Friday, July 6, 2018


शासकीय अध्यापक महाविद्यालय
परिसरात विविध वृक्षांचे रोपण
नांदेड, दि. 7 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसरात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती दिनी प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी, कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 16.49 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यात शनिवार 7 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 263.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 293.03 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 31.15 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 7 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 14.50 (363.54), मुदखेड- 15.33 (479.68), अर्धापूर- 16.67 (323.68), भोकर- 24.50 (423.50), उमरी- 20.33 (309.64), कंधार- 4.67 (298.83), लोहा-4.83 (309.98), किनवट- 26.00 (222.28), माहूर-22.75 (312.25), हदगाव- 33.29 (370.72), हिमायतनगर- 52.00 (362.35), देगलूर- 3.17 (120.17), बिलोली- 6.60 (191.00), धर्माबाद- 8.67 (221.32), नायगाव- 7.20 (234.80), मुखेड- 3.29 (144.70). आज अखेर पावसाची सरासरी 293.03 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4688.44) मिलीमीटर आहे.
00000


सैन्यदलात अधिकारी पदाच्या
भरतीसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण
नांदेड, दि. 6 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये  अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार 18 जुलै ते शुक्रवार 27 जुलै 2018 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 47 चे आयोजन करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे शुक्रवार 13 जुलै 2018 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी  प्रमाणपत्र किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी नंबर 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन मेजर सुभाष  सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.  
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 17.73 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात शुक्रवार 6 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 283.65 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 276.54 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 29.48 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 6 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 27.13 (349.04), मुदखेड- 25.67 (464.35), अर्धापूर- 34.00 (307.01), भोकर- 28.75 (399.00), उमरी- 23.00 (289.31), कंधार- 12.33 (294.16), लोहा- 22.17 (305.15), किनवट- 16.43 (196.28), माहूर-25.75 (289.50), हदगाव- 13.71 (337.43), हिमायतनगर- 12.00 (310.35), देगलूर- 14.00 (117.00), बिलोली- 6.80 (184.40), धर्माबाद- 6.00 (212.65), नायगाव- 8.20 (227.60), मुखेड- 7.71 (141.41). आज अखेर पावसाची सरासरी 276.54 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 4424.64) मिलीमीटर आहे.
00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...