Saturday, February 3, 2018

साहित्य संमेलन व व्यवसाय मार्गदर्शन
लोकराज्य विशेषांक प्रकाशित
नांदेड, 3 :  साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शन यावर आधारित लोकराज्य फेब्रुवारीचा विशेषांक मराठी भाषा, शालेय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशित झाला. 
मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती/प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर उपस्थित होते.
बडोदा येथे होत असलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्य संमेलनाचे महत्त्वयावर लिहिलेला लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्र साधनांची ओळख, मराठी भाषा विभागाचे उपक्रम, अक्षरसाधना  कशी करावी या विषयांवरील लेखांचा अंकात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा धोरण आखणीत भाषा सल्लागार समितीची भूमिका विशद करणारी डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखतही या अंकात आहे.  
व्यवसाय मार्गदर्शन
या अंकात पुढील विषयांचा समावेश आहे : यशोशिखरावर कसे जाल ? (अविनाश धर्माधिकारी), समाज माध्यमांची शक्ती (प्रा. रवींद्र चिचोलकर), कलेचा आनंद आणि आनंदाची कला (प्रा. गजानन शेपाळ), डॉ. आंबेडकर थॉट: नवी संधी (डॉ. प्रदीप आगलावे), पुरातत्त्व शास्त्र शोध मानववंशाचा (हर्षदा विरकूड), स्वप्नांना शिष्यवृत्तीचे बळ (वर्षा फडके, विष्णू काकडे, शैलजा वाघ-दांदळे), यशदामध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी (डॉ. बबन जोगदंड), प्रशासकीय सेवेचा राजमार्ग (डॉ. म.बा. भिडे), कौशल्यातून उन्नतीकडे, दर्जेदार संस्था-सर्वोत्कृष्ट शिक्षण, कार्पोरेट प्रशासनाचे सूत्रधार. मराठी  भाषा आणि करीअर संधी.

60 पृष्ठांच्या या अंकाची किंमत 10 रु. आहे. 
रेशीम कायदा मसुदावर
सुचना सादर करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 3 :- रेशीम कायदा मसुदाची मराठी व इंग्रजी प्रत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कायदाबाबत  सुचना, हरकती, अभिप्राय असल्यास नागरिकांनी लेखी स्वरुपात रविवार 18 फेब्रुवारी 2018 पुर्वी जिल्हा रेशीम कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
राज्यासाठी "The Maharashtra Silk Worm Seed, Cocoon And Silk Yarn (Regulation of Production, Supply Distribution And Sale) Act & Rules 2017" या नावाने रेशीम ॲक्टचा मसुदा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्याबाबत जनतेच्या सुचना / अभिप्राय व हरकती तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे.  त्यानुसार रेशीम किट बिजांचे उत्पादन व नियमन, रेशीम किटक संगोपन, रेशीम धाग्याचे ताबा आदी, रेशीम कोषांचे विलेवाट लावणे, रिलिंगसाठी रेशीम कोष खरेदी व विक्री, रिलिंग, रेशीम धागा खरेदी विक्रीचे नियमन, परवान्यासाठी अर्ज, कोष बाजाराची स्थापना, कोष रेशीम धागा बाजाराची स्थापना, संशोध आणि विकास माहिती मिळविण्याचे, प्रवेशाचे, तपासणीचे आणि जप्तीचे अधिकार, दंड प्रोत्साहन, काही गुन्ह्यांना दखल पात्र ठरवीणे, परवाना निलंबीत करणे किंवा रद्द करणे मालमत्तेची जप्ती आणि दंड करणे आदी आपसी समजोत्याने अपराधाचा निपटारा, कायद्याअंतर्गत खटले चालविणे व गुन्ह्याची दखल घेण्यास सक्षम न्यायालय या कायदा अंतर्गत कार्य करणाऱ्या व्यक्तीचे स्वंरक्षण, थकबाकी वसूल करण्याची पद्धत, अधिकारी हे सरकारी सेवक नेमणे, विकास व किंमती स्थीरीकरण निधीची स्थापना, नियम बनविण्याचा शासनाचा अधिकारी आदी बाबत तरतुदी प्रस्तावित केल्या आहेत, असे रेशीम विकास अधिकारी, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000
नवीन इमारतीसाठी आवाहन
नांदेड, दि. 3 :- येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयासाठी सरकारी अखत्यारीतील 3 हजार स्केअर फुट इमारतीची आवश्यकता आहे, संबंधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी केले आहे.

000000
आजपासून कर्करोग जागृती पंधरवडा
कर्करोग रुग्णांचा मोफत उपचार
नांदेड दि. 3 :- जागतिक कर्करोग दिनानिमित्त उद्या दि. 4 फेब्रुवारी पासून कर्करोग जागृती पंधरवडासाजरा करण्यात येणार आहे. याकाळात कर्करोग तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत तपासणी अंती निश्चित निदान झालेल्या रुग्णाचे हैद्राबाद येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश पवार, डॉ. एन. एस. गुलाटी व डॉ. मोरे हे 16 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी या तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे. 
जिल्ह्यात जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा  4 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा दिनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोनार्क कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. एन. एस गुलाटी यांनी कार्कारोगाबद्दल मार्गदर्शन केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर तोंडातील लालसर चट्टा, तोंड उघडता न येणे, अन्न नलीकेचा त्रास होणे, स्त्री स्तनास गाट असणे, गर्भाशयाचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती दिली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, ईएनटी सर्जन डॉ. रहेमान डॉ. लोकडे डॉ. व्ही. एस. पवार, डॉ. सबा खान, डॉ. सुजाता राठोड, डॉ. प्रदीप बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमास रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी केले तर  सुवर्णकार सदाशिव यांनी आभार मानले.

000000
  दिव्यांग शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
दाखल करण्यास 9 फेब्रुवारीची मुदत 
नांदेड, दि. 3 :- प्राथमिक, माध्यमिक शाळेतील तसेच महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शालांतपूर्व व महाविद्यालयीन मॅट्रीकोत्तर दिव्यांग शिष्यवृत्ती प्रस्ताव विद्यालय, महाविद्यालयांनी जिल्हा समाज कल्याण विभाग जि. प. यांचेकडे शुक्रवार 9 फेब्रुवारी पर्यंत दाखल करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मुख्याध्यापक, प्राचार्यांनी परिपुर्ण प्रस्ताव ऑफलाईन आवश्यक कागदपत्रासह जसे विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, बँक पासबुक, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राच्या सत्यप्रती सोबत दाखल करावेत. विलंब झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यांची राहील, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000
एसएसबी मुलाखतीच्या
तयारीसाठी प्रशिक्षण उपलब्ध
नांदेड दि. 3 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायूदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण आयोजित केल्याचे, नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळवले आहे. 
प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल इंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे. अशा उमेदवारांना सर्विसेस सिलेक्शन बोर्ड एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.
सन 2018 मधील दहा दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. फेब्रुवारी तिसरा आठवडा, मार्च दुसरा, जुन पहिला, जुलै चौथा, ऑग्स्ट तिसरा व नोव्हेंबर तिसरा आठवडा याप्रमाणे एसएसबी मुलाखतीच्या तयारीसाठी क्लासेस आयोजित करण्यात आले आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, तहसिल कार्यालयाजवळ नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.                        

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...