Wednesday, October 13, 2021

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- शंकर नगर तालुका बिलोली येथील भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्ष इयत्ता सहावी व नववी वर्गात प्रवेशासाठी  निवड चाचणी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे.इच्छुकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असून  प्रवेशाकरिता www.navodayz.gov.in किंवा www.nvsadmissionclassnine या वेबसाईटवर अर्ज करता येईल.

पुढील शैक्षणिक वर्ष 2022 साठी 30 नोव्हेंबर 2021 तर नववी करिता 31 ऑक्टोबर 2021 पर्यत ऑनलाईन फार्म भरता येतील.  नांदेड जिल्ह्यातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी अर्ज करावा. इयत्ता सहावीच्या प्रवेश परिक्षा  30 एप्रिल 2022 रोजी  तर  नववी वर्गात प्रवेशासाठी प्रवेश परिक्षा 9 एप्रिल 2022 रोजी होईल. इयत्ता सहावीसाठी 80 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.नववी साठी रिक्त जागा झाली तर प्रवेश उपलब्ध होईल असे  आवाहन प्रभारी प्राचार्य अवधेश कुमार  पांण्डेय यांनी केले आहे.

000

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी नियमित साखर

 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी नियमित साखर  

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने माहे ऑक्टोबरनोव्हेंबर,व डिसेंबर 2021 करिता एक किलो प्रतिमाह साखर नियतन करण्यात आली आहे.

जिल्ह्यासाठी शासनाकडून 2 हजार 107 क्विंटलचे साखर प्राप्त झाली आहे.तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यामध्ये नांदेड साठी 211 अर्धापूर 30मूदखेड 34कंधार 96लोहा 137.5भोकर 48.5उमरी 126देगलूर 126बिलोली 117.5,नायगाव 130.5,धर्माबाद 72.5मुखेड 82किनवट 462.5 206माहुर 206हदगाव 187.5हिमायतनगर 100.5एकूण 2107 नियतन साखर नादेंड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.

000

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा

 नांदेड जिल्ह्यात 3  व्यक्ती कोरोना बाधित तर 1 कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13:- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 668 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 348  एवढी झाली असून यातील 87 हजार 676 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे देगलूर 2असे एकुण 3 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील एका कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 20 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 42 हजार 832

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 39  हजार 311

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 348

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 676

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-20

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. 14  ऑक्टोंबर  2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय,  डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,  स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, अरबगल्ली, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय,  डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,  स्त्री रुग्णालय,  शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर,  जंगमवाडी,  दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर(विजयनगर),  सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर,    खडकपुरा, अरबगल्ली रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर,  बिलोली,  धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर,  हदगाव, गोकुंदा,  मुखे ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड,  नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 12  ऑक्टोंबर 2021 पर्यंत एकुण 16  लाख 43 हजार 697 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात  13 ऑक्टोंबर 2021 पर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 14  लाख 98 हजार 230 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 52 हजार 320 डोस याप्रमाणे एकुण 18 लाख 50 हजार 550 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत 9 जणांची माघार 12 उमेदवार निवडणूक रिंगणात.

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जणांची माघार 12 उमेदवार निवडणूक रिंगणात.

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- देगलूर विधानसभा पोट निवडणुक उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी 21 पैकी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता १२ उमेदवार निवडणुकीसाठी आहेत.  या निवडणूकीसाठी एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होते. यातील छाननीअंती उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याने एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.

यात अंतापूरकर जितेश रावसाहेब इंडियन नॅशनल काँग्रेससाबणे सुभाष पिराजीराव भारतीय जनता पार्टीउत्तम रामराव इंगोले वंचित बहुजन आघाडीकेरकर विवेक पुंडलिकराव जनता दल (सेक्युलर)प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे बहुजन भारत पार्टीडी डी वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)अरुण कोंडीबाराव दापकेकर अपक्षगजभारे साहेबराव भिवा अपक्षभगवान गोविंदराव कंधारे अपक्षमारुती लक्ष्मण सोनकांबळे अपक्षवाघमारे विमल बाबुराव अपक्षकॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे अपक्ष आहेत.

 

हाटकर प्रल्हाद जळबाधोंडीबा तुळशीराम कांबळेभोरगे सूर्यकांत माधवरावरामचंद्र गंगाराम भंराडेरुमाली आनंदराव मरीबा,ॲड लक्ष्मण नागोराव देवकरे (भोसिकर) विठ्ठलराव पिराजी  शाबुकसारविश्वंभर जळबा वरवंटकर ,सिद्धार्थ प्रल्हाद हाटकर या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात 12 उमेदवार शिल्लक राहिल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

0000

 

देगलूर पोट निवडणुकीसाठी मतदार तक्रार निवारण कक्षाची स्थापना.

 देगलूर पोट निवडणुकीसाठी मतदार तक्रार निवारण कक्षाची स्थापना.


नांदेड (जिमाका) दि. 13 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणूकी साठी मतदारांच्या व नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  मतदानाविषयी व संबंधित समस्या व तक्रारी असतील तर मतदार तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडाव्यात अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली. सदरील तक्रार निवारण कक्षाचे पक्षप्रमुख म्हणून व्ही टी बिरादार (अव्वल कारकून) व सहाय्यक म्हणून सूर्याजी काळुगड्डे (महसूल सहाय्यक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना व नागरिकांना मतदान यंत्र, आचारसंहितेचा भंगमतदार यादी आदि संबंधीच्या समस्या व अडचणी निर्माण झाल्यास त्या संदर्भातील तक्रारी दूरध्वनी क्रमांक 024 63 299 544 या नंबरवर नोदवाव्यात असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी केले.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...