Friday, September 13, 2019


मुगट ते कामठाचौक (गाडेगाव) वाहतूक मार्गात बदल

            नांदेड, दि. 14:- दिनांक 15  सप्‍टेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 04.00वा. पर्यंत  (5 तास) मुगट ते कामठाचौक (गाडेगाव मार्ग) बंद राहणार आहे. मुगट-पुणेगाव-वाजेगांव-नांदेड आणि कामठाचौक-वाजेगांव बायपास मार्ग-मुगट या पर्यायी रस्‍त्‍याने वाहतुक मार्ग राहणार आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम  115  मधील प्राप्त अधिकारान्वये,  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी  मौजे गाडेगाव येथील लेव्‍हल क्रॉसिंग रेल्‍वे गेट नं.150 जवळी 355/0-1 या ठिकाणी नवीन रेल्‍वे ट्रॅकचे कामाकरिता वाहतूक सुरळीत व्हावी, नागरीकांची गैरसोय होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो नये म्हणून दिनांक 15 सप्‍टेंबर,2019 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 वा.पर्यत (5 तास) या कालावधीत खालीलप्रमाणे वाहतुकीच्‍या मार्गात बदल केला आहे. अशी अधिसूचना 13 सप्टेंबर, 2019 रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पारित केली आहे.
0000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...