Wednesday, November 11, 2020

 

 73  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

        28 कोरोना बाधितांची भर  तर एकाचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- बुधवार 11 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5-30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 73 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 28 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 122 अहवालापैकी  1 हजार 86 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 540 एवढी झाली असून यातील  18  हजार 547 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 284 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

दिनांक 11 नोव्हेंबर रोजी देगलूर येथील 70 वय वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 534 झाली आहे.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 24, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6 , खाजगी रुग्णालय 24, किनवट कोविड  केअर सेटर व गृहविलगीकरण 6, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, हिमायतनगर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, कंधार कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1 असे एकूण 73 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, अर्धापूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1 असे एकुण 8 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 12, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 2, देगलूर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 2, नागपूर 1 असे एकूण 20 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 73 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 41, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 31, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 39, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 74, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 19, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3,  अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 34 आहेत. 

 

बुधवार 11 नोव्हेंबर 2020 रोजी 5-30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 160, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 24 हजार 179

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 1 हजार 205

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 540

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 547

एकूण मृत्यू संख्या- 534

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.54 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 354

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 284

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 15.

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

                             कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यातील सर्व जिनिग मालकांनी शासकीय कापुस खरेदीसाठी जिनिंगचा परिसर व जिनिंग दुरुस्ती करुन सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

गुलाबी बोंडअळी  व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झुम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेद्वारे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुढील खरीप हंगामात कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे जैविक पध्दतीने किड नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा  क्रायसोफा यांच्या उत्पादनासाठी कापुस क्षेत्र जास्त असलेल्या तालुक्यामध्ये बचतगटांना प्रशिक्षण देवून चालना द्यावी असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

या कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, जिल्हयातील कापूस जिनिंग कंपनीचे मालक, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती उपस्थित होते.

या कार्यशाळेत कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना कापसाची फरदड घेवू नये असे आवाहन केले.  याऐवजी रब्बी पिके जसे गहु, हरभरा, करडई इ. पिके घेण्याचे सूचविले . मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र मोठया प्रमाणात होते. याहीवर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रात वाढ होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी सांगितले.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...