Wednesday, May 17, 2017

पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 17 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर हे गुरुवार 18 मे 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 18 मे 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.25 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 8.35 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून चिखलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. चिखली येथे आगमन व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सकाळी 11 वा. चिखली येथून मुखेडकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. मुखेड येथे आगमन व आमदार सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. दुपारी 12.15 वा. मुखेड येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.15 वा. शासकीय विश्रामगृह येथून नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व नंदीग्राम एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण करतील.  

000000
पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा
नांदेड, दि. 17 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर हे गुरुवार 18 मे 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 18 मे 2017 रोजी हैद्राबाद येथून मोटारीने मुखेड येथे सकाळी 11.30 वा. आगमन व आमदार सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. दुपारी 12.30 वा. मुखेड येथून मोटारीने चिखलीकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. चिखली येथे आगमन व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सोईनुसार चिखली येथुन शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वा. देवगिरी एक्सप्रेसने नाशिककडे प्रयाण करतील.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 17  :- जिल्ह्यात गुरुवार 25 मे 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील धरणे, मोर्चे, रस्तारोको, आंदोलनाची शक्यता या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 13 मे 2017 ते गुरुवार 25 मे 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000


"दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस"
21 मे ऐवजी 20 मे रोजी साजरा करावा
नांदेड, दि. 17  :- "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" रविवार 21 मे 2017 रोजी साजरा करण्यात येतो. रविवार 21 मे 2017 रोजी राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" हा शनिवार 20 मे 2017 रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी दि. 16 मे 2017 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये योग्य ती कार्यवाही करावी व शनिवार 20 मे 2017 रोजी "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस" साजरा करावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.  

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...