सामान्य
व्यक्तींच्या समस्या जाणून
बँकेशी
संबंधीत कामे पूर्ण करावीत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यावेळी आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष
साबणे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नाबार्डचे
जिल्हा व्यवस्थापक विजय दुर्वे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांची प्रमुख
उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, शेतकरी
व गरीब व्यक्ती सावकाराकडे जाणार नाही यासाठी त्यांची कर्ज प्रकरणे निकाली काढावीत.
शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून मिळणारी रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये. बँकेकडे
जी गावे दत्तक नाहीत ती गावे बँकांना दत्तक देण्यात यावीत. लाभार्थ्यांना योजनेचा
लाभ मिळण्यासाठी बँकांनी सकारात्मक राहून पुढे यावे. बँकांनी पिक कर्ज वाटप त्वरीत
करुन कर्ज वितरणाचे उद्दीष्ट पुर्ण करावीत, अशी सुचना त्यांनी केली.
000000