Wednesday, November 11, 2020

                             कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यातील सर्व जिनिग मालकांनी शासकीय कापुस खरेदीसाठी जिनिंगचा परिसर व जिनिंग दुरुस्ती करुन सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

गुलाबी बोंडअळी  व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झुम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेद्वारे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुढील खरीप हंगामात कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे जैविक पध्दतीने किड नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा  क्रायसोफा यांच्या उत्पादनासाठी कापुस क्षेत्र जास्त असलेल्या तालुक्यामध्ये बचतगटांना प्रशिक्षण देवून चालना द्यावी असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

या कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, जिल्हयातील कापूस जिनिंग कंपनीचे मालक, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती उपस्थित होते.

या कार्यशाळेत कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना कापसाची फरदड घेवू नये असे आवाहन केले.  याऐवजी रब्बी पिके जसे गहु, हरभरा, करडई इ. पिके घेण्याचे सूचविले . मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र मोठया प्रमाणात होते. याहीवर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रात वाढ होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...