश सावंतकृषि सहायक रमेश धुतराजसरपंच प्रतिनिधी तानाजी शिंदेचंद्रशेखर शिंदेअश्विन शिंदे,  व्यंकटराव शिंदेसाहेबराव शिंदेग्राम पंचायत सदस्य योगाजी देशमुखभिमा हिंगोलेरावसाहेब कडेकरशिवदास कडेकरसुरेश हिंगोलेराजाराम शिंदेकिशोर शिंदेशहाजी शिंदे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.

00000

 नैसर्गिक शेतीविषयी पुणे येथे

 राज्यस्तरीय कार्यशाळा

 

§  राज्यातील सुमारे 2 हजार शेतकरी कार्यशाळेस उपस्थित राहणार

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- कृषी विभागामार्फत गुरुवार 6 ऑक्टोबर 2022 रोजी बालेवाडी, क्रिडा संकुलपुणे येथे नैसर्गिक शेती विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तारफलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणेरासायनिक खतांच्या मुख्यतः युरीयाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. यादृष्टीने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आदर्श आहेत. त्यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे २०० एकर शेती पुर्णत: नैसर्गिक शेतीमध्ये परीवर्तीत केली आहे. या  शाश्वत शेतीच्या प्रयोगाबद्दल त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 

राज्यभरातून सुमारे २ हजार शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहतील. कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर  https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयशासकीय कार्यालयेकृषि विज्ञान केंद्र. कृषि संशोधन संस्था इ. ठिकाणी करण्यात येत आहे.

00000

 सर्वसामान्यांना कालमर्यादेत सेवा देण्याची कार्यसंस्कृती प्रत्येक विभागात आवश्यक - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

▪️ सर्व कार्यालये जबाबदार व अधिक लोकाभिमूखतेसाठी जिल्हाधिकारी राऊत यांच्या स्पष्ट सूचना

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सर्वसामान्यांचे शासनाशी निगडीत कामांचे स्वरुप लक्षात घेतले तर त्यात फार काही किचकट अपेक्षा असतात असे नाही. आपले काम व्हावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. तथापि मुदती पेक्षा अधिक विलंब झाल्यास त्यांना विनाकारण कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. वेळेत सर्व कामांचा निपटारा हा चांगल्या प्रशासनाचे लक्षण असून सर्व विभाग प्रमुखांनी यादृष्टीने अधिक काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
प्रशासनाशी निगडीत असलेली कामे सेवा पंधरवडा पुरती मर्यादीत न राहता ती सर्वांची कार्यसंस्कृती झाली पाहिजे. वेळेत कामे व्हावीत यासाठी सेवा हक्क कायदानुसार सर्वांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आपण केवळ शासकीय अधिकारी या नात्याने काम न करता समाजाचा सुद्धा आपण एक घटक आहोत, हे समजून आपले उत्तरदायित्व प्रभावीपणे पार पाडले पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.

कायद्याच्या चौकटीत जर कोणाची कामे बसत नसतील तर त्यांना व्यवस्थीतपणे सर्व वस्तुस्थिती समजून सांगण्याची जबाबदारी ही विभाग प्रमुखांची आहे. जिल्हा प्रशासनाची कार्यतत्परता ती गतीमान होण्यासमवेत अकारण कोणाला जर शासनदरबारी चकरा माराव्या लागत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने उपलब्ध असलेला कालावधी, विविध योजनांचे नियोजन व येत्या मर्यादीत कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाच्या पूर्ततेबाबत त्यांनी अधिक दक्षता घेण्यास सांगितले.
0000





 जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची

11 ऑक्टोंबरला बैठकतक्रारी देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही तक्रार असल्यास अथवा आजपर्यत केल्या गेलेल्या भ्रष्ट कामकाजाबाबत काही निवेदने/तक्रारी असल्यास  किंवा शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये करण्यात येणाऱ्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी स्वरुपात तक्रार मंगळवार 11 ऑक्टोंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले. 


येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात मंगळवार 11 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 1 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत तक्रारीचे निवेदन लेखी स्वरुपात प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे लागेल. हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नांदेड या नावाने सबळ पुराव्यासह दोन प्रतीत सादर करावे लागेल. 

या बैठकीसाठी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेवून शासनाच्या नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्या अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीतर्फे करण्यात आले आहे.

00000

 मोटार सायकल पसंती क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु 

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- मोटार सायकलसाठी एमएच 26 -सीडी  ही नवीन मालिका मंगळवार 11 ऑक्टोंबर 2022 पासून सुरु होत आहेज्या अर्जदाराना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड मोबाईल नंबर  ईमेल सहअर्ज सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जÔ प्राप्त झाल्यास 11 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात यादी प्रदर्शित करण्यात येईल. तसेच टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईलतरी सर्व वाहनधारकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

 जिल्ह्यातील 207 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

लाख 67 हजार 932 पशुधनाचे लसीकरण

§  पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला लाख 67 हजार 932 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 207 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आज पर्यंत 23 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य 29 सप्टेंबर 2022 रोजी जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 49 गावे लम्पी बाधित आहेत. या 49 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 23 हजार 822 एवढे आहे. यातील 207 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 297 एवढी आहे. एकुण गावे 346 झाली आहेत. या बाधित 49 गावांच्या किमी परिघातील 346 गावातील (बाधित 49 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 98 हजार 510 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 23 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...