Sunday, October 27, 2024

 वृत्त क्र. 993

विधानसभेसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षक कालु राम रावत यांचे आगमन

 

नांदेड दि 27 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी राजस्थान कॅडरचे २००८ तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत यांचे आज नांदेड येथे आगमन झाले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. कालुराम रावत शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील.

 

त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराडे ( 88888921OO)त्यांच्यासोबत असतील. नागरिकांना नांदेड विश्रामगृहातील व्हीआयपी सूट क्रमांक एक मध्ये त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

००००






  वृत्त क्र. 992

नांदेड लोकसभा व विधानसभांची मतमोजणी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात

 ·    ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती 

नांदेड, दिनांक 27 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6 व विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे.   

नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच वेळेस येत असल्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देखील नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात होणार आहे. अन्यवेळी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशीच विधानसभेची मतमोजणी शहरात होत होती. मात्र यावेळी दोन्ही निवडणुका सोबत असल्यामुळे भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या लोकसभा क्षेत्रातील विधानसभेची मतमोजणी देखील विद्यापिठामध्ये होणार आहे. यासाठी 12 स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकसभेतील 6 मतदारसंघातील मतपेट्या तसेच 6 विधानसभा क्षेत्रातील मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत. 

20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी असल्यामुळे केवळ 20 रोजीच्या रात्री पर्यंत पोलिंग पार्टी नांदेडला पोहचतील. 21 व 22 रोजी मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये असेल. 23 नोव्हेंबरच्या पहाटे निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार स्ट्राँग रूममधून मतपेटीतून उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हिएम बाहेर काढल्या जातील. त्यानंतर मतमोजणी होईल. त्यामुळे विद्यापिठाच्या उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये काही अंशिक बदल करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामकृष्ण गलधर, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पुसदकर, तहसिलदार संजय वारकड, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहायक अभियंता सावन कासलीवाल आदी अधिकारी यासंदर्भात कार्यरत आहेत. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्यासह ललीतकुमार वऱ्हाडे, डॉ सचिन खल्लाळ आदींनी या केंद्रांची पाहणी केली. 

जिल्ह्यातील लोहा, हदगाव, किनवट या मतदारसंघातील मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. लोहा विधानसभेसाठी महसूल हॉल तहसिल कार्यालय लोहा येथे तर हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण भवन येथे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय वसतिगृह तामसा रोड हदगाव येथे होणार आहे. किनवट विधानसभेसाठी येथील आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे.  

0000   












  वृत्त क्र. 991

मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम

#नांदेड दि २७ ऑक्टोंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संसद,संकल्प पत्र व #मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपच्या नोडल अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतील मतदार #जनजागृती (स्वीप) अंतर्गतचे उपक्रम सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसह 83- किनवट विधान सभा मतदार संघात राबवित आहेत. या अनुषंगाने येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले.
नव मतदारांचा युवा संसद कार्यक्रम घेण्यात आला. नवमतदारांची स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपल्या आई-वडिलांना, काका-काकू, दादा-वहिनी, आदिंना मी मतदान करणारच असे भावनिक करणारे पत्र लिहून घेण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षकांसह सर्व नवमतदार युवक युवतींना मतदान शपथ दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य कृष्णकुमार नेम्माणीवार, #स्वीप कक्षाचे सर्व सदस्य रमेश मुनेश्वर , शेषेराव पाटील, सुरेश पाटील व प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वीप कक्षाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले. स्वीप कक्षाचे सदस्य तथा नयाकॅम्प किनवटचे केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे संकल्प पत्र लेखनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मुलांनी आपापल्या घरी जाऊन आपल्या मातृभाषेत आई-वडिलांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याविषयी संकल्प पत्र लिहावे , मतदान करणे महत्त्वाचे आहे हा विचार सांगावा.
यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रा. रेणुकादास पहुरकर यांनी आभार मानले.
000




 वृत्त क्र. 990

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव

#नांदेड दिनांक २७:- लोकसभा पोटनिवडणूक तथा 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज इतर मतदान अधिकारी यांचे नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये दुसऱ्या दिवशीचे #प्रशिक्षण आयोजित केले होते.
प्रशिक्षण कक्षाच्यावतीने एकूण दहा कक्षात पिपिटीद्वारे मर्यादित गटास परिणामकारक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला. त्यानी प्रत्येक कक्षात जावून स्वतः प्रशिक्षणार्थी होवून प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्यामुळे इतर प्रशिक्षणार्थींचा उत्साह द्विगुणित झाला. प्रशिक्षण देणाऱ्या मास्टर ट्रेनरला कांही शंका विचारुन शंकेचे समाधान करुन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत याच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ , तहसीलदार प्रविण पांडे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू,प्रशिक्षण टिममधील संजय भालके,मुख्याध्यापक सुनील दाचावार, प्रा.राजेश कुलकर्णी, हनुमंत राठोड, पेशकार राजकुमार कोटुरवार यांची उपस्थिती होती.
०००००







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...