Thursday, March 9, 2023

 जिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  आज स्त्री ही केवळ डॉक्टरइंजिनीअर या क्षेत्रापूर्तीच मर्यादित  नसून देशाची प्रथम नागरिक राष्ट्रपती या पदावर महिलांनी आपले कतृत्व  सिद्ध करून दाखविलेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करू लागलेली असून देशाच्या प्रगतीसाठी तिचे  खूप मोठे योगदान असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. आज जिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रत्येक  पुरुषांच्या प्रगती मागे एका स्त्रीचा हात असतो असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. संतोष  सिरसीकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले. नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांनी देशातील स्त्रियांच्या प्रगतीमागे सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे योगदान असून  त्यांनी  स्त्रियांसाठी शैक्षेणिक क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी ही उल्लेखनिय आहे. त्यांच्यामुळेच आज भारत देशातील स्त्री ही साक्षर झाली व  पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागली. या कार्यक्रमास डॉ. एन अन्सारीडॉ. रोशनारा तडवीडॉ. अर्चना बजाजप्राचार्य द्वारकादास मेडमेट्रन सुरेखा जाधव व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती विद्या बापटे यांनी केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. उमेश मुंडेसुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.  बालाजी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन आर. एम. ओ. डॉ. एच के साखरे यांनी केले.

 0000



 थेट कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड 15 मार्चला होणार


नांदेड (जिमाका) दि. 9 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कार्यालयामार्फत प्रकल्प मर्यादा रुपये थेट कर्ज योजनेसाठी 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) होणार आहे. अर्जदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभाग्रहनमस्कार चौकग्यानमाता शाळेच्या समोर नांदेड कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित रहावे. पात्र व अपात्र अर्जदारांची यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. संबधितांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत प्रकल्प मर्यादा रुपये एक लाख थेट कर्ज योजनेअंतर्गत 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले आहेत.


या योजनेअंतर्गत एकुण 478 कर्ज मागणी अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे सर्व कर्ज प्रस्ताव जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती समोर सादर केले असता त्यापैकी 381 कर्ज मागणी अर्ज पात्र आहेत. 97 कर्ज मागणी अर्ज अपात्र आहेत. पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष 299 व महिला 82 आहेत. या योजनेचे 70 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट असून त्यापैकी शासनाच्या निर्णयानुसार टक्के अपंग राखीव म्हणजेच लाभार्थी महिला व पुरुष लॉटरी पध्दतीने काढण्यात येणार आहे. उर्वरित 68 पैकी 34 पुरुष व 34 महिला यामध्ये 50 टक्के ग्रामीण, 50 टक्के शहरी या पद्धतीने अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिठ्ठी समिती यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) निवड करावयाची आहे असेही महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

 कळी उमलताना या नाविण्यपुर्ण मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे निवारण करण्यासाठी कळी उमलताना ही नाविण्यपूर्ण योजना आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव महादेव येथे किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे निवारणासाठी कळी उमलताना या नाविण्यपुर्ण मोहिमेचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाविण्यपूर्ण मोहिम जिल्ह्यात 8 मार्च 2023 ते 8 मार्च 2024 या कालावधीत वर्षभर  राबविण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमास जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. निना बोराडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख, सुभाष खाकरे आदीची उपस्थिती होती.   

किशोरवयीन मुली एकुण लोकसंख्येच्या  10 ते 11 टक्के असतात. प्रौढत्वाच्या वाढीचा हा टप्पा सर्वात भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप महत्वाचा असतो. विचारांची परिपक्वता, अनेक शारीरिक बदलमनोसामाजिक बदल याच वयात घडतात. याच वयात मुलींना आहार विषयक गैरसमजुतीत्यामुळे आहारातील महत्वाच्या घटकांची कमतरताॲनेमिया-लोहाची कमतरतावजन कमी असणेलैगिंक आजारमानसिक आजार इतर सवयीलठ्ठपणा होणे आदी आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. या वयोगटातील मुलींच्या आरोग्यावरच पुढच्या पिढीचे आरोग्य व उपयुक्तता अवलंबुन आहे. बरेच आजार जसे लोहाची कमतरताकुपोषणॲनेमिया आजारांनी ग्रस्त किशोरवयीन मुलीपासून ते तिच्या होणाऱ्या बाळालासुध्दा हा आजार संक्रमित होतो. ही साखळी तोडण्यासाठी या उपक्रमाची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

0000





 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून

स्तन कर्करोग जागरुकता व उपचार अभियानास सुरुवात


नांदेड (जिमाका) दि.
 9 :-  राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार महिला मधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे आज घडीला इतर कर्करोगा पेक्षा जास्त आहे. त्यामुळे महिलाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोणातून राज्य शासनाने स्तन कर्करोग जागृती व उपचार अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे व त्याची सुरुवात 8 मार्च पासून महिला दिनाचे औचीत्य साधून केली आहे.

 

या अभियानाची सुरुवात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात केली. यावेळेस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी,
आयुक्त डॉ. राजीव निवतकर
 संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर व डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण यांची उपस्थिती होती.

 

8 मार्च पासून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून नांदेड येथील व परिसरातील महिलांच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी व कर्करोगाचे लवकर निदान व उपचार करून महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी 8 मार्च रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शा. वै. म, नांदेड येथे बाह्य रुग्ण विभाग १२३ मध्ये  BREAST CLINIC ROOM  स्तन कर्करोग तपासणी कक्ष असा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष दर बुधवारी १२ ते २ दुपारी या वेळेत चालू असून त्यामध्ये स्तन कर्करोग तज्ञ महिलांची तपासणी करतील. तसेच योग्य त्या तपासण्या व उपचार मोफत करण्यात येतील.

 

या स्तन कर्करोग कक्षाचे उद्घाटन 8 मार्च रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शा. वै. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी .टी . जमदाडे यांचे हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील व परिसरातील महिलांनी या उपलब्ध सुविधेचा फायदा घेऊन स्तनाच्या कर्करोगावर मात करण्याचे आवाहन यावेळी अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. वाकोडे, डॉ बोडके, वैद्यकीय अधीक्षक व शल्य चिकीत्सा शास्त्र विभागातील डॉ. अनिल देगावकर, डॉ. विद्याधर केळकर, डॉ. सुनील बोंबले , डॉ. बुशरा व इतर तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.

0000



 कर्तव्य पथावरील नारीशक्ती चित्ररथाचे

माहूर येथे भव्य स्वागत
नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठे; नारीशक्ती या चित्ररथाचे आज माहूरगडावर भव्य स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामगृहाशेजारील प्रांगणात महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशा असलेल्या या चित्ररथाचे माहूरचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, तहसीलदार किशोर यादव, रेणुकादेवी संस्थाचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, अरविंद देव, अशिष जोशी, चंद्रकांत रिठे, राठोड, स्वाती आडे, प्रिती जगत, बंजारा महासंघाचे पांडुरंग राठोड, महिला संघाच्या पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी हे प्रदर्शन माहूर येथे दोन दिवस राहणार आहे. सर्व नागरीकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
(छायाचित्र : बालाजी कोंडे )








  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...